Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर

Marathi Breaking Live Marathi : देश-विदेशसह राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 20, 2025 | 06:37 PM
Top Marathi News Today : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Top Marathi News Today : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. त्यांचा गुजरात दौरा भावनगर येथे सुरू होणार असून, ते ‘समुद्रातून समृद्धी’ कार्यक्रमात सहभागी होतील आणि 34200 कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

पंतप्रधान मोदींचा दौरा सकाळी साडेदहा वाजता भावनगर येथे एका कार्यक्रमाने सुरू होईल, जिथे ते एका मोठ्या जनसभेला संबोधित करतील. त्यानंतर ते धोलेराचे हवाई सर्वेक्षण करतील आणि दुपारी दीड वाजता आढावा बैठक घेतील. त्यांच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान लोथल येथे बांधल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (NMHC) च्या विकासकामांचा आढावा घेतील आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील.

दरम्यान, सुमारे 4500 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारे हे कॉम्प्लेक्स 375 एकरमध्ये पसरलेले आहे. त्यात जगातील सर्वात उंच दीपगृह संग्रहालय (७७ मीटर), १४ गॅलरी, किनारी राज्य मंडप, चार थीम पार्क आणि एक तरंगते रेस्टॉरंट यांचा समावेश असणार आहे. यामध्ये १०० खोल्यांचे तंबू शहर आणि रिसॉर्ट, ई-कार सुविधा आणि ५०० इलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंगचा समावेश असेल.

The liveblog has ended.
  • 20 Sep 2025 06:25 PM (IST)

    20 Sep 2025 06:25 PM (IST)

    Nashik Crime: लोकशाहीच्या स्तंभावरच जीवघेणा हल्ला; मारहाणीत पत्रकार जखमी अन् भुजबळ अ‍ॅक्शन मोडमध्ये

    Attack On Nashik Journalist/Crime News: नाशिक जिल्ह्यात पत्रकारांवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक पत्रकार जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पत्रकारांवर रूग्णालयात उपचार केले जात आहेत. त्र्यंब्यकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील काही गुंडांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या ठिकाणी नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.

  • 20 Sep 2025 06:00 PM (IST)

    20 Sep 2025 06:00 PM (IST)

    नवी मुंबईत पहिल्यांदाच Formula Night Race चे आयोजन

    अलिकडेच, आरपीपीएल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात एक करार झाला. त्यानंतर, महाराष्ट्राची पहिली फॉर्म्युला नाईट स्ट्रीट रेस नवी मुंबईत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही रेस नवी मुंबईतील पाम बीच रोडवरून सुरू होऊन बुलेवार्डमार्गे नेरुळ तलावापर्यंत जाणार आहे. यासाठी 3.7 किलोमीटर लांबीचा विशेष सर्किट तयार केला जाणार असून त्यात 14 आव्हानात्मक वळणे असतील. या ट्रॅकवरूनच चालकांच्या कौशल्याची खरी कसोटी लागणार आहे.

  • 20 Sep 2025 05:52 PM (IST)

    20 Sep 2025 05:52 PM (IST)

    एसटी महामंडळ कंत्राटी पद्धतीने भरती राबवणार!

    भविष्यात येणाऱ्या ८ हजार नवीन बसेससाठी आवश्यक मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC/एसटी) कंत्राटी पद्धतीने १७,४५० चालक व सहाय्यक पदांसाठी भरती राबवणार आहे. या भरतीसाठी ई-निविदा प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरतीमुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार मिळेल आणि त्यांना कमीत कमी ₹३०,००० वेतन मिळण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.

  • 20 Sep 2025 05:36 PM (IST)

    20 Sep 2025 05:36 PM (IST)

    पत्नी ट्विंकलसोबत मूव्ही डेटवर अक्षय कुमा

    बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी 3’ मुळे चर्चेत आहे. नुकताच तो पत्नी ट्विंकल खन्नासोबत मूव्ही डेटवर गेला होता. मुंबईतील एका सिनेमागृहाबाहेर अक्षय कुमारने ट्विंकलचा हात हातात घेत पॅपराझींना खास पोझेस दिल्याआहेत. सोशल मीडियावर या दोघांचे व्हिडिओ आणि फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

     

  • 20 Sep 2025 05:09 PM (IST)

    20 Sep 2025 05:09 PM (IST)

    पंजाब अँड सिंध बँकेत भरती!

