लेबनॉनमधील शस्त्रसंधीदरम्यान इस्रायलने आखली Yellow Line आणि केले वेगाने हल्ले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Israel airstrikes Lebanon ceasefire violation : मध्य-पूर्वेतील रणसंग्राम थांबण्याचे नाव घेत नाहीये. इस्रायल आणि लेबनॉन (Israel and Lebanon War) यांच्यात १६ एप्रिल रोजी शस्त्रसंधी जाहीर झाली असली, तरी जमिनीवरची परिस्थिती मात्र वेगळीच कथा सांगत आहे. इराण आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली संरक्षण दलाने (IDF) दक्षिण लेबनॉनमध्ये एक नवीन लष्करी सीमा आखली आहे, ज्याला ‘यलो लाईन’ (Yellow Line) असे नाव दिले गेले आहे. या रेषेचा वापर करून इस्रायल आता लेबनॉनच्या भूभागावर पुन्हा एकदा आक्रमक हल्ले करत आहे, ज्यामुळे नुकतीच झालेली शांतता धोक्यात आली आहे.
‘यलो लाईन’ ही मुळात एक काल्पनिक लष्करी सीमा आहे, जी इस्रायलने स्वतःच्या सुरक्षेसाठी दक्षिण लेबनॉनमध्ये तयार केली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये गाझामध्ये अशाच प्रकारची रेषा आखून इस्रायलने गाझा पट्टीचे दोन भाग केले होते. आता लेबनॉनमध्येही त्याच धर्तीवर हालचाली सुरू आहेत. इस्रायलचा दावा आहे की, जे कोणी या रेषेच्या जवळ येतात किंवा ती ओलांडण्याचा प्रयत्न करतात, ते त्यांच्यासाठी थेट धोका आहेत. रविवारी इस्रायलने केलेले दोन हवाई हल्ले याच धोरणाचा भाग होते. धक्कादायक म्हणजे, हिजबुल्लाहचे लढवय्ये या रेषेच्या उत्तरेला असूनही त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Iran Conflict : ‘सर्व काही ठीक आहे, प्रकरण…’ टँकर हल्ल्यानंतर इराणचे ‘ते’ शब्द; भारतासाठी इशारा की दिलासा?
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तयार केलेल्या कराराच्या रूपरेषेनुसार, इस्रायलला “आत्मसंरक्षणासाठी” योग्य वाटल्यास कारवाई करण्याची मुभा देण्यात आली आहे. याच मुद्द्याचा आधार घेत इस्रायल आपले हल्ले समर्थनीय ठरवत आहे. दक्षिण लेबनॉनमधील तब्बल ५५ गावांवर इस्रायलचा ताबा अद्याप कायम आहे. तोफखाना आणि मशीनगनचा सततचा मारा यामुळे लेबनीज नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इस्रायली प्रवक्त्यांच्या मते, दहशतवाद्यांनी शस्त्रसंधीच्या अटींचे उल्लंघन केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे.
The Israeli military says it established a “yellow line” demarcation in southern Lebanon, similar to the one separating its forces from territory still held by Hamas in Gaza. 🔴 LIVE updates: https://t.co/F8KS9pU8XS pic.twitter.com/TWoMK6slHH — Al Jazeera English (@AJEnglish) April 18, 2026
credit – social media and Twitter
हिजबुल्लाहचे नवे नेते नईम कासिम यांनी या संपूर्ण प्रकारावर कडक शब्दांत टीका केली आहे. त्यांनी याला “लेबनॉनच्या सार्वभौमत्वाचा अपमान” म्हटले आहे. राजनैतिक चर्चा सुरू असल्या तरी इस्रायलचा हा ‘एकतर्फी’ अघोषित युद्ध सराव आम्ही सहन करणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे. दक्षिण लेबनॉनमधील रस्ते सध्या आपल्या घरी परतणाऱ्या विस्थापित नागरिकांनी तुडुंब भरले आहेत, पण इस्रायलच्या नव्या हल्ल्यांमुळे हे नागरिक पुन्हा एकदा छावण्यांकडे वळण्याची भीती निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jag Arnav : भारतीय जहाजांवर ‘IRGC’चा हल्ला; इराणच्या कृत्याने भारत संतापला, दिल्लीत इराणच्या राजदूतांची ‘शाळा’
इस्रायलने केवळ हवाई हल्लेच केले नाहीत, तर यलो लाईनच्या दक्षिणेकडील बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवरही मारा केला आहे. बोगद्याच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयित व्यक्तीवर गोळीबार करून बोगद्याचे प्रवेशद्वार उद्ध्वस्त करण्यात आले आहे. इस्रायलच्या मते, शस्त्रसंधीचा अर्थ असा नाही की शत्रूला पुन्हा एकदा ताकद गोळा करू दिली जाईल. मात्र, या आक्रमक भूमिकेमुळे शांततेचा हा प्रयत्न फार काळ टिकेल असे दिसत नाही.
Ans: यलो लाईन ही एक काल्पनिक लष्करी सीमा आहे, जी इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये आपले नियंत्रण क्षेत्र आणि संभाव्य धोका वेगळा करण्यासाठी तयार केली आहे.
Ans: अमेरिकेसोबतच्या करारानुसार इस्रायलला 'आत्मसंरक्षणासाठी' कारवाई करण्याचा अधिकार मिळाला आहे, त्याचाच वापर करून ते हिजबुल्लाहच्या हालचालींवर हल्ले करत आहेत.
Ans: हिजबुल्लाहने याला लेबनॉनचा अपमान म्हटले असून, इस्रायलने हल्ले न थांबवल्यास पुन्हा एकदा मोठ्या युद्धाचा इशारा दिला आहे.






