Top Marathi News Today Live : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार मैदानात
Marathi Breaking News Updates : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु होण्याआधी भारताचा अ संघ हा एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे. भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघ यांच्यातील तीन सामन्यांची अनधिकृत एकदिवसीय मालिका १३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान राजकोट येथे खेळवली जाईल.
तिलक वर्मा यांच्या नेतृत्वाखालील ही मालिका भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एक महत्त्वाची तयारी मानली जाते. संपूर्ण सामन्यांचे वेळापत्रक आणि लाईव्ह स्ट्रीमिंग माहिती जाणून घ्या. ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या तयारीचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
यावेळी, चर्चा अधिकच वाढली कारण अशी अटकळ होती की रोहित शर्मा आणि विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी सामना तंदुरुस्ती मिळविण्यासाठी भारत अ संघासोबत खेळू शकतात. तथापि, बीसीसीआय निवड समितीने त्यांचा संघात समावेश केला नाही.
13 Nov 2025 06:52 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. नवले ब्रिजवर वाहनांचा अपघात झाला आहे. अपघात झाल्यावर या वाहनांनी पेट घेतला आहे. या भीषण अपघातामध्ये तीन ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
13 Nov 2025 06:20 PM (IST)
दिल्ली बॉम्बस्फोटांचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे नवीन खुलासे होत आहेत. कार चालवणारा दहशतवादी डॉ. उमर नबी याच्याबद्दल माहिती समोर आली आहे की तो मेसेजिंगसाठी एक खास मोबाईल अॅप वापरत होता. या मोबाईल अॅपला “सेशन” म्हणतात, जो खाजगी चॅटिंगसाठी वापरला जातो. येथे, आम्ही या मोबाईल अॅपबद्दल तपशीलवार माहिती देतो.
13 Nov 2025 06:07 PM (IST)
सध्या जगभरात एआयचा वापर केला जातो. जवळपास सर्वच गोष्टींमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. एआयचे अनेक फायदे असल्याचे आपल्याला दिसून येतात. दरम्यान अमेरिका, चीन या देशांनी सर्वात आधीच एआय चॅटबॉट लॉंच केले आहेत. दरम्यान भारतात देखील सर्व क्षेत्रांमध्ये या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. भारताने आपला स्वदेशी एआय चॅटबॉट लॉंच केला आहे. भारताने Kyvex नावाचा चॅटबॉट केला आहे.
13 Nov 2025 05:40 PM (IST)
“जवान” सिनेमाचा संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादचे सह-मालक काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अलिकडेच दोघांचा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला असून यामध्ये ही जोडी न्यू यॉर्कच्या रस्त्यांवरून फिरताना दिसून येत होती. हा व्हिडिओ चुकून एका ब्रिटिश ब्लॉगरकडून टिपला गेला. परंतु तो सोशल मीडियावर येताच चाहत्यांमध्ये तर्कवितर्कांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
13 Nov 2025 05:25 PM (IST)
उद्या १४ नोव्हेंबर म्हणजेच चाचा नेहरू यांची जयंती! देशासाठी विशेष असणाऱ्या या विशेष माणसाच्या या विशेष दिनाला (Children’s Day) बाल दिवस म्हणून ओळखले जाते. या दिवशी तुम्ही तुमच्या बाळांना मनोरंजनाचा उत्तम डोस देऊ शकता. आपल्या पाल्याला लहान मुलांवर आधारित काही सिनेमे दाखवू शकता, जेणेकरून त्यांचा हा दिवस उत्तम जाईल. त्यात हे सिनेमे लहान मुलांना शिकण्यासाठी आहेत. प्रोत्साहित करणारे आहेत आणि जीवनाचे धडे देण्यात तरबेज आहेत. त्यातील हे सिनेमे तुम्ही आधीच पाहिले देखील असतील पण काही हरकत नाही मुलांसाठी पुन्हा एकदा पहा! कारण यात मसाला कमी आणि जीवनाचे धडे मोठे आहेत. तर कोणते सिनेमे? पहा
13 Nov 2025 05:08 PM (IST)
खारेकर्जुने (ता. अहिल्यानगर) येथे बिबट्याने बुधवारी सायंकाळी उशीरा रियंका (वय ५) या चिमुरडीला उचलून नेत जिवे ठार मारले. या घटनेने संतापलेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. १३) गाव, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बिबट्या जेरबंद होत नाही, तो पर्यत मुलीवर अंत्यविधी न करण्याचा निर्णय संतप्त ग्रामस्थांनी घेतला आहे. आक्रमक ग्रामस्थांमुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
13 Nov 2025 04:55 PM (IST)
मिरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असणाऱ्या दहिसर टोल नाका आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येचा त्रास शहरातील नागरिकांना गेली अनेक वर्षे सहन करावा लागत होता. या दीर्घकालीन समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे.
