Indian Navy : हिंद महासागरात भारताचा मोठा गेम प्लॅन! गुपचूप समुद्रात उतरवलं तिसरं 'ब्रह्मास्त्र', चीन-पाकिस्तान धस्तावले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
चीनची खैर नाही! भारताच्या ताफ्यात सामील होणार ‘हे’ अत्याधुनिक विमान, हिंद महासागरात गेम बदलणार?
INS अरिदमनच्या नौदलात येणाऱ्या भारताच्या न्यूल्कियर ट्रायड खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे. जमीन, आकाश आणि समुद्र या तिन्ही ठिकाणांहून भारताला आता अण्वस्त्र हल्ले करण्याची क्षमता मिळाला आहे. ही त्रिशक्ती असलेले अमेरिका(America), फ्रान्स, चीन आणि रशिया(Russia)नंतरच भारत हे राष्ट्र ठरले आहे.
भारताने शांतता राखण्यासाठी No First Use म्हणजेच आधी हल्ला न करण्याचे धोरण स्वीकारले आहे. परुंत INS अरिदमनच्या ताफ्यात सामील होण्याने शत्रूला स्पष्ट संकेत मिळाले आहेत की, भारतावर हल्ला झाल्यास प्रतिहल्ला निश्चित आहे. तसेच भारताची वाढती लष्करी ताकदीमुळे पाकिस्तान (Pakistan) आणि चीन यांसारख्या देशांची घाबरगुंडी उडवत आहेत. सध्या भारताचे लक्ष्य न्यूक्लियर अटॅक सबमरिन्स विकसित करण्यावर आहे.






