(फोटो सौजन्य: Pinterest)
Nasrapur Crime News: नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेची गुन्ह्याची कबुली
सदर घटना ही शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मिरानपूरमधील एका घरातून उघडकीस आली. पोलियांच्या माहितीनुसार, पती नियाज हा काही वर्षांपासून साैदी अरेबिया येथे काम करत होता. त्याने तिथेच एका पाकिस्तानी महिलेशी दुसरा निकाह केला. पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच पत्नी गसिया खातून तणावात गेली आणि यातच तिने आपल्या चारही मुलांची हत्या केली. तिने शुक्रवारी रात्री नशायुक्त पदार्थ अन्नात मिसळून मुलांना खाऊ घातले आणि नंतर जड वस्तूने ठेचत त्यांची हत्या केली. यानंतर तिने खोलीला आतून कुलूप लावले आणि ती फरार झाली.
ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्ही साैदी अरेबियात राहणाऱ्या पतीने नातेवाईकांना चाैकशीसाठी घरी पाठवले. पत्नी फोन उचलत नाहीये यावरुन त्याला संशय आला आणि त्याने नातेवाईकांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी पहिल्या मजल्यावरून जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना खोलीत चारही मुलांचे मृतदेह सापडले. दार बंद असल्याने बाल्कनीतून पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि मुख्य दरवाजा उघडला. पहिल्या मजल्यावरील एका खोलीत मुलांचे मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत एका खाटेवर पडलेले आढळले.
Nasrapur crime News: नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट; राज्य महिला आणि बाल हक्क आयोगाकडून दखल
एसपी प्राची सिंह यांनी सांगितले की, रक्ताचे डाग भिंतीपासून पलंगापर्यंत पसरले होते. खोलीत मुलांच्या उलट्यांचे अंश आढळले. हत्येपूर्वी जेवणात काही विषारी पदार्थ मिसळण्यात आला आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, असा संशय आहे. मुलांच्या डोक्यावर विटा आणि हातोड्याने प्रहार करण्यात आला असावा, असा संशय आहे. तथापि, खोलीतून काहीही सापडले नाही. पोलिसांनी चारही मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले आहेत आणि आरोपी महिलेचा शोध घेतला जात आहे.






