परीक्षेला बसलेल्या मुलीशी अश्लील चाळे, वाशीतील कॉलेजमधील धक्कादायक प्रकार (फोटो सौजन्य-X)
नवी मुंबई:- वाशीतील मॉडर्न कॉलेजमध्ये परीक्षेला बसलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनिशी अश्लील चाळे करण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित पीडित मुलगी अकरावी कॉमर्स शाखेत शिकते. या अत्याचाराप्रकरणी परीक्षा केंद्रातील सुपारवायजर योगेश पाटील यांच्याविरोधात पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकरावीत शिकणारी ही पीडित विद्यार्थिनी असून, इंग्रजी विषयाची परीक्षा सुरू होती. त्या दरम्यान सुपरवायजर योगेश पाटील हे विद्यार्थिनीच्या शेजारी गेला. तसेच तिच्या शेजारी बसून लगट करू लागला. पेपर पूर्ण होईपर्यंत घाबरून विद्यार्थीनेने हा त्रास सहन केला. अखेर परीक्षा झाल्यावर तिने ही बाब तिच्या आईला कळवली. आईने पीडितेला धीर देत थेट वाशी पोलिस ठाणे गाठत तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी योगेश पाटील यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.