    पंजाब अँड सिंध बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल II (MMGS II) अंतर्गत ही भरती नियमित पद्धतीने होणार असून, बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. एकूण १९० पदे उपलब्ध असून त्यात क्रेडिट मॅनेजरची १३० व अॅग्रीकल्चर मॅनेजरची ६० पदे आहेत. ही जाहिरात १८ सप्टेंबर २०२५ रोजी पंजाब अँड सिंध बँकेच्या मानव संसाधन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली.

     

  • 20 Sep 2025 04:50 PM (IST)

    20 Sep 2025 04:50 PM (IST)

    तीन इंजेक्शन देऊन धारधार शास्त्राने केले वार आणि निर्वस्त्र करून महामार्गावर फेकलं

    एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने आपल्या प्रेयसीला बेशुद्ध करून तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अनेक जखमा केल्या नंतर निर्वस्त्र करून हायवेवर फेकून दिले. त्याला वाटले हायवेवर फेकल्याने तिला कोणीतरी चिरडलं आणि तिचा मृत्यू अपघात वाटेल. पण असे न घडता झाले काही वेगळेच. गावकऱ्यांचे लक्ष तिच्यावर गेले. युवती रक्तबंबाळ अवस्थेत होती. गावकऱ्यांनी तिला पाहिल्यावर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. युवतीला ओढणीने गुंडाळून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरची चौकशी सुरू असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.

  • 20 Sep 2025 04:40 PM (IST)

    20 Sep 2025 04:40 PM (IST)

    गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    केज तालुक्यातून विनयभंगाची एक घटना समोर आली आहे. केज पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. लक्ष्मण बेडसकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीला गाडीत बसवून नेत तिचा विनयभंग केला आहे. ही घटना काल शुक्रवारी घडली. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

  • 20 Sep 2025 04:35 PM (IST)

    20 Sep 2025 04:35 PM (IST)

    एक चरित्र आणि चारित्र्य” या पुस्तकाविरोधात आगरी कोळी संघर्ष समिती व आगासनगाव संघर्ष समितीची तीव्र भूमिका

    दिवा परिसरातील “दिवा जंक्शन – एक चरित्र आणि चारित्र्य” या पुस्तकामध्ये आगरी-कोळी समाजाविषयी खोटी, असत्य, बदनामीकारक व समाजविघातक माहिती प्रकाशित करण्यात आल्याने स्थानिक समाजबांधवांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर आगासनगाव संघर्ष समिती तर्फे ॲड. रोहिदास मुंडे व माजी नगरसेवक हिरा पाटील उदय मुंडे तर आगरी कोळी संघर्ष समितीतर्फे हेमंत नाईक किरण दळवी विराज पाटील प्रवीण तांडेल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन संबंधित लेखक राम माळी व प्रकाशक सुधीर राऊत यांच्या विरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • 20 Sep 2025 04:30 PM (IST)

    20 Sep 2025 04:30 PM (IST)

    आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला पंढरपुरात दुग्धाभिषेक

    आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला धनगर समाज व समर्थकांनी पंढरपुरात केला दुग्धाभिषेक. राज्यभर पडळकर यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरू असताना, धनगर समाज मात्र त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. समर्थकांचे म्हणणे – "पडळकर यांचे वक्तव्य योग्य आहे, आणि विरोधकांचा दुटप्पीपणा आम्ही सहन करणार नाही."

  • 20 Sep 2025 04:30 PM (IST)

    20 Sep 2025 04:30 PM (IST)

    अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लगान लावून दिले नंतर आईचे जावयाशी संबंध असल्याचे समोर आले

    बीडमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका सातवीतल्या अल्पवयीन मुलीचं घरच्यांनी लग्न लावून दिलं, त्यानंतर मुलीच्या आईनेच आपल्या जावयासोबत अनैतिक संबंध ठेवले. अल्पवयीन मुलीच्या पतीने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचं तिने सासूला सांगितलं पण सासूनेही अल्पवयीन मुलीलाच जबरदस्ती केल्याची घटना घडलीय. शेवटी मुलीने धारूर पोलिसांकडे धाव घेतली. या संपूर्णघटनेची तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • 20 Sep 2025 04:25 PM (IST)

    20 Sep 2025 04:25 PM (IST)

    ठाण्याचे हेअर स्टायलिस्ट ऋषील मोरे यांची गिनीजमध्ये नोंद

    मुंबईतील नेस्को सेंटर येथे एका खाजगी (लोरियल) कंपनीतर्फे आयोजित भव्य हेअर कलर आणि स्टाईल या स्पर्धेत ठाण्याचे नामांकित हेअर स्टायलिस्ट, दि रिवायवल स्टुडिओचे मालक आणि ठाणे सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे समन्वयक ऋषील मोरे यांनी थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवत ठाण्याचे नाव उज्ज्वल केले. त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदमध्ये नोंद झाली. त्यांनी हेअर ट्रान्सफर्मेशन ही स्पर्धा २

