Terror Alert: बांगलादेश हवाई दलात 'TTP'ची एन्ट्री? ढाका हवाई तळावर मध्यरात्री मोठे छापे; १० जवान ताब्यात, ४ जण परदेशात फरार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Bangladesh Air Force high alert 2026 : दक्षिण आशियाई राजकारणात आणि सुरक्षेच्या संदर्भात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेश हवाई दलाच्या (BAF) अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या तळांवर चक्क दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने आपली पाळेमुळे रुजवल्याचे उघड झाले आहे. या माहितीनंतर बांगलादेशातील संरक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, हवाई दलाच्या गुप्तचर विभागाने आपल्याच कर्मचाऱ्यांविरुद्ध एक मोठी शोधमोहीम राबवली आहे.
२० एप्रिलच्या पहाटे जेव्हा संपूर्ण ढाका झोपले होते, तेव्हा हवाई दलाच्या गुप्तचर विभागाने ढाका येथील किमान दोन प्रमुख हवाई तळांवर छापे टाकले. या कारवाईत २ वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून १० कनिष्ठ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. या छाप्यांदरम्यान अनेक धक्कादायक कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे हाती लागले आहेत, जे थेट दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे समजते. विशेष म्हणजे, ज्या वेळी ही कारवाई झाली, तेव्हा बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान हे मलेशियाच्या अधिकृत दौऱ्यावर होते, त्यामुळे या कारवाईचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Strait: कोण म्हटलं माकड इराणच्या बाजूने? होर्मुझमोहिमेवर जाणाऱ्या US Navyच्या सैनिकासोबत घडले ‘असे’ विपरीत अन् तो चक्क…
गुप्तचर विभागाला संशय आहे की, हवाई दलातील काही कर्मचारी टीटीपी (TTP) च्या विचारांनी प्रेरित झाले असून ते स्लीपर सेल्स म्हणून काम करत होते. या कारवाईची कुणकुण लागताच हवाई दलातील ९ ते १० कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील ४ हवाई सैनिक आधीच पाकिस्तान, पोर्तुगाल, तुर्की आणि न्यूझीलंड सारख्या देशांत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. हे जवान कॉक्स बाजार, चिटगाव आणि जेस्सोर सारख्या संवेदनशील तळांवर तैनात होते. या जवानांनी हवाई दलाची गुप्त माहिती दहशतवाद्यांना पुरवली असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Embassy: ‘कभी इंडिया आके देखो…’ भारताला नरक’ बोलणाऱ्या ट्रम्पना इराणने दाखवली जागा; केले ‘असे’ धडाकेबाज Tweet
हवाई दलातील या ‘घरभेदी’ प्रकरणामुळे सर्वच अधिकाऱ्यांची रजा तूर्तास रद्द करण्यात आली आहे. कनिष्ठ कमिशन्ड अधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात आले आहेत की, सर्व एअरक्राफ्टमन आणि कनिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त करून ते तातडीने संरक्षण मुख्यालयात जमा करावेत. या जवानांच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि कॉल रेकॉर्ड्सची कसून चौकशी केली जात आहे. टीटीपी, जी संघटना पाकिस्तानच्या लष्करावर हल्ले करण्यासाठी कुख्यात आहे, तिचा बांगलादेश हवाई दलात शिरकाव होणे ही केवळ बांगलादेशासाठीच नव्हे, तर भारतासारख्या शेजारील देशासाठीही चिंतेची बाब आहे.






