(फोटो सौजन्य: एक्स/@OpIndia_com)
वृत्तसंस्था रॉयटर्सने एक अहवला प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील सॅटेलाइट्स फोटोही देण्यात आले आहेत. यानुसार, चीनने ८० पेक्षा जास्त कॉंक्रीटचे लॉंच पॅड्स आणि अष्टकोनी आकारात ३ मोठी लष्करी तळ उभारले आहे. हे तळ अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी मोबाईल मिसाइल लॉन्चर्स, एअर डिफेन्स आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, कमांड-अँड-कंट्रोल सेंटर्स उभारले असल्याची शक्यता आहे. शिनजिंयागमधील हामी न्यूक्लियर सायलो फील्ड जवळील परिसरात ही तळे उभारण्यात आले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.
China is quietly building a vast military fortress in the deserts of Xinjiang, complete with launch pads, bunkers, communications hubs, and support facilities near its nuclear missile silos. Satellite images suggest Beijing is significantly strengthening its second-strike… pic.twitter.com/TJMRzU2Pci — OpIndia.com (@OpIndia_com) May 30, 2026
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, चीनने केवळ मिसाइलच नव्हे, तर आपली अण्वस्त्रे देखील जमिनीखाली सुरक्षित ठेवली आहेत. भविष्यातील शत्रूच्या संभाव्य अणू हल्ल्यावेळी चीनची शस्त्रे सुरक्षित रहावीत आणि आवश्य वेळी प्रतिहल्ला करता यावा हा यासाठी अशा भूमिगत सेवाला तयार केल्या जात असल्याचे म्हटले जात आहे.
न्यूक्लियर इन्फॉर्मेशन प्रोजेक्टचे डायरेक्टर आणि फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट हंस क्रिस्टेंसन यांनी म्हटले की, “मी माझ्या आयुष्यात यापूर्वी कधीही असे काही पाहिलेले नाही. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.”
चीनच्या शिनजिंयाग परिसरात कोणत्याही प्रकारची मानवी वस्ती नाही. या निर्जन भागाचा फायदा घेत चीनने हे महाकाय आणि अत्याधुनिक लष्कर तळ उभारले आहे. अमेरिका चीनमधील वाढत्या लष्तरी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ड्रॅगनच्या या हलाचालींना अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. चीनचे हे लष्करी तळ अमेरिकेला मोठे आव्हान मानलं जात आहे.
🇨🇳☢️CHINA Builds Network of 80+ Launch Pads Near Nuclear Missile Silos, Satellite Images Reveal… pic.twitter.com/wfqona9Rpu — Global Surveillance (@Globalsurv) May 29, 2026