13 Nov 2025 04:45 PM (IST)
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदलापूर येथे शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महायुतीचाच नगराध्यक्ष व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. महायुतीत सुरु असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी महत्वाचे विधान केले आहे.
13 Nov 2025 04:35 PM (IST)
लाल किल्ला परिसरामध्ये सोमवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळी बॉंम्बस्फोट झाला. यामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाची चौकशी करणाऱ्या एजन्सींने एका विद्यापीठाचे कनेक्शन शोधून काढले. दिल्लीतील ‘अल फलाह युनिव्हर्सिटी’ ही दहशतवादी अड्डा बनत चालले असल्याचे समोर आले आहे.
13 Nov 2025 04:25 PM (IST)
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदलापूर येथे शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महायुतीचाच नगराध्यक्ष व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. महायुतीत सुरु असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी महत्वाचे विधान केले आहे.
13 Nov 2025 03:56 PM (IST)
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आंबेगाव तालुक्यात महायुती फिस्कटल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे तर भाजपा स्वतंत्रपणे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे.
13 Nov 2025 03:33 PM (IST)
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आंबेगाव तालुक्यात महायुती फिस्कटल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे तर भाजपा स्वतंत्रपणे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे.
13 Nov 2025 03:25 PM (IST)
कणकवली नगरपंचायत निवडणूक २०२५ साठी भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, निवडणूक प्रभारी तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थीतीत मुलाखती पार पडल्या. इच्छुकांना आपआपल्या प्रभागामध्ये कमळ हे चिन्ह घेऊन प्रचाराला लागा.
13 Nov 2025 03:15 PM (IST)
राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरामध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला. यामध्ये 9 निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. याच पार्श्वभूमीवर ब्लास्टमुळे महाराष्ट्र हाय अलर्टवर आहे. मुंबई आणि इतर जिल्ह्यातील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. महानगरी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा एक मेसेज आला.
13 Nov 2025 03:07 PM (IST)
महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे एक चांगले सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणातून काही अंदाज घेवून आम्ही पुढे जाणार आहेत.
13 Nov 2025 01:55 PM (IST)
ऐन निवडणुकांच्या काळात मिरा-भाईंदरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शहराच्या माजी आमदार आणि माजी महापौर गीता जैन यांच्या विरोधात ठाणे न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
13 Nov 2025 01:45 PM (IST)
भारत देश ऊर्जा क्षेत्रात प्रगती करत आहे. विकासाच्या दिशेने भारत पाऊल टाकताना दिसत आहे. यातच नुकताच, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी अर्थात IEA ने एक अहवाल सादर केला. ज्यात चीन, अमेरिकेला मागे टाकत भारत 2035 पर्यंत अव्वलस्थानी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारताची अत्यंत आवश्यक उत्पादनासंबंधीत आयात देखील वाढत आहे.
13 Nov 2025 01:35 PM (IST)
बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार (Bangladesh violence) धगधगू लागला आहे. राजधानी ढाकासह पाच शहरांमध्ये मोठे स्फोट झाले आहेत. अनेक ठिकाणी बसेस पेटवून देण्यात आल्या आहेत. अवामी लीगचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. ठिकठिकाणी स्फोट घडवून आणले जात आहे. वृत्तानुसार आतापर्यंत १७ बस पेटवण्यात आल्या आहेत.
13 Nov 2025 01:25 PM (IST)
राज्यातील सर्वच शहरांमध्ये धूलिकणांची (पीएम) पातळी राष्ट्रीय मयदिपेक्षा जास्त असून मुंबई आणि एमएमआर परिसरातील हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर गेली आहे. असे ‘वातावरण फाऊंडेशन’ आणि ‘एन्वारोकॅटलिस्ट’ यांच्या संयुक्त अहवालातून समोर येत आहे. दरम्यान, वायू प्रदूषणाच्या संकटात महाराष्ट्रातील सर्व शहरांचा समावेश झाल्याने चिंता वाढली आहे.
13 Nov 2025 01:15 PM (IST)
आयपीएल २०२६ च्या आधी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा, सॅम करन आणि संजू सॅमसन यांच्यातील व्यवहाराची चर्चा सुरू असताना, आणखी एक महत्त्वाचा करार शांतपणे तयार केला जात आहे, ज्याबद्दल भारतीय ऑफ स्पिनर आर. अश्विनने एक महत्त्वाचे सत्य उघड केले आहे. रविचंद्रन अश्विनने एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की मुंबई इंडियन्स (MI) ने लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून शार्दुल ठाकूरला ट्रेडद्वारे खरेदी केले आहे.
