फोटो सौजन्य - सोशल मीडिया
CBSE 12th Physics Answer Sheet Mismatch:“मी सीबीएसई इयत्ता १२ वीचा विद्यार्थी आहे. भौतिकशास्त्र (Physics) विषयात अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाल्यामुळे आम्ही सीबीएसईच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेद्वारे माझ्या उत्तरपत्रिका मिळवण्याकरिता अर्ज केला होता. ही उत्तरपत्रिकेची प्रत मिळाल्यानंतर मी खूप निराश झालो आहे, कारण सीबीएसईने अपलोड केलेली भौतिकशास्त्राची उत्तरपत्रिका माझी नाहीच.” असे लिहीत १२ वीच्या एका विद्यार्थ्याने सोशल मीडिया ‘एक्स’वर (ट्विटर) सीबीएसईने अपलोड केलेल्या त्याच्या भौतिकशास्त्रच्या उत्तरपत्रिकेची कॉपीचा फोटो शेअर केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, ती अक्षरे त्यांची नाहीत आणि भौतिकशास्त्रची कॉपीही त्याची नाही. या प्रकारामुळे सीबीएसईच्या ओएसएम (OSM – On-Screen Marking) सिस्टीमवर आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
गेल्या वर्षांच्या ७ तुलनेत यंदाच्या निकाल इतका खराब लागण्यामागचे कारण या वर्षापासून सुरू झालेली ऑनस्क्रिन मार्किंग प्रणाली असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांना स्कॅन उत्तरपत्रिका मिळवण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारिख २५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत होती. मात्र, या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागले होते.
वेदांत नावाच्या १२ वीच्या विद्यार्थ्याने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, सीबीएसईने दिलेली भौतिकशास्त्राची उत्तरपत्रिका माझी अजिबात नाही. मला पक्के माहित आहे की, हे माझे अक्षर नाही आणि यामध्ये ते प्रश्न देखील नाहीत, जे मी परीक्षेत सोडवण्याचा प्रयत्न केला होता. केवळ मीच नाही तर माझे कुटुंब, शिक्षक आणि माझे अक्षर ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने यातील फरक त्वरित ओळखला आहे.
I am a CBSE Class 12 student. After receiving unexpectedly low marks in Physics, we applied for photocopies of my answer sheets through the CBSE reevaluation process. Today we received the copies. And I am shattered because the Physics answer sheet uploaded by CBSE is not mine — VEDANT (@VEDANTSHRIV17) May 23, 2026
विद्यार्थ्याने पुढे सांगितले की, आम्ही या भैतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकेची तुलना अत्यंत काळजीपूर्वक खालील गोष्टींशी करून पाहिली माझी इंग्रजीची उत्तरपत्रिका आणि कॉम्प्युटर सायन्सच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर तंतोतंत जुळले. परंतु, भौतिकशास्त्राची ही उत्तरपत्रिका मात्र दुसऱ्याच कोणाचीतरी असल्याचे दिसत आहे.






