फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET UG 2026 Career Options : नीट युजी २०२६ च्या (NEET-UG 2026) पुनरपरीक्षेमुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या मोठ्या मानसिक दबावाखाली आहेत. दरवर्षी देशातील या सर्वात मोठ्या वेैद्यकीय प्रवेश परीक्षेत लाखो उमेदवार बसतात. परंतु, मर्यादित जागांमुळे प्रत्येकालाच (MBBS) किंवा बीडीएस (BDS) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे शक्य नसते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी निराश न होता, निर्णय घेणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता वैद्यकिय क्षेत्र केवळ NEET पुरते मर्यादित नाही, असे तज्ञांचे मत आहे. आज हेल्थकेअर सेक्टरमध्ये असे अनेक व्यवसाईक कोर्सेस उपलब्ध आहेत, जे उत्तम करिअर आणि चांगल्या कमाईची संधी देतात.
जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात रस असेल आणि डॉक्टर बनण्याची इच्छा असेल तर ‘बीएएमएस’ (BAMS) आणि ‘बीएचएमएस’ (BHMS) करू शकता.BAMS मध्ये आयुर्वेदिक वैद्यकशास्त्र आणि नैसर्गिक उपचारांचे तर BHMS मध्ये होमिओपॅथिक उपचार पद्धती शिकवली जाते. दोन्ही कोर्सेस पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करू शकतात किंवा स्वत: चे क्लिनिक सुरू करू शकतात.
आज ‘बीएससी नर्सिंग’ (BSc Nursing) आणि ‘बी.फार्म’ (B.Pharma) हे सर्वात लोकप्रिय आरोग्य अभ्यासक्रम मानले जातात. नर्सिंगमध्ये रुग्णांची काळजी आणि हॉस्पिटल मॅनेजमेंटशी संबंधित कौशल्ये शिकवली जातात तर बी.फार्ममध्ये औषधांची रचना, त्यांचा वापर, मेडिकल इंडिस्ट्रीची माहिती दिली जाते. या दोन्ही शासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या भरपूर संधी आहेत.
BPT (बॅचलर ऑफ फिजिओथेरपी) हा एक विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये रुग्णांची, शारीरिक उपचार आणि रिकव्हरीवर लक्ष दिले जाते. BSc MLT (बीएससी मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी) यांसारखे कोर्सेस आता वेगाने वाढत आहेत. यामध्ये डायग्नोस्टिक टेस्ट, पॅथॉलॉजी आणि वैद्यकीय तपासणीशी संबंधीत विशेष ज्ञान मिळते. त्यामुळे हा एक वेगाने वाढणारा करिअरचा पर्याय आहे.
तज्ञांच्या मते, नीट परीक्षांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही तर घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. मेडिकल आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये करिअर घडवण्यासाठी अनेक मार्ग खुले आहेत. त्यामुळे स्वत:ची आवड आणि भविष्यातील संधीचा विचार करून करिअरचा मार्ग निवडावा.