13 Nov 2025 01:07 PM (IST)
मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हणून विकसित करायचे असेल तर २०११ नंतर बांधलेल्या बेकायदेशीर झोपडपट्ट्यांवर सरकार आणि त्यांच्या संस्थांनी कठोर कारवाई करावी, असे थेट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच सरकारने या दिशेने प्रगतीशील दृष्टिकोन बाळगला पाहिजे, कारण झोपडपट्ट्यांचा बेकायदेशीर विस्तार शहराच्या विकासात मोठा अडथळा ठरत आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपल्या तोंडी निरीक्षणात असे म्हटले की, मुंबईतील झोपडपट्ट्या इतक्या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत की एखादा परिसर पूर्णपणे झोपडपट्ट्यांनी कधी भरेल हे सांगणे कठीण आहे.
13 Nov 2025 01:00 PM (IST)
पुणे येथील पिंपरी चिंचवडयेथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मित्रांनीच एका व्यावसायिक मित्रावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. यात ३७ वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील चऱ्होली अलंकापुराम चौकाजवळ ही घटना घडली आहे.
13 Nov 2025 12:50 PM (IST)
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ नका परिसरात सुद्धा बांधकाम इमारतीमधून लोखंडी रॉड कोसळून एका तरुणाची दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचा नाव अमर आनंद पगारे (३०) असे आहे. आनंद पगारे हे नाशिकहून मुंबईत फिरण्यासाठी बुधवारी आले होते. आणि त्याच दिवशी 11 च्या सुमारास त्यांच्यावर काळाने घात केला.
13 Nov 2025 12:40 PM (IST)
कोल्हापुरातून अंधश्रद्धेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. चुटकी वाजवून भूतबाधा काढण्याचा प्रयत्न होतांना या व्हिडिओत दिसत आहे. एवढेच नाही तर स्मशानभूमीत अघोरी पूजा. करणीचे देखील प्रयोग होत आहे. या व्हिडीओने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. याआधी देखील अंधश्रद्धेचे अनेक प्रकार समोर आले होते. समोर आलेल्या व्हिडीओ हा कोल्हापूर शहरातला असल्याचे सांगितलं जात आहे.
13 Nov 2025 12:30 PM (IST)
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील मालवण किनारा बार अँड रेस्टॉरंटजवळ हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाचा मानपाडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत ६ आरोपींना अटक केली आहे. हत्येची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा बारा वाजता घडली होती. मृत्यू झालेल्या ३८ वर्षीय आकाश भानू सिंग असे नाव आहे.
13 Nov 2025 12:20 PM (IST)
आता नागपूरच्या हुडकेश्वर भागातील स्वागतनगर येथे किरकोळ वादातून एका तरुणावर लाकडी बल्ली आणि हेल्मेटने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा युवक गंभीर जखमी झाला असून, हुडकेश्वर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना मंगळवारी (दि.११) रात्री दहाच्या सुमारास ब्रम्हानगर, जुना नरसाळा मार्गावर घडली.
13 Nov 2025 12:00 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सरकार पुन्हा सुरू करण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा शटडाऊन संपला आहे. 43 दिवसांचा हा अमेरिकेतील शट डाऊन अखेर संपला आहे.
13 Nov 2025 11:55 AM (IST)
अकोला जिल्ह्यातील एका तरुणाने लग्न होत नसल्याने थेट जेष्ठ नेते शरद पवार यांना पत्र लिहिले असल्याचे समोर आले आहे. या तरुणाचे लग्न होत नसल्यामुळे त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पत्र लिहून, 'मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही', असे साकडे घातले आहे.
13 Nov 2025 11:45 AM (IST)
चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष, बाजार समितीचे माजी सभापती तसेच पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी डॉ. सत्येंद्र भुसारी यांचा 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कासारा रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची बातमी समजताच चिखली तालुक्यात शोककळा पसरली आहे.
13 Nov 2025 11:35 AM (IST)
मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची निवड करण्यात आली आहे. आव्हाडांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव केला. तर सचिव पदावर उन्मेष खानविलकर यांनी विजय मिळवला असून त्यांनी शाह आलम शेख यांचा पराभव केला.
MCA निवडणुकीत पवार-शेलार पॅनल तर्फे मी उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभा होतो.या निवडणुकीत मला मतदान करून विजयी करणाऱ्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो.तसेच या निवडणुकीत माझ्या सोबत उभे राहणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे देखील मी आभार मानतो.
