Oman News : १४ भारतीयांना घेऊन जाणारी बोट उलटली; अमेरिकन नौदल धावून आले मदतीला ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Oman boat accident 14 Indians rescued : आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील ओमानच्या किनाऱ्याजवळ एक अत्यंत मोठी आणि थरारक घटना समोर आली आहे. १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी ‘विराट १’ (Virat 1) ही भारतीय ध्वज असलेली पारंपारिक यांत्रिक होडी (Dhow) समुद्रात बुडाली. रास अल हद्दच्या किनाऱ्यापासून पूर्वेला सुमारे ८० सागरी मैल अंतरावर हा भीषण अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, या जहाजाचे इंजिन अचानक निकामी झाले आणि समुद्रातील प्रचंड लाटांमुळे बोट नियंत्रणाबाहेर जाऊन पाण्यात बुडू लागली. या घटनेची माहिती मिळताच भारतीय दूतावास, ओमान प्रशासन आणि अमेरिकन नौदलाने संयुक्तपणे वेगाने मदत कार्य सुरू केले.
सुदैवाने, जहाजावरील सर्व १४ भारतीय नाविक अत्यंत हुशार आणि प्रशिक्षित होते. बोट बुडत असल्याचे लक्षात येताच, सर्व क्रू मेंबर्सनी तात्काळ जहाजावरील ‘लाइफ राफ्ट’ (तातडीच्या प्रसंगी वापरायची बचाव नौका) समुद्रात सोडली आणि सुरक्षितपणे त्यात प्रवेश केला. यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. मस्कत येथील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर या घटनेला अधिकृत दुजोरा दिला असून सर्व नाविक सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.
सागरी सुरक्षेच्या यंत्रणेला या अपघाताचा आपत्कालीन संदेश (Distress Signal) मिळताच, परिसरात तैनात असलेले अमेरिकन नौदलाचे ‘पी-८’ (P-8) सागरी देखरेख विमान तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. अमेरिकन विमानाने हवेतूनच समुद्रात तरंगणारे अतिरिक्त जीवनरक्षक तराफे आणि आवश्यक सुरक्षा साहित्य खाली टाकले, जेणेकरून भारतीय नाविकांना समुद्राच्या लाटांमध्ये सुरक्षित आश्रय मिळू शकेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : MT Celestial : पाण्याच्या थंड बाटल्या अन मृतदेह! युद्धाच्या आगीत ओमान बंदरातील ‘त्या’ जहाजावरील थरकाप उडवणारी भीषण वास्तवता
त्याच वेळी, सेंट किट्स आणि नेव्हिसचा ध्वज असलेले ‘एमव्ही जबेल अली ९’ (MV Jebel Ali 9) हे अजस्त्र व्यापारी जहाज ओमानच्या सोहार बंदरावरून भारताची आर्थिक राजधानी मुंबईकडे जात होते. या जहाजाच्या कॅप्टनने मदतीची हाक ऐकली आणि आपले जहाज तात्काळ अपघातग्रस्त क्षेत्राकडे वळवले. या जहाजाने आणि ओमानच्या नौदलाने संयुक्त प्रयत्नांतून सर्व १४ भारतीय नाविकांना सुखरूप बाहेर काढले.
As per inputs received from US Navy, a dhow MSV Virat 1 with 14 Indians sinking in position about 80 nm from Ras Al Hadd on 14 Jun 2026. Indian navy vessels have been diverted towards the location of the sinking show. US P8 dropped a life raft and monitored the crew embarking… pic.twitter.com/5YlQzE38cI — ANI (@ANI) June 14, 2026
credit – social media and Twitter
सध्या पश्चिम आशिया आणि आखाती देशांच्या सागरी क्षेत्रात (विशेषतः इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे) परिस्थिती कमालीची तणावपूर्ण बनलेली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जहाजाचा अपघात झाल्याने सुरुवातीला यंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण होते. यापूर्वी ओमानच्याच समुद्रात भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या ३ परदेशी जहाजांवर (ज्यामध्ये एमटी मारिव्हेक्स आणि एमटी सेटबेलो यांचा समावेश आहे) अमेरिकन नौदलाने इराणवरील निर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून कारवाई केली होती, ज्यामध्ये दुर्दैवाने ३ भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: ‘होर्मुझ नाकेबंदीचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही’ भारताच्या नाराजीवर US परराष्ट्र सचिव रुबियो यांचे वक्तव्य
परंतु, या ताज्या ‘विराट १’ जहाजाच्या दुर्घटनेचा कोणत्याही लष्करी हल्ल्याशी किंवा संघर्षाशी संबंध नसून, हा केवळ तांत्रिक बिघाड आणि इंजिन फेल्युअरमुळे झालेला शुद्ध अपघात असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि सागरी सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. सर्व १४ भारतीय नाविक सुरक्षित असून त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यासाठी ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे.