  • 20 Sep 2025 04:20 PM (IST)

    20 Sep 2025 04:20 PM (IST)

    20 दिवसांच्या चिमुकलीला गाडले चिखलात

    उत्तरप्रदेश येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका मेंढपाळाने २० दिवसांच्या चिमुकलीला वाचवल्याचे समोर आले आहे. या चिमुकलीला चिखलात गाडलं गेलं होत. त्यामुळे तिच्या नाकात आणि तोंडात माती गेली होती. म्हणून तीला स्वास घेणे हे कठीण झाले आहे. मेंढपाळाला मातीतून चिमुकलीचा रडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्याने आवाजाच्या दिशेने पाहिल्यावर त्याला मातीतून बाहेर आलेला बाळाचा हात दिसला. तेव्हा हे प्रकरण समोर आलं.

  • 20 Sep 2025 04:20 PM (IST)

    20 Sep 2025 04:20 PM (IST)

    नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले

    नगरपरिषद संदर्भात जामखेड शहरातील नागरिकांनी सर्वात जास्त तक्रारी आमसभेत आमदार रोहित पवार यांच्यासमोर मांडल्या... नगरपरिषद सीईओ यांच्यावर नागरिकांनी कामात केलेली अफरातफर, शहरातील कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेले कंत्राट... कचरा उचलण्यात होणारी टाळाटाळ, शहरातील चिखलमय रस्ते, गटारी, सांडपाण्याची विल्हेवाट, मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे, तुंबलेल्या गटारी, अनियमित सुटलेले पाणी, मच्छरांचा होणारा उपद्रव आदी विषयावर आमदार रोहित पवार यांनी नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं... हा पैसा जनतेचा असून अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे कर्तव्य असल्याची जाणीवही त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना करून दिली.

  • 20 Sep 2025 04:15 PM (IST)

    20 Sep 2025 04:15 PM (IST)

    नवरात्रोत्सवासाठी मोहटादेवी गड सज्ज, आकर्षक विद्युत रोषणाईसह भव्य दर्शन रांग

    शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर असा नवरात्रीचा कालावधी असून नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश देवींच्या मंदिरांमध्ये तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नऊ दिवस भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात त्यामुळे सर्वच मंदिरांच्या परिसरात भाविकांच्या सोयीसाठी तयारी सुरु आहे. राज्यात नवसाला पावणारी भक्तांची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गड येथे देखील शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु असल्याचे पहायला मिळते. नवरात्रीत मोहटादेवी गडावर दरवर्षी अंदाजे १० ते १५ लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. नवरात्रौत्सवाच्या काळात मोहटादेवी गड भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुला असतो. त्यामुळे गडावर या काळात २४ तास गर्दी पहायला मिळते.

  • 20 Sep 2025 04:05 PM (IST)

    20 Sep 2025 04:05 PM (IST)

    दहिसर टोलनाका स्थलांतराच्या वादावरून भाजप-शिवसेना आमने सामने

    मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर पथकर नाका वर्सोवा येथे स्थलांतरित करण्याची घोषणा शिंदे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात आली असली तरी या निर्णयावरून आता राज्याच्या राजकारणात प्रचंड गोंधळ माजला आहे. कारण वर्सोवा येथील जागा वन विभागाच्या अखत्यारीत असून येथे टोल नाका उभारण्यास वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगू लागली आहे.

  • 20 Sep 2025 04:00 PM (IST)

    20 Sep 2025 04:00 PM (IST)

    दुकानात चप्पलची घाण आल्याने वाद आणि हत्या

    तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या मोबाईलचा कॅमेरा व्यवस्थित नसल्याने त्याबाबतची विचारणा करण्यासाठी गेलेल्या युवकांचा वादावादीत मृत्यू झाला आहे. यावेळी दुकानात फारशी पुसण्याचे काम सुरु होते. त्यावेळी ग्राहक अखिलेश नलवडे चप्पलची घाण दुकानातील फरशीवर आल्याने वादाला सुरुवात झाली.यावेळी दुकानातील कर्मचारी आणि अखिलेश नलावडे यांच्यात झटापट झाली आणि अखिलेश जमिनीवर पडला. तो जमिनीवर पडल्यानंतर त्याची शुद्ध हरपली. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी त्याला कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र तेथे अखिलेशला मृत घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अजीम मुल्ला या तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात आता पोलीस पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 20 Sep 2025 04:00 PM (IST)

    20 Sep 2025 04:00 PM (IST)

    दुचाकीस्वराने रस्त्यातच बस अडवली, थेट बसचालकाचे डोकेच फोडले

    गडचिरोली जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अहेरी एसटी आगाराच्या बस वाहकाचे शुल्लक कारणावरुन एका दुचाकी चालकाने डोके फोडून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जवळपास एक तास प्रवासी ताटकळत होते. ही घटना मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर जवळ घडली आहे.

