Kim Jong Un ची दुहेरी खेळी! युद्धाच्या आगीत ओतले तेल, उत्तर कोरियाच्या 'त्या' कृत्याने अमेरिकेची झोप उडाली (फोटो सौजन्य; सोशल मीडिया)
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! US Iran युद्धाआड चीनची मोठी खेळी; सुरु केली ‘ही’ गुप्त तयारी
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने रविवारी(१९ एप्रिल) जपानच्या समुद्राच्या दिशेने कमी पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अणुउर्जा नियामक संस्थेने दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करत उत्तर कोरियाने हे कृत्य केले आहे. उत्तर कोरिया (North Korea) मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्रे विकसित करत असून ही बाब जपान आणि दक्षिण कोरियासाठी धोकादायक मानली जात आहे.
दक्षिण कोरिया(South Korea) ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाच्या सिनपो प्रदेशातून १४० किलोमीटवरुनही क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. उत्तर कोरियाच्या या चिथावणीला उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असेही दक्षिण कोरियाने म्हटले आहे.
दुसरीकडे उत्तर कोरिया क्लस्टर बॉम्ब वॉरहेड असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणीही करत आहे. कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग उन यांनी स्वत: या क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणाचे निरीक्षण केले आहे. या मिसाईल्सनी एका निर्जन बेटावर लक्ष्याचा अचूक वेध घेतला आहे. याला किम यांनी लष्करी मोहिमांची ताक वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण चाचणी म्हटले आहे.
क्लस्टर बॉम्ब असलेले क्षेपणास्त्र हवेतच फुटतात आणि डझनभर लहान बॉम्ब लक्ष्यित क्षेत्रावर डागतात. यामुळे एकाच वेळी मोठ्या परिसरात शत्रूचा नायनाट करता येतो. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाही उत्तर कोरियाने याची चाचणी केली होती. यावरुन क्लस्टर क्षेपणास्त्रांची क्षमता ६.५ ते ७ हेक्टर क्षेत्र उद्ध्वस्त करण्याची असल्याचे चित्र दिसून आले.
जगभरातील अनेक देशांनी क्लस्टर शस्त्रास्त्रांवर बंदी घातली आहे. परंतु उत्तर कोरिया, अमेरिका(America), इस्रायल आणि इराण या देशांनी या करारावर स्वाक्षरी केलीली नाही. तज्ज्ञांच्या मते, इराणमधील युद्धपरिस्थिती फायदा घेत किम जोंग उन जगासमोर आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत आहे. उत्तर कोरियाच्या या सततच्या चाचण्यांमुळे दक्षिण कोरिया आणि जपान(Japan) ची डोकेदुखी वाढली आहे. अमेरिकाही यामुळे चिंतेत आली आहे. किम जोंग उन अधिक आक्रमकपणे अण्वस्त्र कार्यक्रम राबवत असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. यामुळे जगातिक तणाव अधिक वाढला आहे.
North Korea uses cluster bombs in latest missile test: KCNAhttps://t.co/a5I2KmgBnQ — The Edition (@editionmv) April 20, 2026
Ans: उत्तर कोरियाने इराण युद्धादरम्यान खळबळजनक कृत्य केले आहे. एकीकडे जपान व दक्षिण कोरियावर कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागली आहेत. तर दुसरीकडे क्लस्टर बॉम्ब वॉरहेड असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे.
Ans: उत्तर कोरियाने दिशेने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागल्यामुळे जपानमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. अमेरिकेसाठी ही बाब चिंतेचे मानली जात आहे, कारण सध्या अमेरिका इराण युद्धात गुंतली आहे. या संधीचा फायदा घेत उत्तर कोरिया आपल्या अण्वस्त्रांची क्षमता वाढवत आहे. यामुळए आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा धोक्यात आली आहे.






