Operation Checkmate : अमेरिकेत अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा; ३० भारतीय ट्रक चालक अटकेत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Trump on Netanyahu : नेतन्याहूंवर भडकले ट्रम्प? लेबनॉनवरील हल्ल्यांवरुन पेटला वाद
सध्या अमेरिकेत अनधिकृत भारतीय ट्रक ड्रायव्हर्सना हद्दपार करण्याची विशेष मोहिम सुरु आहे. ११ मे ते १५ मे दरम्यान अॅरिझोनाच्या युमा सेक्टरमध्ये ऑपरेशन चेकमेट राबवण्यात आले. या कारवाईदरम्यान ५२ जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये ३० भारतीय ट्रक ड्रायव्हरचा समावेश आहे. यूएस कस्टम्स अँड बॉर्ड प्रोटेक्शनने या १ जून रोजी याबाबत माहिती दिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या बेकायदेशीर स्थलांतरीतांना हद्दपार करण्याच्या धोरणाअंतर्गत ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण अमेरिकेत अवैधपणे वास्तवास (Illegal Immigrants) असलेल्या आणि व्यासायिक वाहने चालवणाऱ्यांना शोधून काढले जात आहे. यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना हद्दपार केले जात आहे.
नुकत्याच केलेल्या कारवाईत ३० भारतीय ट्रक चालकांना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तींकडे रोजगार अधिकृतता कागपत्रे होती. परंतु ती बायडेन प्रशासनाच्या काळापुरतीच मर्यादित होते. यामुळे त्यांना अटक करण्यात आली.
माहितीनुसार, ३० भारतीयांसह ५२ जणांना अट करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. त्यांना अमेरिकेतून हद्दपार केले जाण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते, आवश्यक कागपत्रांशिवाय व्यावसायिक वाहने चालवल्याने रस्ते सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यात अनेक भारतीय ट्रक चालकांना व्यावसायिक परवान्यासह अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात बेकायदेशीरपणे ट्रक चालवणाऱ्या ११ भारतीयांना पकडण्यात आले होते. डिसेंबर २०२५ मध्येही जवळपास ३० जणांवर कारवाई करण्यात आली होती. अमेरिकेत ट्रक ड्रायव्हिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये भारतीयांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. यामध्ये पंजाबी आणि शीख समुदायातील लोकांचा सर्वाधिक समावेश आहे.
Ans: अमेरिकेच्या अवैध स्थलांतरितांना हद्दपार करण्याच्या धोरणाअंतर्गत ऑपरेशन चेकमेट मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत अनधिकृतपणे वास्तव करणाऱ्या आणि आवश्यक परवानगी कारगपत्रांच्या नियमाबाबत उल्लंघन झाल्याच्या आरोपावरुन ३० भारतीयांना अटक करण्यात आली आहे.
Ans: अमेरिकन सीमा आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ऑपरेशन चेकमेट म्हणून विशेष मोहिम सुरु केली आहे. याअंतर्गत व्यावसायिक वाहने चालवणाऱ्या अनधिकृत स्थलांतरितांवर नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जात आहे.
Ans: अटक करण्यात आलेल्या ३० भारतीयांना कायदेशीर प्रक्रिया करुन अमेरिकेतून हद्दपार केली जाण्याची शक्यता आहे.






