संग्रहित फोटो
पुणे : नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. महिलेला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी लॉज चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रकाश रामा शेट्टी (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संतोष हेगडे, प्रज्योत हेगडे, ओम माने यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पोलीस शिपाई मयुरी नलावडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे-नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात असलेल्या साई लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाली. पोलिसांच्या पथकाने लॉजवर छापा टाकला. पोलिसांनी लॉजमधून महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत लाॅज चालक शेट्टी व साथीदारांनी महिलेला पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवयायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लाॅज चालक शेट्टी याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा) गु्न्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार तपास करत आहेत.
वेश्या व्यवसायावर येरवडा पोलिसांचा छापा
गेल्या काही दिवसाखाली कल्याणीनगर येथील निवासी भागात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर येरवडा पोलिसांनी छापा कारवाई केली अन् वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. कारवाईनंतर पोलीस अंमलदाराच्या तक्रारीवरून लॉजच्या मालकासह तिघांनी संगनमताने वेश्या व्यवसाय चालविल्याचे म्हटले. मात्र, असे असताना गुन्हा केवळ दोघांवर दाखल केला. यात मालक महिलेला आरोपी न केल्याने पोलीस दलात उलट-सुलट चर्चा सुरू असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करताना हात आखडता का घेतला, अशी चर्चा सुरू झाली आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याणीनगर येथे स्प्रिंग ब्रुक्स लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता.