नेमकं काय प्रकरण?
संध्या कुटे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. संध्या हीच विवाह २०२२ मध्ये कुटेवाडी येथील पवन कुठे याच्याशी झाला होता. विवाहावेळी मोठ्या प्रमाणात हुंडा आणि सोन्याचे दागिने देण्यात आले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु झाला. तिच्या रंगावरून तसेच घरकामाच्या कारणांवरून सतत टोमणे मारले जात होते. माहेरहून आणखी दोन लाख रुपये आणण्याची मागणीही वारंवार केली जात होती.
UP Crime : बागपतच्या बाजारपेठेत भरदिवसा गोळीबार, व्यावसायिक बाप-लेकाचा मृत्यू; हिस्ट्रीशीटरही जखमी
याचा त्रासाला कंटाळून संध्या काही महिन्यांसाठी माहेरी राहिली होती. मात्र लहान मुलाच्या भवितव्याचा विचार करून कुटुंबीयांनी तिला पुन्हा सासरी पाठवले होते. त्यानंतर ८ जून रोजी तिची चप्पल गावाजवळील विहिरीजवळ आढळल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता विहिरीतील पाण्यात संध्याचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची पाहणी करतांना तिच्या डोक्यावर गंभीर जखमा दिसून आल्या डोक्याच्या विविध भागांवर दादर शास्त्राने वार केल्यासारख्या जखमा असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. तसेत हात-पायांवरही मारहाणीच्या खुणा आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी पोलिसांकडे केला आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणात आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. वाढत्या दबावानंतर पोलिसांनी पती पवन कुटे, सासरा आसाराम कुटे आणि सासू सुनंदा कुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींच्या अटकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: मृत महिलेचे नाव संध्या कुटे असे होते.
Ans: संध्याचा अपघाती मृत्यू नसून खून करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
Ans: पती पवन कुटे, सासरा आसाराम कुटे आणि सासू सुनंदा कुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






