आजच्या न्यूज अपडेट एका क्लिकवर
21 Nov 2025 09:30 AM (IST)
अकोला: अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. धनेगाव शेतशिवारात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास एका अज्ञात युवतीचा जळालेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह एका निर्जन आणि एकांत भागात सापडल्यामुळे, ही घटना अत्यंत संशयास्पद मानली जात आहे. प्राथमिक तपासातून असे दिसून आले आहे की युवतीचे वय अंदाजे ३० ते ३२ वर्षांदरम्यान असावे.
21 Nov 2025 09:20 AM (IST)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणार आहेत. भारत आणि जागतिक दक्षिणेशी संबंधित सर्व महत्त्वाचे मुद्दे जी-२० शिखर परिषदेत जोरदारपणे उपस्थित केले जाणार आहेत. मात्र, या नेत्यांच्या घोषणांमध्ये काय समाविष्ट असेल हे सांगण्यात आले नाही. भारताच्या प्राधान्यक्रमांवर पूर्ण विचार केला जाईल, अशी माहिती सध्या दिली जात आहे.
21 Nov 2025 09:10 AM (IST)
नांदेड: नांदेड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. माहूर तालुक्यातील तालुक्यातील पाचोन्दा शिवारात आज दुपारी दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असतांना दोन सख्ख्या जावांचा अज्ञात संशयिताने गळा दाबून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या मृतकांचे नाव अंतकलाबाई अशोक अडागळे (वय 60) आणि अनुसयाबाई साहेबराव अडागळे (वय 45) असे आहे.
21 Nov 2025 09:05 AM (IST)
नगरपरिषदांसह इतर स्थानिक निवडणुका घेतल्या जात आहेत. अनेकजण दाखल केलेले अर्ज माघारी घेताना दिसत आहे. असे असताना आता पंढरपूर नगरपरिषदेसाठी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी 17 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. याबाबतची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
21 Nov 2025 08:55 AM (IST)
नांदेड जिल्ह्यातील एक हृदय पिळवटून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. नांदेड शहरातील एका इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षण घेणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीवर तिच्याच शाळेतील शिक्षकाने अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी घडली असून या प्रकरणाने संपूर्ण परिसरात प्रचंड संताप पसरला आहे.
21 Nov 2025 08:45 AM (IST)
भारतात 21 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,425 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,389 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,318 रुपये आहे. भारतात 21 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,890 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,250 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,180 रुपये आहे. भारतात 21 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 164.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,64,900 रुपये आहे.
21 Nov 2025 08:35 AM (IST)
2024 चा विश्वचषक झाल्यानंतर भारताच्या काही दिग्गज खेळाडूंनी टी20 क्रिकेटला अलविदा केला आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी टी20 क्रिकेटचा निरोप घेतला आहे. आता भारताचा संघ या दिग्गज खेळाडूंशिवाय आगामी विश्वचषक 2026 मध्ये खेळताना दिसणार आहे. भारत आणि श्रीलंका २०२६ चा टी-२० विश्वचषक आयोजित करतील. २०२६ चा विश्वचषक भारतीय भूमीवर होत असल्याने, टीम इंडियाला यासाठी प्रबळ दावेदार मानले जाते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला.
Marathi Breaking News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणार आहेत. भारत आणि जागतिक दक्षिणेशी संबंधित सर्व महत्त्वाचे मुद्दे जी-२० शिखर परिषदेत जोरदारपणे उपस्थित केले जाणार आहेत. मात्र, या नेत्यांच्या घोषणांमध्ये काय समाविष्ट असेल हे सांगण्यात आले नाही. भारताच्या प्राधान्यक्रमांवर पूर्ण विचार केला जाईल, अशी माहिती सध्या दिली जात आहे.
पंतप्रधान मोदी २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान तेथे असतील. त्यांचे अनेक द्विपक्षीय कार्यक्रमही नियोजित आहेत, ज्यांची क्रमवारी अंतिम स्वरुपात केली जात आहे. पंतप्रधानांचा हा दक्षिण आफ्रिकेचा चौथा अधिकृत दौरा असेल. यापूर्वी, त्यांनी २०१६ मध्ये द्विपक्षीय दौरा आणि २०१८ आणि २०२३ मध्ये ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भेट दिली होती.






