नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणातील आत्महत्या करणाऱ्या अभियंत्याचे नाव अमित ब्राम्हे (वय ४८) असे आहे. सुरुवातीला कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणातून त्यांनी हे टोकाचा पाऊल उचलल्याचे समोर आले होते. मात्र आत्महत्येपूर्वी अमित यांनी २ पानांचा सुसाईड नोट लिहून ठेवले होते. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तींची नावे स्पष्टपणे लिहून ठेवली आहेत. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहेत.
सुसाईड नोटमध्ये काय?
अमित ब्राम्हे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कंपनीतील त्यांच्या वरिष्ठ सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कामाच्या ठिकाणी या दोघींकडून सातत्याने मानसिक छळ होत असल्याचा त्यांनी या नोटमध्ये लिहिले आहे. चालू असलेले चांगले प्रोजेक्ट्स अचानक काढून घेणे, मुद्दाम अत्यंत कठीण कामे देऊन कोंडी करणे, इतर सहकाऱ्यांसमोर वारंवार अपमान करणे आणि नोकरी सोडण्यासाठी सातत्याने दबाव टाकणे, असा छळ या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप अमित यांनी केला आहे.
एवढेच नाही तर त्यांचा मित्र विनोद पाली याला देखील त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरवलं आहे. विनोदने अमित यांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या आणि कंपनीत त्यांची नाहक बदनामी केली, असा उल्लेख अमित यांनी सुसाईड नोटमध्ये केले आहे. ऑफिसमधील अंतर्गत राजकारण, कामाचा ताण आणि मित्राकडून झालेली बदनामी या सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळूनच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे अमित यांनी सुसाईड नोटमध्ये स्पष्ट केले आहे.
गुन्हा दाखल
याप्रकरणी अमित ब्राम्हे यांच्या सुसाईड नोटच्या आधारे भोसरी पोलिसांनी दोन्ही वरिष्ठ महिला अधिकारी आणि मित्र विनोद पालीचा या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून आयटी क्षेत्रातील वाढता मानसिक तणाव, अंतर्गत राजकारण आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Tasgaon Gutkha Seizure: प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर पोलिसांचा घाव; ११.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त
Ans: मृत अभियंत्याचे नाव अमित ब्राम्हे असे होते.
Ans: दोन वरिष्ठ महिला सहकारी आणि मित्र विनोद पालीचा यांच्यावर आरोप करण्यात आले.
Ans: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