  • 20 Sep 2025 03:51 PM (IST)

    20 Sep 2025 03:51 PM (IST)

    जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…

    Terrorist Killed In Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. भारताच्या लष्कराने जम्मू काश्मीरच्या उधमपुर अन् किश्तवाडमध्ये 7 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना घेरले आहे. दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असल्याचे समोर येत आहे. उधमपुरमध्ये असलेले दहशतवादी जैश ए मोहम्मद या संघटनेचे असण्याची शक्यता आहे.

  • 20 Sep 2025 03:50 PM (IST)

    20 Sep 2025 03:50 PM (IST)

    कारला ‘कट’ मारल्याने जीवघेणा हल्ला, मध्यरात्री रस्त्यावर राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा खून

    सोलापूर मधून एक थरारक घटना समोर आली आहे. सराईत गुन्हेगारांनी दारूच्या नशेत जीप चालविताना कारला कट दिल्याने वाद झाला, त्यानंतर शिवीगाळ करत जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात अनमोल केवटे (रा. मंद्रुप, जि. सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला तर सोनाली भोसले (रा. अंत्रोली, जि. सोलापूर) या गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना लातूर-सोलापूर मार्गावर बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेत विष्णू मामडगे यासह चौघांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

  • 20 Sep 2025 03:40 PM (IST)

    20 Sep 2025 03:40 PM (IST)

    7व्या मजल्यावरून पडून स्टोअर मॅनेजरचा जागीच मृत्यू

    ठाणे शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका नवनिर्मित इमारतीच्या 7व्या मजल्यावरून पडून एका स्टोअर मॅनेजरचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना ढोकाळी परिसरातील हायलँड पार्कमधील बिल्डिंग नंबर 2 येथे घडलीअसून दुपारी 2.35 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीचे बांधकाम सुरु होते.

  • 20 Sep 2025 03:27 PM (IST)

    20 Sep 2025 03:27 PM (IST)

    Hezbollah Saudi : अखाती देश युती; ‘शत्रुत्व विसरून एकत्र या…’ हिजबुल्लाहने का केले सौदी अरेबियाला मैत्रीचे आवाहन?

    Hezbollah Saudi Arabia reconciliation : २०२१ मध्ये सौदी अरेबियाने लेबनीज राजदूताला हद्दपार केले आणि लेबनीज उत्पादनांवर आयात निर्बंध लादले, ज्यामुळे सौदी-लेबनॉन संबंध आणखी बिघडले.म हिजबुल्लाहचे वरिष्ठ नेते नैम कासेम यांनी सौदी अरेबियाला भूतकाळातील मतभेद बाजूला ठेवून इस्रायलविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनामुळे मध्य पूर्वेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांनी हिजबुल्लाहला दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतर, हिजबुल्लाहच्या सीरियातील मित्र बशर अल-असद यांच्या सत्तेवरून हकालपट्टीमुळे हिजबुल्लाहला सौदी अरेबियाशी संवाद साधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हिजबुल्लाहचे वरिष्ठ नेते नैम कासेम यांनी सौदी अरेबियाला भूतकाळातील मतभेद बाजूला ठेवून इस्रायलविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

  • 20 Sep 2025 03:00 PM (IST)

    20 Sep 2025 03:00 PM (IST)

    IMD Heavy Rain Alert: अरे बाबा आता थांब रे! उत्तराखंडमध्ये पाऊस करणार कहर; तर ‘या’ राज्यांमध्ये…

    India Weather Update: गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही राज्यांमध्ये पाऊस विश्रांती घेणार असे चित्र दिसून येत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात. परतीचा पाऊस कोणत्या राज्यात धुमाकूळ घालणार ते पाहुयात. 

  • 20 Sep 2025 03:00 PM (IST)

    20 Sep 2025 03:00 PM (IST)

    कराडमध्ये मोबाईल बदलण्यावरुन वाद

    कराड शहरातील बसस्थानक परिसरात मोबाईल बदलण्यावरून झालेल्या वादानंतर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. अखिलेश नलवडे (वय २१) रा. गजानन सोसायटी, कराड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी अजीम मुल्ला (रा. शिवाजीनगर, मलकापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दुकानातील कर्मचाऱ्याचे नाव आहे.

