भारताने पराभव स्वीकारावा...! पुन्हा पाकिस्तानच्या 'या' बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan Threatens India : इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानला (Pakistan) ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) मोहिम राबवत आणि नंतर चांगला धडा शिकवला आहे. पण पाकिस्तान मात्र काही सुधारण्याचे नाव घेईना. पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याने भारताला पोकळ धमकी दिली आहे. भारतसोबतच्या युद्धात पाकिस्तानचाच विजय झाल्याचा भ्रम पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बाळगला आहे. संपूर्ण जगभरच एकच गरळ ओकत ते फिरत आहेत. असीम मुनीर, बिलावल भूट्टो, पंतप्रधान शाहबाज यांच्यानंतर आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी भारताविरोधी विधान केले आहे.
Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
इशाक दार यांनी पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचा प्रदेश सुरक्षा पुरवठादाराचा भ्रम मोडला असल्याचे म्हटले आहे. भारत पाकिस्तान युद्धात त्यांचाच विजय झाला असून भारताने पराभव स्वीकारावा असे इशाक दार यांनी म्हटले आहे. सध्या ते लंडनच्या अधिकृत दौऱ्यावर असून लंडनमध्ये पत्रकार परिषदेते बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
परराष्ट्र मंत्री ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. यावेळी लंडनच्या एक पक्षकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले की, “भारतासोबतच्या लष्करी संघर्षात पाकिस्तान विजयी झाला आहे.” त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी भारतामुळेच युद्ध सुरु झाले होते आणि त्यांचा पराभव झाला असून त्यांनी तो स्वीकारावा असे म्हटले आहे. इशाक दार यांनी दावा केला आहे की, भारतीय माध्यमांनी हे मान्य केले आहे. तर पाकिस्तान तथ्यांवर आणि सत्यावर आधिरातच हा दावा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
२२ एप्रिल २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला होता. यामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. भारताने यानंतरच्या पाकिस्तानच्या हल्ल्यांनाही चोख प्रत्युत्तर दिले होते.
पाकिस्तानला मोठा पराभव पत्कारावा लागला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी उघडपणे हे स्वाकारही केले होते. परंतु तरीही पाकिस्तान सुधारलेला नसून भारताच्या विजयाला नाकारत आहे. भारताने संपूर्ण जगासोमर पुरावे सादर करुनही पाकिस्तान पराभव मान्य करण्यास तयार नाही. पाकिस्तानचे अधिकारी भारताला एकमागून एक धमकी देतच आहेत.
इशाक दार यांनी पुन्हा जुने गाऱ्हाने गात बढाई मारली आहे. पाकिस्तान नेहमीच दहशतवादविरोध उभा राहिला आहे. तसेच सर्व देशांच्या सन्मान, प्रतिष्ठा, सार्वभौवत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी उभा राहिला आहे. यामुळे इतरांकडूनही हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे अधिकारी उघडपणे खोटे बोलत असून त्यांचा पुन्हा एकदा अपमान झाला आहे.