फोटो सौजन्य AI
ट्रम्प यांनी अलीकडेच इराण सोबत चर्चा करणार असल्याचे आणि प्रतिनिधी मंडळ भेटणार असल्याचे सांगितले . असा दावा त्यांनी केला होता . या विधानानंतर मध्य पूर्वेतील तणाव कमी होईल अशी अपॆक्षा व्यक्त केली जात होती . तेलाच्या किमती मध्ये ही काहीशी नरमाई दिसून आली होती . मात्र इराणच्या भूमिकेमुळे पुन्हा त्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले . तेहरान ने स्पष्ट केले कि सध्या तरी चर्चा होणार नसून कोणतेही प्रतिनिधी मंडळ अमेरिकेला भेटणार नाही .
इराण ने हे मात्र मान्य केले कि ओमान सोबत होर्मूझ मधील जहाजांच्या वाहतुकी संदर्भात बोलणी सुरु आहेत . चर्चेचा उद्देश हा व्यापारी जहाजांसाठी सुरक्षित मार्ग ठरवणे हा आहे . पण या चर्चेचा संबंध हा अमेरिका इराण यांच्या अणुकरारा बाबत नाही . असे स्पष्ट केले .
राजकीय विश्लेकांच्या मते , मागे अमेरिकेने चर्चा चर्चा करून नंतर पुन्हा इराणवर हल्ले केले . त्यामुळे इराणचा आता अमेरिकेवर विश्वास राहिला नाही . युद्धात झालेल्या गोष्टींमुळे , खामेनिंचा खून , लहान मुलींवर केलेला हल्ला , लादलेले आर्थिक निर्बंध या सगळ्यामुळे इराण प्रचंड अमेरिकेवर नाराज आहे . त्यामुळे भविष्यात संवादाची शक्यता नाकारता नसली तरी , त्यासाठी प्रथम वातावरण बदलणे आवश्यक आहे , असे तेहरान ने संकेत दिले आहेत .
Zambia Election 2026 : आर्थिक सुधारणा की महागाई? झांबियात पुन्हा हिचिलेमा यांच्यासमोर जनतेची परीक्षा
या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील राजनैतिक समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. अमेरिका संवादाचा संदेश देत असताना इराणने घेतलेली कठोर भूमिका पुढील काही दिवसांत या तणावाला कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.






