संपूर्ण देशाच्या नजरा खिळल्या आहेत त्या उत्तर प्रदेशच्या निकालावर. उत्तर प्रदेधाात भाजप आघाडीवर आहे. 403 जागांच्या उत्तर प्रदेशात काँग्रेसचा लाजीरवाणा परभव पहायला मिळत आहे. बेटी हू लढ सकती हू अशी टॅग लाईन घेऊन मोठ्या जोशात उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रियंका गांधीचा दणदणीत पराभव झाला आहे. उत्तर प्रदेशात विरोधी पक्षात जाणेही काँग्रेससाठी मुश्किल झाले आहे. राहुल गांधींपाठोपाठ आता त्यांची बहिण प्रियांका गांधी देखील सपशेल अपयशी ठरल्या आहेत(Rahul and Priyanka Gandhi’s Politics THE END? Congress’s embarrassing defeat).
राहुल गांधी यांनी 2004 मध्ये देशाच्या राजकारणाला एन्ट्री. राहुल यांचा चेहरा पुढे करून पक्षाने गेल्या लोकसभा निवडणुकांसह अनेक विधानसभा निवडणुकाही लढवल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या जागा राहुल यांच्या नेतृत्व क्षमतेची ओळख देण्यासाठी पुरेशा आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये खातेही उघडता आले नव्हते.
यूपी आणि बिहारसारख्या राज्यांना केवळ 1-1 जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभेच्या 52 जागांसह काँग्रेस पक्ष दुसऱ्या सर्वात खालच्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी 44 जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी राहुल यांच्या नेतृत्वाखाली समोर आली.
विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापन करूनही पक्ष टिकू शकला नाही. त्यामुळे राजकारणाच्या दुनियेत राहुल-प्रियांका ही जोडी बॉलीवूडमध्ये सतत फ्लॉप चित्रपट देऊन इंडस्ट्रीतून बाहेर पडणारी जोडी दिसत आहे.
मतदारांचा काँग्रेसवरील विश्वास उडत चालला आहे. काँग्रेस हा लोकसभेतील विरोधी पक्षनेता होण्याच्या लायकीचा पक्षही नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले होते. आज पक्षाची अवस्था अशी झाली आहे की, जुने नेतेही त्यांच्यापासून दूर जाऊ लागले आहेत. सततच्या पराभवानंतर आता पक्षाच्या अस्मितेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.
2018 हे वर्षही काँग्रेससाठी अशुभ ठरले. या वर्षात ईशान्येतही पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाचे अस्तित्व वाचवण्यासाठी राहुल गांधींनी ईशान्येत अनेक रॅली काढल्या, मात्र येथे त्यांना यश आले नाही. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये पक्षाला मोठा फटका बसला.
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]