Vidhi Megha Death: कॅनडातील नायगारा येथे भारतीय विद्यार्थ्याची हत्या; पोलिसांनी आरोपीला केली अटक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Indian Student Killed in Niagara 2026 : परदेशात उच्च शिक्षण घेऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्वल करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका भारतीय लेकीचा कॅनडात (अत्यंत वेदनादायक अंत झाला आहे. कॅनडातील (Canada) नायगारा प्रांतातून एक अशी सुन्न करणारी घटना समोर आली आहे, ज्याने केवळ गुजरातच नव्हे तर संपूर्ण भारताला हादरवून सोडले आहे. सेंट कॅथरिन्स येथे राहणाऱ्या २३ वर्षीय भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनी विधी कल्पेशकुमार मेघा हिची एका घरात घुसून चाकूने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आपल्या पोटच्या गोळ्याच्या अचानक जाण्याने भारतातील तिच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, टोरोंटो येथील भारतीय दूतावास आता या कठीण काळात कुटुंबाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
मृत विद्यार्थिनीची ओळख विधी कल्पेशकुमार मेघा अशी पटली असून ती मूळची गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील रहिवासी होती. विधी गेल्या चार वर्षांपासून कॅनडामध्ये राहून आपले उच्च शिक्षण पूर्ण करत होती. इतर हजारो भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणेच ती देखील तिथे आपले करियर घडवण्यासाठी अहोरात्र कष्ट करत होती. १५ मे रोजी सेंट कॅथरिन्स येथील लेकशोर रोड आणि लेक स्ट्रीट परिसरातील एका निवासस्थानी हा रक्ताचा थरार घडला. पोलिसांना स्थानिक रहिवाशांकडून एका घरात मोठा वाद आणि आरडाओरडा होत असल्याची तक्रार मिळाली होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Deal: ‘तुमच्या कुटुंबाला माझा…’ डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली सिच्युएशन रूममध्ये तातडीची बैठक; इराणबाबत अंतिम निर्णय घेणार
नायगारा प्रादेशिक पोलीस सेवेचे गणवेशधारी अधिकारी जेव्हा माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले, तेव्हा घराचे दृश्य पाहून त्यांचेही काळीज चर्र झाले. घरात विधी मेघाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. तिच्या शरीरावर चाकूने गंभीर वार करण्यात आले होते. पोलिसांनी जेव्हा घराची झडती घेतली, तेव्हा विधीच्या मृतदेहाजवळ आणखी एक वृद्ध व्यक्ती गंभीररीत्या जखमी अवस्थेत आढळून आली. अधिकाऱ्यांनी वेळ न गमावता त्या जखमी वृद्धाला तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने, या वृद्ध व्यक्तीच्या जखमा जीवघेण्या नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
#REPORT: Niagara Police Charge 40-YO Joshua St Omer With Second Degree Murder Of 22-YO Vidhi Megha, An International Student From📍Gujrat, India. 🕊️ Police Responded To Reports Of 2 People Without Vitals At A Residence In📍 St.Catharines. Upon Arrival Megha Was Located Deceased,… https://t.co/DIOs05dyf5 pic.twitter.com/da8EP2VDpM — 401_da_sarpanch (@401_da_sarpanch) May 29, 2026
credit – social media and Twitter
गुजरातच्या आनंद येथे राहणाऱ्या विधीच्या वडिलांनी स्थानिक माध्यमांना आणि वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या संपूर्ण धक्कादायक घटनेमागचे भीषण वास्तव उघड केले. त्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने सांगितले की, १६ मे रोजी त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यातून या दुःखद घटनेची अधिकृत माहिती मिळाली. विधी ज्या घरात राहत होती, तिथे एक ड्रग्ज डीलर पैशांची वसुली करण्यासाठी आला होता. जेव्हा पैसे देण्यास नकार दिला गेला, तेव्हा त्याने संतप्त होऊन घरात असलेल्यांवर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात विधीचा जागीच मृत्यू झाला. आपल्या लाडक्या लेकीचा मृतदेह डोळे भरून पाहता यावा आणि तिच्यावर भारतीय परंपरेनुसार अंतिम संस्कार करता यावेत, यासाठी तिच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला तिचे पार्थिव लवकरात लवकर मायदेशी आणण्याचे भावनिक आवाहन केले आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून नायगारा पोलिसांच्या हत्या तपास पथकाने (Homicide Unit) तात्काळ तपास चक्रे फिरवली. पोलिसांनी घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आणि १८ मे रोजी मोठी कारवाई करत सेंट कॅथरिन्स येथील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय जोशुआ सेंट ओमर (Joshua St. Omar) या नराधमाला अटक केली. पोलिसांनी त्याच्यावर द्वितीय श्रेणीच्या खुनाचा (Second-Degree Murder) गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या हत्येमागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा शोध घेण्यासाठी कॅनेडियन गुप्तहेर सखोल चौकशी करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mount Everest: एव्हरेस्टवर मृत्यू पावलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह परत का आणले जात नाहीत? विज्ञान नाही, पण ‘हेच’ आहे मुख्य कारण
टोरोंटो येथील भारतीय दूतावासाने (Consulate General of India) या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. दूतावासाने शोकाकुल मेघा कुटुंबाप्रती आपली संवेदना प्रकट केली असून, विधीचे पार्थिव सुरक्षितपणे आणि सन्मानाने भारतात परत पाठवण्यासाठी कॅनडातील आणि भारतातील अंत्यसंस्कार गृहांच्या (Funeral Homes) ते सातत्याने संपर्कात आहेत. सर्व प्रकारची कायदेशीर कागदपत्रे आणि औपचारिकता लवकरात लवकर पूर्ण केली जात असून, येत्या काही दिवसांत विधीचे पार्थिव गुजरातमध्ये आणले जाण्याची शक्यता आहे. कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याने, आता तेथील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Ans: मृत विद्यार्थिनीचे नाव विधी कल्पेशकुमार मेघा असून ती २३ वर्षांची होती आणि मूळची गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील रहिवासी होती.
Ans: नायगारा पोलिसांनी सेंट कॅथरिन्स येथील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय जोशुआ सेंट ओमर या संशयिताला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Ans: विधीच्या वडिलांच्या दाव्यानुसार, एका ड्रग्ज डीलरने पैशांची मागणी केली होती आणि ती नाकारल्याने त्याने घरात घुसून चाकूने हा प्राणघातक हल्ला केला.