येणाऱ्या काळात MCA च्या माध्यमातून क्रिकेट साठी… pic.twitter.com/LjjliK4kBS— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 12, 2025
13 Nov 2025 11:22 AM (IST)
दिल्लीत सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देश हादरुन गेला. काही मृतांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले होते. हे तुकडे काही अंतरापर्यंत फेकले गेले होते. फॉरेन्सिक पथकांनी हे सगळे अवयव गोळा करुन मृतांची ओळख पटवली. स्फोट झालेल्या गाडीमध्ये एक पाय सापडला होता. हा पाय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला होता. याठिकाणी डीएनए चाचणी (DNA Test) केल्यानंतर हा पायाचा भाग डॉ. उमर उन नबी याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
13 Nov 2025 11:12 AM (IST)
दिल्लीमधील लाल किल्ला परिसरामध्ये भीषण स्फोट झाला. यामध्ये 13 माणसांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा अतिशय ह्रदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये चालत्या गाडीमध्ये झालेला स्फोट स्पष्टपणे दिसत आहे.
#WATCH | Delhi | CCTV footage of the car blast near the Red Fort that claimed the lives of 8 people and injured many others.
Source: Delhi Police Sources pic.twitter.com/QeX0XK411G
— ANI (@ANI) November 12, 2025
13 Nov 2025 11:02 AM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रगत दिशा देणारे वसंतदादा पाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला वेगळे वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणून वसंतदादा पाटील यांची ओळख आहे. आजच्या दिवशी 1917 रोजी त्यांचा सांगलीमध्ये जन्म झाला. मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात वसंतराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. आजही त्यांचे कार्य राजकीय नेत्यांना प्रेरणा देतेय.
13 Nov 2025 10:56 AM (IST)
कोटक महिंद्रा बँकेच्या खातेदारांसाठी नवा नियम लागू केला आहे. 1 डिसेंबर 2025 पासून कोटक महिंद्रा बँकेच्या लाखो ग्राहकांना SMS सेवेसाठी लागणार अतिरिक्त शुल्क द्यावा लागणार आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत बँकेच्या ग्राहकांना SMS अलर्टसाठी 15 पैसे अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. याशिवाय, काही कार्डांवर नोव्हेंबरपासून डेबिट कार्ड शुल्क सुद्धा कमी केले आहे.
13 Nov 2025 10:50 AM (IST)
कोल्हापुरातून अंधश्रद्धेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. चुटकी वाजवून भूतबाधा काढण्याचा प्रयत्न होतांना या व्हिडिओत दिसत आहे. एवढेच नाही तर स्मशानभूमीत अघोरी पूजा. करणीचे देखील प्रयोग होत आहे. या व्हिडीओने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. याआधी देखील अंधश्रद्धेचे अनेक प्रकार समोर आले होते. समोर आलेल्या व्हिडीओ हा कोल्हापूर शहरातला असल्याचे सांगितलं जात आहे.
13 Nov 2025 10:42 AM (IST)
ऑस्ट्रेलियामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने स्वतःला एक अद्भुत भेट दिली आहे. टीम इंडियाच्या या तरुण स्टारने अलीकडेच एक नवीन मर्सिडीज-बेंझ जी-क्लास (जी-वॅगन) खरेदी केली. त्याने सोशल मीडियावर त्याच्या लक्झरी कारचा फोटो शेअर केला आणि चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. या कारची मूळ किंमत सुमारे ₹3 कोटी आहे, तर वैशिष्ट्ये आणि प्रकारांसह, त्याची ऑन-रोड किंमत सुमारे ₹4 कोटी आहे.
13 Nov 2025 10:33 AM (IST)
जर तुम्ही वारंवार महामार्गांवर प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. १५ नोव्हेंबर २०२५ पासून टोल प्लाझावर एक नवीन नियम लागू होणार आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. जर तुमच्या वाहनात FASTag नसेल किंवा टॅग खराब झाला तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. तथापि, डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी सरकारने मोठी सूट जाहीर केली आहे.
13 Nov 2025 10:25 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प( Donald Trump) यांनी वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसमध्ये सीरियाचे नव्याने नियुक्त झालेले नेते अहमद अल-शारा(Ahmed al-Sharaa) यांची भेट घेतली. या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर त्वरीत व्हायरल झाला आहे.
