US Iran Conflict : इराणचा थेट इशारा? संघर्षादरम्यान Donald Trump यांचा आवाज केला बंद; तेहरान चौकातील 'त्या' बिलबोर्डनं जगात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणने हे बिलबोर्ड राजधानी तेहरानच्या चौकात लावले आहे. यामध्ये बिलबोर्डवर ट्रम्प यांचा चेहऱ्याचा फोटो दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांचे तोंड दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे इराणने त्यांचे तोंड अशा प्रकारे दाखवले आहे जणू त्यांचे ओठ शिवले गेले आहेत.
होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनीच्या पार्श्वभूमीवर हा बिलबोर्ड लावण्यात आला आहे. या बिलबोर्डवर इंग्रजी आणि फारसी भाषेत At the Breaking Point म्हणजे विनाशाच्या उंबरठ्यावर असा इशारा देण्यात आला आहे. या बिलबोर्डमुळे सध्या जागतिक स्तरावर मोठा वाद पेटला आहे.
इराणने बिलबोर्ड केवळ चौकातच नाही, तर तेहरानच्या मेट्रो स्थानकावरही लावले आहेत.यामध्ये ट्रम्प यांना शरणागती पत्करताना आणि पैशांचे पुंडके देताना दाखवण्यात आले आहे. इराणच्या या बिलबोर्डमुळे दोन्ही देशांतील शांतता चर्चा पुन्हा संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या मध्यस्थीने सादर करण्यात आलेले १४ कलीम प्रस्तावही ट्रम्प यांनी फेटाळून लावला आहे. या प्रस्तावात अणेरिकेच्या हितसंबंधांचा विचार करण्यात आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. इराणला त्यांचा अणु कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा लागले असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे इराण तीव्र संतप्त असून पुन्हा युद्धास तयार असल्याचे म्हटले आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात संयुक्त लष्करी कारवाई केली होती. या कारवाईनंतर इराणने होर्मुझमध्ये नाकेबंदी केली आणि जागतिक तेल पुरवठ्याला फटका बसला.
होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील तेल वाहतूकीच्या सर्वात महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरुन २०% तेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचलवे जाते. इराणने या मार्गावर अमेरिका-इस्रायल आणि त्यांना साथ देणाऱ्या राष्ट्रांची जहाजे रोखली होती. परिणामी जागतिक पुरवठा विस्कळीत झाला आणि इंधन दर गगनाला भिडले.
पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त! UAE च्या एक्झिटनंतर OPEC+ चा मोठा निर्णय; भारताला दिलासा मिळणार का?






