Russia Ukraine War : युक्रेनची राजधानी पुन्हा रशियाच्या निशाण्यावर; बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांनी हादरले कीव्ह (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्टनुसार, रशियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी कीव्हवर मारा केला असून या हल्ल्यात होलोसीवस्की जिल्ह्यात मोठी आग लागली होती. याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी आणि परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न झाले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हा हल्ला पॅरिसमध्ये झालेल्या कोअॅलिशन ऑफ विलिंग या बैठकीनंतर एका दिवसात झाला. या बैठकीत युक्रेनला अधिक लष्करी मदत देणे, हवाई संरक्षण क्षमता मजबूत करणे आणि रशियावर युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्यावर चर्चा झाली होती.
गेल्या काही आठवड्यांपासून रशियाचे युक्रेनवर क्षेपणास्त्रे हल्ले सुरुच आहे. रशियाने क्षेपणास्त्रांसह ड्रोनद्वारेही हल्ले केले असून याची तीव्रता अत्यंत भीषण आहे. युक्रेनची राजधानी कीव्हला सतत लक्ष्य केले जात आहे. यामध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून यांना रोखणे युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
यापूर्वी १ ते २ जुलैच्या मध्यरात्री रशियाने केलेल्या हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू झाला होता. यानंतरही रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले सुरुच ठेवले. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रशियाच्या वाढत्या हल्ल्यांना रोखण्यासाठी दहा युरोपीय दशांनी संयुक्त अँटी-बॅलेस्टिक संरक्षण व्यवस्था विकसित करण्यासाठी नव्या युतीची घोषणा केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. रशियाच्या बॅलेस्टिक आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा सामना करण्यासाठी युक्रेनला अधिक आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेची गरज असल्याचे झेलेन्स्की यांनी अधोरेखित केले.
US Iran Conflict : ‘आम्ही संरक्षण करु, पण…,’ होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका? इराणला रोखण्याचा दावा