‘How many wives? One?’ Trump asks Syria’s new leader in White House — video
Trump gifted Al-Shaar perfume and went on to SPRAY him with it
‘This is the best fragrance! And the other one is for your wife’
Al-Sharaa assured Trump he only has one wife. Vibe check passed, too pic.twitter.com/SAjO6Vc8GH
— RT (@RT_com) November 12, 2025
13 Nov 2025 10:14 AM (IST)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. भारतीय चाहते विविध स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर घरी बसून थेट सामना पाहू शकतात. जर तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामना पहायचा असेल तर जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. चाहते येथे मोफत लाईव्ह सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
13 Nov 2025 10:06 AM (IST)
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ नका परिसरात सुद्धा बांधकाम इमारतीमधून लोखंडी रॉड कोसळून एका तरुणाची दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचा नाव अमर आनंद पगारे (३०) असे आहे. आनंद पगारे हे नाशिकहून मुंबईत फिरण्यासाठी बुधवारी आले होते. आणि त्याच दिवशी 11 च्या सुमारास त्यांच्यावर काळाने घात केला.
13 Nov 2025 09:58 AM (IST)
पुणे येथील पिंपरी चिंचवडयेथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मित्रांनीच एका व्यावसायिक मित्रावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. यात ३७ वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील चऱ्होली अलंकापुराम चौकाजवळ ही घटना घडली आहे. ही हत्या का करण्यात आली, या मागचं कारण काय? चला जाणून घेऊयात?
13 Nov 2025 09:50 AM (IST)
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने अद्याप मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ला देशातील ५० षटकांच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिलेली नाही. विजय हजारे ट्रॉफी २५ डिसेंबर ते १८ जानेवारी दरम्यान अहमदाबाद, राजकोट, जयपूर आणि बेंगळुरू येथे होणार आहे, तर नॉकआउट सामने बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळवले जातील. भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागाची स्थिती अद्याप अस्पष्ट आहे.
13 Nov 2025 09:45 AM (IST)
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. यासाठी डिसेंबरमधील तारिखही निश्चित करण्यात आली आहे. रोसकाँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन ५ डिसेंबर रोजी भारतात येणार आहे. यावेळी ते रशिया-भारत फोरमच्या अधिवेशनात सहभागी होतील. अमेरिकेच्या दबावाला झुगारुन पुतिन यांचा हा दौरा होत आहे.
13 Nov 2025 09:41 AM (IST)
राज्यात नगरपरिषद, नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी बहुतांश पक्षांनी आपली उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांच्या हालचालींना वेग आला आहे.
13 Nov 2025 09:35 AM (IST)
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. दोन्ही बाजूंनी सकारात्मक बोलणे झाले आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुतीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात घड्याळाची टिकटिक वाढण्याची जबाबदारी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आपल्या समर्थ खांद्यावर पेलणार असल्याचे दिसते आहे.
13 Nov 2025 09:33 AM (IST)
इराणला क्षेपणास्त्रे विकसित करण्यास मदत केल्याचा आरोप असलेल्या कंपन्यांवर अमेरिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली. भारतासह सात देशांमधील 32 कंपन्या आणि संबंधित व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत. या देशांमध्ये चीन, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिराती, तुर्की, इराण आणि इतर देशांचा समावेश आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले की, या संस्था आणि व्यक्ती इराणच्या क्षेपणास्त्र आणि मानवरहित हवाई वाहन (UAV) उत्पादनाला पाठिंबा देणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय पुरवठा नेटवर्कचा भाग आहेत.
13 Nov 2025 09:25 AM (IST)
या मालिकेचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर उपलब्ध होणार नाही. याचा अर्थ प्रेक्षक कोणत्याही टीव्ही चॅनेलवर भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ सामने पाहू शकणार नाहीत. तथापि, स्ट्रीमिंग डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. सामन्यांचे थेट प्रक्षेपण JioHotstar अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. प्रत्येक सामना दुपारी १:३० वाजता सुरू होईल. क्रिकेट चाहत्यांसाठी डिजिटल हा एकमेव पर्याय असेल.
13 Nov 2025 09:23 AM (IST)
पुणे येथील पिंपरी चिंचवडयेथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मित्रांनीच एका व्यावसायिक मित्रावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. यात ३७ वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील चऱ्होली अलंकापुराम चौकाजवळ ही घटना घडली आहे.
13 Nov 2025 09:12 AM (IST)
राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट (Delhi Blast) झाला होता. तर याच्याचय दुसऱ्या दिवशी मंगळवारी (११ नोव्हेंबर) पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथेही उच्च न्यायालाबाहेर स्फोट झाला होता. या स्फोटांनी दोन्ही देश हादरले होते. दरम्यान या स्फोटा अमेरिकेची (America) पहिलीच प्रतिक्रिया समोर आहे. मात्र यामध्ये अमेरिकेचा दुहेरपण समोर आला आहे.






