(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोन्याचा एखादा मौल्यवान दागिना हरवला की तो कधीच परत मिळणार नाही, अशी भीती अनेकदा मनात असते. दागिन्यांचे केवळ पैशांमधील मूल्य नाही, तर त्यांच्याशी जुडलेल्या कौटुंबिक आठवणी, महत्त्वाचे प्रसंग आणि जिव्हाळ्याचे क्षण यांमुळे त्यांचे भावनिक मूल्यही खूप मोठे असते, जे कधीच भरून काढता येत नाही. आधुनिक ज्वेलरी रिटेल क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाची ताकद दाखवणारी एक हृदयस्पर्शी घटना नुकतीच समोर आली आहे.
हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) यंत्रणा आणि मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या प्रबळ ग्राहक रेकॉर्ड व्यवस्थापन प्रक्रियेमुळे एक हरवलेली सोन्याची बांगडी तिच्या खऱ्या मालकिणीपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यात आली आहे. ही घटना दर्शवते की, तंत्रज्ञान ज्वेलरी क्षेत्रातील जबाबदार पद्धतींना सक्षम करत आहे आणि ग्राहकांचा विश्वास वाढवत आहे.
मलाबार गोल्ड अँड डायमंड्समध्ये डिजिटल रेकॉर्ड व्यवस्थापन, ट्रॅसेबिलिटी सिस्टम आणि ग्राहक-केंद्रित प्रक्रियांमधील गुंतवणूक ही दागिने खरेदी करण्यापासून ते त्यांच्या मालकी हक्काच्या संपूर्ण प्रवासात पारदर्शकता आणि जबाबदारी दृढ करण्यास मदत करते. हॉलमार्किंग च्या खात्रीसोबत प्रबळ तंत्रज्ञान-आधारित यंत्रणांचा मेळ घालून कंपनी ग्राहकांना खरेदीनंतर दीर्घकाळासाठी अधिक विश्वास, सुरक्षितता आणि मनःशांती प्रदान करण्यास सक्षम आहे.
श्री.एम.पी.अहमद, ग्रुप-चेअरमन,मलाबार म्हणाले,”मलाबार गोल्ड अँड डायमंड्समध्ये विश्वास हाच प्रत्येक ग्राहक संबंधाचा पाया आहे. दागिन्यांचे मूल्य अनेकदा त्यांच्या शुद्धतेसाठी आणि कारागिरीसाठी केले जात असले तरी त्यासोबत सखोल वैयक्तिक जिव्हाळा आणि मौल्यवान आठवणी देखील जुडलेल्या असतात. जबाबदार रिटेलिंग, पारदर्शक प्रक्रिया आणि तंत्रज्ञान-आधारित ट्रॅसेबिलिटी ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी खरेदीच्या पलीकडे जाऊन एकत्र काम करू शकतात, हेच या घटनेतून सिद्ध होते.”
ज्वेलरी उद्योगात तंत्रज्ञान हे वाढत्या प्रमाणात विश्वासाला सक्षम करणारे माध्यम बनत चालले आहे. ट्रॅसेबिलिटी (शोध घेण्याची यंत्रणा), ग्राहक रेकॉर्ड व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान-आधारित प्रक्रियांमधील आमच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ग्राहकांसाठी अधिक पारदर्शक आणि सुरक्षित मालकी हक्काचा अनुभव तयार करणे आहे. ही घटना उत्तम उदाहरण आहे की या यंत्रणा ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यास आणि ब्रँडवरील विश्वास अधिक दृढ करण्यास मदत करू शकतात.






