(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
HDFC Bank Interest Rate: RBI ने रेपो रेट स्थिर ठेवले असले तरीही मात्र देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने, एचडीएफसीने, आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. परिणामी, ग्राहकांना आता घर, कार किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. बँकेने आपला मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) ५-१० बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे. हे नवीन दर ८ जून २०२६ पासून लागू झाले आहेत. नेमका काय आहे दर? समजून घेऊयात.
निर्णयाचा परिणाम अशा ग्राहकांवर होईल ज्यांची घर, कार किंवा वैयक्तिक कर्जे एमसीएलआरशी जोडलेली आहेत. या ग्राहकांना एकतर ईएमआयमध्ये वाढ किंवा कर्ज परतफेडीच्या कालावधीत वाढ अनुभवावी लागू शकते. RBI ने आपल्या पतधोरण निवेदनात रेपो दर ५.२५% वर अपरिवर्तित ठेवल्यानंतर एचडीएफसी बँकेने हा निर्णय घेतला. या निर्णयाचा रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडलेल्या कर्जांवर परिणाम होणार नाही.
बँकेचा एमसीएलआर आता विविध कालावधीसाठी ८.०५% वरून ८.६५% पर्यंत वाढला आहे.
ओव्हरनाइट – ८.०५% वरून ८.१०%.
३-महिन्यांचा एमसीएलआर – आता ८.२०%.
६-महिन्यांचा एमसीएलआर – ८.३५% पर्यंत वाढला.
१-वर्षाचा एमसीएलआर – ८.३५% वरून ८.४०% पर्यंत वाढला.
२-वर्षांचा एमसीएलआर – ८.४५% वरून ८.५५% पर्यंत वाढला.
३-वर्षांचा एमसीएलआर – आता ८.६५%.
जर तुमचे गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज MCLR शी जोडलेले असेल, तर पुढील रीसेट तारखेला तुमचा मासिक EMI आपोआप वाढेल किंवा कर्जाचा कालावधी वाढेल. जर तुमचे कर्ज बाह्य बेंचमार्कशी, म्हणजेच थेट RBI रेपो रेटशी जोडलेले असेल, तर या वाढीचा तुमच्यावर परिणाम होणार नाही.
पेट्रोल – डिझेलचे दर धडाधड कोसळणार… भारतासाठी आली Good News, जुलैनंतर असं काय घडू शकतं ?






