फोटो सौजन्य AI
रशिया आणि चीन कडून इराण ला मिळणारी अचूक ध्येय साध्य करणारी माहिती यामुळे इराणने बरेच इस्राईल आणि अमेरिकेचे नुकसान केले आहे . कोणतेही मोठे बजेट आणि यंत्रणा नसताना सुद्धा युद्धात कशी टिकून आहे . याचे आश्चर्य देखील बऱ्याच लोकांना आहे . पण यात इराणने वापरलेली डी सेंट्रलाइज युद्ध नीती कारगर ठरली आहे . त्याच बरोबर गरजेनुसार महागडे शस्त्र वापरणे . एकाच वेळी कमी खर्चाच्या जास्त मिसाईल आणि ड्रोन सोडून आयरन डोम सारख्या यंत्रणेला दमवणे हि युद्ध नीती हि इराणच्या पलड्यात पडली आहे .
याच धर्तीवर आता इराण चीन कडून ४०० खांद्यावरून सोडणाऱ्या मिसाईल घेत आहे . असे वृत्त आले आहे . अजून तरी इराण किंवा चीन कडून याची अधिकृत पुष्टी झाली नाही . या प्रणाली मध्ये QW – १२ आणि FN – १६ सारख्या शॉर्ट रेंज एअर डिफेन्स लॉन्चर समावेश असल्याचे वृत्त आहे . या कराराची किंमत ६० – ७० दशलक्ष डॉलर असल्याचेही म्हंटले आहे .
याआधी फेब्रुवारी २०२६ मध्ये चीनच्या CM – ३०२ सुपारसॉनिक अँटी शिप क्षेपणास्त्राच्या संभाव्य कराराबाबतही वृत्त आले होते . मात्र बीजिंगने हा दावा अधिकृतपणे फेटाळला आणि कराराच्या बातम्या चुकिचे असल्याचे सांगितले .
Iran Nuclear : इराण अणुबॉम्बच्या उंबरठ्यावर? रॉबर्ट मॅलींचे खळबळजनक विधान
आजचे वृत्त जर अचूक ठरले तर हि बाब इराण विरुद्ध लढणाऱ्या सगळ्याच देशांसाठी चिंतेची बाब आहे . कारण खर्ग बेटावर हल्ला करून त्याला ताब्यात घेण्याचा अमेरिकेचा मनसुबा अधिकच दूर जाईल . जमीनीवर आणि हवाई हल्ल्यापासून संरक्षणासाठी मोठी मदत मिळू शकते . हे आक्रमक बॅलेस्टिक मिसाईल लॉन्चर नाहीत , तर विमाने हेलिकॉप्टर आणि कमी उंचीवर उडणाऱ्या लक्षांवर मारा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोर्टेबल एअर डिफेन्स लॉन्चर्स ( MANPADS ) आहेत .
तसेच हि डील छोट्या मिसाईल बाबत आहे . मोठ्या मिसाईल बाबत नाही असेही माहितीवरून समजते आहे .






