मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर आपल्या सर्वच सोशल मीडिया अकाउंट्सचे (Social Media Account) प्रोफाइल पिक्चर बदलले आहे. संघाने आपल्या डीपीवरून भगवा ध्वज (Saffron Flag) हटवून तिरंगा (Tiranga) लावला आहे. संघाने प्रथमच हा बदल केला आहे.
केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे. त्यानंतर विरोधकांनी संघाला लक्ष्य केले. त्यानुसार सरसंघचालक मोहन भागवत आणि संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनीही आपल्या डीपीवर राष्ट्रध्वज म्हणजे तिरंगा लावला आहे.
स्वाधीनता का अमृत महोत्सव मनाएँ.
हर घर तिरंगा फहराएँ.
राष्ट्रीय स्वाभिमान जगाएँ. pic.twitter.com/li2by2b0dK— RSS (@RSSorg) August 13, 2022
संघाच्या प्रचार विभागाचे सहप्रभारी नरेंद्र ठाकूर यांनी याविषयी सांगितले की, संघ आपल्या सर्वच कार्यालयांवर राष्ट्रध्वज फटकावून स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होण्याच्या आनंदात सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे.