नवी दिल्ली : भारतीय स्त्रिया खूप भाग्यवान (Indian Women Lucky) असतात; कारण भारतीय संस्कृती (Indian Culture) आणि मनुस्मृतीसारख्या (Manusmriti) धर्मग्रंथांनी स्त्रियांना मानाचे स्थान दिले आहे, असे विधान दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) एका महिला न्यायाधीशाने (Woman Judge) केले आहे. यावेळी त्यांनी मनुस्मृतीतले काही दाखलेही दिले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग यांनी हे विधान केले आहे. सिंग म्हणाल्या की, मला खरेच वाटते की भारतातल्या महिला खूप भाग्यवान आहेत. त्याचे कारण म्हणजे आपल्या धर्मग्रंथांनी महिलांना मानाचे स्थान दिले आहे. मनुस्मृतीमध्ये म्हटले आहे की, जर तुम्ही महिलांचा आदर सन्मान केला नाही, तर तुम्ही कितीही पूजापाठ करा, त्याला काहीही अर्थ राहणार नाही. त्यामुळे मला वाटते की महिलांचा आदर कसा करावा, हे आपल्या पूर्वजांना आणि वैदिक ग्रंथांना माहित आहे.
सिंग पुढे म्हणाल्या की, आशियाई राष्ट्रांमध्ये महिलांना घरी, कामाच्या ठिकाणी, समाजामध्ये आणि एकूणातच खूप मानसन्मान दिला जातो. मला वाटते याचे कारण म्हणजे आपल्या धर्मग्रंथांनी आपल्याला दिलेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक शिकवण आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय आणि गणित या क्षेत्रांमधल्या महिलांच्या समस्या या विषयावर आयोजित एका परिषदेत प्रतिभा सिंग बोलत होत्या.