Quad Summit : क्वाड परिषदेत नेमकं काय घडलं? परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितला मुख्य अजेंडा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान सागरी सुरेक्षाचा मुद्दा अविभाज्य भाग होता. सागरी क्षेत्रातील अडथळ्यांपासून, मोठ्या धोक्यापांसून मुक्त राहण्यासाठी क्वाड राष्ट्रांनी प्रयत्नशील राहण्याचे ठरवले. यासाठी एक मजबूत आणि सुरक्षित आर्थिक आराखड्यावर संयुक्तपणे कार्य सुरु केले. यासाठी Maritime Surveillance Co-operation उपक्रम सुरु करण्यात आला.
क्वाड संघटनेत भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचा समावेश आहे. या देशांचा उद्देश चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखणे असून याला ड्रॅगनने तीव्र विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत झालेली क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जागतिक रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाची मानली जात आहे.
Just completed a productive QUAD FMM with colleagues @SecRubio of the US, @SenatorWong of Australia, and FM @moteging of Japan. Three major takeaways: ➡️ Agreed on Indo-Pacific Maritime Surveillance Initiative and on a Common Operating Picture in the maritime domain. Will… pic.twitter.com/4b0dFtiAHC — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 26, 2026






