फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Sriram Krishnan Resigns: ट्रंम्प प्रशासानातील सर्वात प्रमुख भारतीय अमेरिकी तंत्रज्ञान सल्लागारांपैकी एक असलेल्या श्रीराम कृष्णन हे व्हाईट हाऊस वरिष्ठ धोरण सल्लागार (सिनियर पॉलिसी ॲडव्हायझर) पदाचा राजीनामा देणार आहेत. श्रीराम कृष्णन यांना गेल्या महिन्यांपासून अमेरिकेच्या प्रमुख एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरणांना आकार देण्यास मदत केल्यानंतर ते जूनच्या शेवटी व्हाईट हाऊस सोडतील.
भारतीय अमेरिकी श्रीराम कृष्णन यांच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल जोरदार चर्चा होत आहे. आशा परिस्थितीत व्हाईट हाऊसची नोकरी सोडणारे श्रीराम कृष्णन यांनी कोठून शिक्षण घेतले आहे आणि त्यांना किती पगार मिळतो याबद्द्ल सविस्तर जाणून घेऊया.
१९८४ मध्ये चेन्नई येथे जन्मलेल्या श्रीराम कृष्णन यांनी २००५ मध्ये एसाआरएम युनिव्हर्सिटीमधून (SRM University)इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी मध्ये बीटेक(B.Tech) पूर्ण केले. यानंतर त्यांनी २००७ मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने ते अमेरिकेला गेले.
व्हाईट हाऊसमध्ये सामील होण्यापूर्वी श्रीराम कृष्णन यांनी ‘आंद्रेसेन होरोविट्झ’ (Andreessen Horowitz) या व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये जनरल पार्टनर म्हणून काम केले. तसेच त्यांनी मायक्रोसॉफ्ट फेसबुक आणि ट्विटरमध्ये वेगवेगळ्या पदांवर सेवा बजावली आहे.२५ जानेवारी २०२५ रोजी ते डोनाल्ड ट्रंप यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला कृष्णन यांची कृत्रिम बुद्धीमत्तेच्या ‘सिनियर व्हाईट हाऊस पॉलिसी ॲडव्हायझर’ म्हणून नियुक्ती झाली.
काही रिपोर्ट्नुसार २०२६ पर्यंत श्रीराम कृष्णन यांची एकूण संपत्ती ८० लाख डॉलर्स ते लाख १२० डॉलर्स (८ ते १२ दशलक्ष डॉलर्स)च्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. त्यांची ही संपत्ती टेक कंपनीतील नेतृत्वपदे, व्हेंचर कॅपिटल भागीदारी एंजेल इन्व्हेस्टमेंट आणि स्टा्र्टअप इकोसिस्टममधील सल्लागार म्हणून केलेल्या कामातून निर्माण झाली आहे.






