सिडनी : स्वस्तिक (Swastik) हे भारतीय संस्कृतीसह (Indian Culture) हिंदू धर्मात (Hindu) श्रद्धेचे चिन्ह (Symbol Of Faith) आहे. मात्र, ऑस्ट्रेलियातील (Australia) दोन राज्यांनी या चिन्हावर बंदी (Ban) घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हे चिन्ह नाझींचे प्रतीक (Nazi Symbol) असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियाने स्वस्तिक हे चिन्ह गुन्हेगारीच्या श्रेणीत ठेवले आहे. गार्डियनच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या दोन राज्यांमध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्यात आली आहे. येथे स्वस्तिक चिन्ह कोणत्याही प्रकारे दाखवणे हा गुन्हा मानला जाणार आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड आणि तस्मानियानेही स्वस्तिकावर बंदी घालण्याची चर्चा केली. ऑस्ट्रेलियाने हा निर्णय अचानक घेतला नसून, त्यावर बंदी घालण्याची तयारी आधीच सुरू होती.
अहवालानुसार, सुमारे एक वर्षाच्या चर्चेनंतर आणि विविध समुदायांशी सल्लामसलत केल्यानंतर, आणलेले विधेयक व्हिक्टोरिया राज्याच्या संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केले. याअंतर्गत राज्यात नाझी चिन्हे दाखवणे गुन्हा ठरला आहे. नाझी प्रतीक बंदी विधेयक २००२ ला मंगळवारी संसदेने मंजुरी दिली. नाझी स्वस्तिकने यहुदी धर्मासह समुदायाच्या सदस्यांना हानी पोहोचवली, असे न्यू साउथ वेल्सचे ॲटर्नी जनरल मार्क स्पीकमन यांनी संसदेत सांगितले.