2003 साली फर्स्टक्लासमध्ये डेब्यू
2005 साली भारतीय संघाची दार उघडली
टी-20 मध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज
Suresh Raine : टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैनाने आपल्या इंटरनॅशन करिअरमध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावे रचले आहेत. तो टी-20 इंटरनॅशनलमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज राहिला आहे. त्यासोबतच त्याने वनडे विश्वचषकात 2011 मध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सुरेश रैनाचा जन्म 27 नोव्हेंबर 1986 ला उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर येथे झाले. रैनाला क्रिकेटची आवड आपला मोठा भाऊ मुकेशला क्रिकेट खेळताना निर्माण झाली. तो मुरादनगरच्या वीनस क्रिकेट क्लबमध्ये भावासोबत जायचा. रैनाने लगेचच या खेळात आपलं करिअर घडवायचं असा निर्णय घेतला.
त्याला क्रिकेटमधील बारकावे कळू लागले. तो क्लब पातळीवर चांगला खेळू लागला. त्यामुळे लवकरच त्याने उत्तर प्रदेशच्या अंडर-16 संघात आपली जागा निर्माण केली. अंडर-17 आणि अंडर-19 मधील दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये आपला डेब्यू 2003 साली केला.
स्थानिक क्रिकेटमध्ये रैनाने सलग आपल्या फलंदाजीने निवड समितीसह क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केले. 109 फर्स्ट-क्लास सामन्यात रैनाने 42.15 च्या सरासरीने 6,871 धावा केल्या. या काळात त्याने 18 शतकं आणि 45 अर्धशतकं झळकावली.
डेब्यू केल्याच्या अवघ्या दोन वर्षांतच रैना भारतीय निवड समितीच्या नजरेत आला. अशाप्रकारे रेनाला भारतीय संघात पहिल्यांदा 2005 साली समाविष्ट करण्यात आले. त्याने आपला इंटरनॅशनल डेब्यू श्रीलंकेविरुद्ध 2005 साली केले. त्याच्या एक वर्षानंतर म्हणजेच 2006 साली रैनाने आपला पहिला टी-20 इंटरनॅशनल सामना खेळला. त्याने आपली आक्रमक फलंदाजी शैली आणि विचारात्मक खेळीच्या जोरावर भारतीय संघातील आपली जागा पक्की केली.
2 मे 2010 साली टी-20 विश्वचषक सामन्यात साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळताना रैनाने शतकीय खेळी केली. तो क्रिकेटच्या या सर्वात छोट्या फॉरमेटमध्ये ही किमया करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला होता. त्याचनुसार रैनाने आणखीन एक विक्रम रचलेला, तो म्हणजे क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. त्याने या सामन्यात 60 चेंडूंत 101 धावा केल्या होत्या.
तसेच वनडे विश्वचषकातही 2011 साली भारतीय टीमला चॅम्पियन बनवण्यास त्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्याने क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 34 धावांची महत्त्वपूर्ण फलंदाजी केली, तर सेमिफायनलमध्ये अखेरच्या ओव्हर्समध्ये त्याच्या द्वारे करण्यात आलेल्या 36 धावांची खेळी भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण सिद्ध झाली.
इतकचं नव्हे तर रैनाने 2013 साली खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही शानदार कामगिरी केली होती. त्याचमुळं भारतीय टीम पहिल्याच वर्षी ही ट्रॉफी जिंकण्यास यशस्वी राहिला होता. रैनाने भारतासाठी खेळवलेल्या 226 वनडे सामन्यात 35.31 च्या सरासरीने 5,615 धावा केल्या आहेत. तसेच, 78 टी-20 सामन्यात त्याने 134 च्या स्ट्राईक रेटने 1,605 धावा केल्या.
क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉर्मेटमध्ये रैनाला फक्त 16 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने येथे 768 धावा केल्या आहेत. तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने एकूण 7 शतक आणि 48 अर्धशतक झळकावली आहेत. रैनाने एमएस धोनीसोबत 15 ऑगस्ट 2020 साली इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.