(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर RBI बाबत विविध बातम्या व्हायरल होत आहेत. अशाच एका वृत्तानुसार, RBI लवकरच कागदी चलनी नोटांवर बंदी घालून त्याऐवजी प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याचं बोललं जात आहे. जरी सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी सोशल मीडियावर या बंदीसाठीच्या विशिष्ट तारखांची चर्चा सुरू झाली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांमध्ये बरीच खळबळ उडाली आहे. पण या बातम्या खऱ्या आहेत का? RBI नेमकं काय म्हणालं? समजून घेऊयात.
सोशल मीडियावर एक बातमी वेगाने पसरत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, RBI ३० जूनपासून कागदी चलनावरील बंदी घालणार असून त्याऐवजी त्याच तारखेपासून प्लास्टिक चलन आणणार आहे. या बातमीमुळे लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात घबराट निर्माण झाली आणि अनेकांना २०१६ मधील नोटाबंदीची आठवण झाली. मात्र, ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता सरकारने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हा व्हिडिओ सरकारच्या अधिकृत संस्थेच्या, म्हणजेच PIB च्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून शेअर करण्यात आला होता आणि त्यांनी तो पूर्णपणे बनावट असल्याचे जाहीर केले आहे. वस्तुस्थिती स्पष्ट करताना या संस्थेने म्हटले आहे की, “हा दावा पूर्णपणे खोटा आहे. RBI च्या म्हणण्यानुसार, ३० जून २०२६ पर्यंत कागदी चलन मागे घेण्याची किंवा त्याऐवजी प्लास्टिकच्या नोटा आणण्याची कोणतीही योजना नाही.
शिवाय, अशा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचा सल्लाही या संस्थेने लोकांना दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अचूक माहितीसाठी नेहमी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून तिची खात्री करा. भारत सरकारशी संबंधित संशयास्पद माहितीची पडताळणी PIB Fact Check द्वारे करा.”
Share Market Closing: शेवटच्या तासात बदललं Share Market चं चित्र; Sensex Nifty ची काय स्थिती?






