(फोटो सौजन्य: Chatgpt)
Oil prices India : जगाला महागाईने विळखा घातला आहे आणि या सगळ्याचा मुख्य कारण ते म्हणजे कच्च तेल. कच्च्या तेलाच्या किमती वाढतच चालल्या आहेत. भारतच नव्हे तर जगभरात गेल्या 100 दिवसांपासून कच्च्या तेलाचीच चर्चा सुरु आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्यानंतर कच्च्या तेलाचा पुरवठा होत नसल्याने सगळं विस्कळीत झालं आहे. ग्लोबल मार्केटमध्ये जे कच्च तेल 70-75 डॉलर बॅलर विकलं जात होतं, तेच तेल 100-120 डॉलर प्रति बॅरलने विकलं जात आहे. कारण होत नसलेला पुरवठा आणि वाढलेला तणाव हे आहे. पण असं असतानाच जगातून एक खूशखबर आली आहे. केवळ भारतासाठीच नव्हे तर तेलाच्या संकटाचा सामना करणाऱ्या प्रत्येक देशासाठी ही आनंदी बातमी मानली जात आहे. ग्लोबल रेटिंग एजन्सी फिच रेटिंगने तेलाच्या किंमतीवरून अंदाज व्यक्त केला आहे. नेमकं काय घडणार समजून घेऊयात.
India-Russia Deal : भारताची रशियाला महाऑफर! रशियन जमिनीवरून करणार गेम चेंज? नेमका काय प्लॅन?
फिचने कच्च्या तेलाच्या किंमतीबाबतचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. फिचच्या मते 2026मध्ये ब्रेंट क्रूडच्या किमतीत सध्यातरी फार मोठा दिलासा मिळणार नाही. तेलाचे दर सरासरी 87 डॉलर प्रति बॅरल राहू शकतात. तर मे पासून जुलैपर्यंत कच्च्या तेलाच्या किंमती 100 ते 110 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पण यानंतर चित्र बदलू शकतं.
सध्याची परिस्थिती सगळीकडेच काही अलबेली नाही. ईराणकडे देखील तेलाचा साठा बराच अस्तित्वात आहे. त्यामुळे जर होर्मुज खुले करण्याचा निर्णय घेतला आणि तिथून जहाजांचं दळणवळण सुरू झालं तर तेलांच्या किमती कमी होऊ शकतात. होर्मुज खुले झाल्यास ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तेलाच्या किंमती धडाधड कोसळायला लागतील. त्यामुळे इंधन एकदम स्वस्त होणार आहे.
फिचच्या मते 2026मध्ये कच्च्या तेलाच्या किमती सरासरी 87 प्रति डॉलर बॅरलच्या आसपास राहतील. ऑगस्टनंतर कच्च्या तेलाच्या किंमती 80 डॉलर प्रति बॅरलपर्यंत येतील. तर सप्टेंबरमध्ये हे दर 70 डॉलर प्रति बॅरलपर्यंत येण्याचा अंदाज आहे. अपेक्षा आहे की जुलैमध्ये होर्मुज खुलं झालं तर त्यानंतर तेलाच्या किंमती धाडधाड कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जुलैमध्ये होर्मुज खुले झाले तर हा त्यासाठी आधार मानला जात आहे. रेटिंग एजन्सीच्या म्हणण्यानुसार, आता ते तेलाचे भाव वाढले आहेत, त्याचं मुख्य कारण हेउत्पादनाच्या कमतरता नाही तर जागतिक परिस्थितीमुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे इंधनाचे दर कडाडले आहे. याचा परिणाम रिफायनरी आणि तेल उत्पादनाचं स्थायी नुकसान नाही झालेलं. फिचच्या मते, होर्मुज खुले झाल्यावर सप्टेंबरपासून कच्च्या तेलाची ओव्हर सप्लाय होईल. यासगळ्यात ओपेक, ओपेक प्लस देशांनी उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्याने तेलाचं संकट निर्माण झालं आहे. होर्मुजमळे रोज 2 कोटी बॅरल तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ही नुकसान बरंच मोठं आहे. जगाच्या तेल पुरवठ्याचा पाचवा हिस्सा या मार्गाने जातो. युद्धामुळे होर्मुज बंद आहे. पण तेल भंडारांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. अशा परिस्थितीत, तेल पुरवठा सुरू झाला तर 2026च्या अखेरीपर्यंत तेलाच्या किंमती घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती स्थिरस्थावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
SBI Chairman Statement : ‘केवळ Sensex कडे पाहू नका…’ SBI अध्यक्षांचा गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला






