गुन्हेगारांची उलटगणती सुरू! भारताच्या ‘ऑपरेशन ग्लोबल हंट’ने उडवली आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची झोप ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Mohammad Salim Dola arrested Turkey 2026 : भारतात गुन्हे करून परदेशात लपून बसलेले गुन्हेगार, माफिया आणि अंमली पदार्थ तस्कर यांच्याविरोधात भारतीय तपास यंत्रणांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय मोहीम उघडली आहे. ‘ऑपरेशन ग्लोबल हंट’ (Operation Global-Hunt) असे या मोहिमेचे नाव असून, याद्वारे परदेशात बसून भारतातील तरुणाईला विळखा घालणाऱ्या ड्रग सिंडिकेट्सच्या मुळावर घाव घातला जात आहे. या मोहिमेमुळे आता फरार गुन्हेगारांना त्यांची गुन्हेगारी कृत्ये लपवणे अशक्य होणार आहे.
या मोहिमेचे सर्वात मोठे यश म्हणजे दाऊद इब्राहिमचा अत्यंत जवळचा सहकारी आणि आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया मोहम्मद सलीम डोला याचे प्रत्यार्पण होय. ५९ वर्षीय सलीम डोला याला तुर्कीमधील इस्तंबूल येथून विशेष मोहिमेद्वारे भारतात आणण्यात आले. डोला याच्यावर भारतात अनेक अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल होते आणि तो गेल्या अनेक वर्षांपासून फरार होता. मार्च २०२४ मध्ये इंटरपोलने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस (Red Notice) जारी केली होती. डोलाच्या अटकेमुळे हे स्पष्ट होते की, भारतीय यंत्रणा आता केवळ भारतात बसून तपासाची वाट पाहणार नाही, तर सातासमुद्रापार जाऊन गुन्हेगारांना पकडण्यात येईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Epstein Files: काबाच्या पवित्र कापडाचा एपस्टाईनने ‘असा’ केला वापर; बेटावरील ‘मशीद’ आणि सौदी राजघराण्याच्या संबंधाचे रहस्य उघड
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने एक ३ वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. या मोहिमेअंतर्गत एनआयए (NIA), ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि एनसीबी या सर्व केंद्रीय यंत्रणा इंटरपोल आणि इतर जागतिक गुप्तचर संस्थांच्या समन्वयाने काम करत आहेत. परदेशात बसून भारतात अमली पदार्थ, सायबर गुन्हे, आणि आर्थिक घोटाळे करणाऱ्या सुमारे १०० मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना टार्गेट केले जात आहे.
या मोहिमेत केवळ प्रत्यार्पण प्रक्रियेवर अवलंबून न राहता, गुन्हेगारांची परदेशातील संपत्ती गोठवणे आणि त्यांना विशेष विमानांद्वारे थेट भारतात आणून खटला चालवणे यावर भर दिला जात आहे. यामध्ये सिल्व्हर नोटीसचा वापर करून संशयितांवर बारीक नजर ठेवली जात आहे.
#WATCH | Kargil | Union Home Minister Amit Shah says, “We want this border region to become self-reliant… The entire country knows about the history of Bharat Scouts, from Kashmir to Kanyakumari and from Dwarka to Kamakhya. Every citizen of India admires and appreciates the… https://t.co/DniagsA77X pic.twitter.com/lGHTda39UV — ANI (@ANI) May 1, 2026
credit – social media and Twitter
तपास यंत्रणांच्या रडारवर अनेक मोठी नावे आहेत, ज्यामध्ये आसिफ इक्बाल मेमन, हाजरा इक्बाल मेमन, जुनेद इक्बाल मेमन, हरमीत सिंग, प्रदीप सिंग, परमजीत धालीवाल, सनी गोसाल्विस, जसविंदर सिंग, टिसन बिश्नोई, हाजी सलीम आणि संदीप धुनिया यांसारख्या गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांनी केवळ भारतातच नव्हे, तर दुबई, कॅनडा आणि युरोपमध्ये आपले जाळे पसरवले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Heritage: देशाचे वैभव परतले! कोहिनूर वादाच्या पार्श्वभूमीवर महासत्तेकडून भारताला मोठी भेट; 657 प्राचीन कलाकृतींची घरवापसी
सरकारी आकडेवारीनुसार, २०२५ च्या एका वर्षात सुमारे १,३३,००० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांचे बाजारमूल्य २,००० कोटींपेक्षा जास्त आहे. ‘ऑपरेशन ग्लोबल हंट’ सुरू झाल्यापासून अमली पदार्थांच्या तस्करीला मोठा आळा बसला आहे.