  • 20 Sep 2025 02:18 PM (IST)

    20 Sep 2025 02:18 PM (IST)

    Ahmedabad Plane Crash: अरे भावनांशी खेळू नका! विमान दुर्घटनेच्या चौकशीत खरे कारण लपवले? SC मध्ये याचिका दाखल

    Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघात प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. १२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. या दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि जमिनीवरचे काही नागरिक मिळून एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. दरम्यान आता सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

  • 20 Sep 2025 02:00 PM (IST)

    20 Sep 2025 02:00 PM (IST)

    इराणच्या Nuclear Program वरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा वाद

    इराण (Iran) आणि त्यांच्या अणु कार्यक्रमावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद निर्माण झाला आहे. युरोपमधील E-3 देश फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीने इराणविरोधी स्नॅपबॅक प्रक्रियेद्वारे इराणवर सुरु केली आहे. यामुळे इराणने तीव्र संताप व्यक्त केला आहे. इराणाचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले आहे की, कोणताही, कितीही दबा आणला तरी इराण त्यांच्या अणु प्रकल्प बंद करणार नाही. इराणने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या अणु प्रकल्पांमध्ये आंतरराष्ट्रीय नियमांनुसार,  कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप आणि दबाव स्वीकारला जाणार नाही.

  • 20 Sep 2025 01:55 PM (IST)

    20 Sep 2025 01:55 PM (IST)

    कल्कीमधून बाहेर पडल्याने नंतर दीपिका पादुकोणने मौन सोडलं, पोस्ट चर्चेत

    दीपिकाने केलेल्या या पोस्टमध्ये, दीपिकाने शाहरूख खानचा हात धरून एक फोटो पोस्ट केला आहे,ज्यामध्ये शाहरूख कडून शिकलेल्या पहिल्या धड्याचा उल्लेख केला आहे. तसेच तिने ‘किंग’ सिनेमाचे शूटिंग सुरू केल्याची घोषणा केली आहे. पोस्टमध्ये तिने लिहिलं, “सुमारे १८ वर्षांपूर्वी ‘ओम शांती ओम’च्या शूटिंगदरम्यान शाहरुखने मला एक महत्त्वाचा धडा दिला होता. एखादा चित्रपट बनवण्याचा अनुभव आणि हा प्रवास तुम्ही ज्यांच्यासोबत करता, ते या चित्रपटाच्या यशापेक्षा खूप महत्त्वाचे असतात. तेव्हापासून मी माझ्या प्रत्येक निर्णयात ही शिकवण लक्षात ठेवली आहे. आणि म्हणूनच आम्ही एकत्र आमचा सहावा चित्रपट करत आहोत.” ” तिने शाहरुख खान आणि सिद्धार्थ आनंद यांना टॅग केले आणि #king #day1 हे हॅशटॅग वापरले.

  • 20 Sep 2025 01:50 PM (IST)

    20 Sep 2025 01:50 PM (IST)

    विज्ञानाची मोठी झेप! आता बर्फ करणार वीज बिल कमी

    ही बॅटरी नेहमीसारखी विजेची बॅटरी नाही. उलट, ती साधं पाणी वापरते. तंत्रज्ञान अगदी सोपं आहे रात्री, जेव्हा विजेची मागणी कमी असते, तेव्हा ही बॅटरी वीज वापरून पाणी गोठवते. सकाळी आणि दिवसा, जेव्हा उन्हाचा तडाखा आणि एसीचा वापर सर्वाधिक असतो, तेव्हा हा तयार केलेला बर्फ वितळवून इमारतींमध्ये थंडावा निर्माण करते. त्यामुळे दिवसभर थेट एसी चालवण्याची गरज कमी होते.

  • 20 Sep 2025 01:45 PM (IST)

    20 Sep 2025 01:45 PM (IST)

    सातवीतील मुलीचं जबरदस्तीने लग्न, पतीकडून अत्याचार...

    अल्पवयीन मुलीस तिच्या सासरी नांदायला पाठवले तेव्हा पतीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. याबाबत तिने आईला आणि सासूला सांगितले असता त्या दोघींनीही त्याच्यावर बळजबरी केली, असा आरोप फिर्यादित आहे. या प्रकरणात नंतर मुलीने आपल्या आईचे पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचे पाहिल्याने तिला मानसिक त्रास होऊ लागला. तू आम्हाला बदनाम करत आहेस असे म्हणत पती आणि आई दोघे मिळून अल्पवयीन मुलीच त्रास देऊ लागले. शेवटी या दोघांच्या त्रासाला कंटाळून गेली आजी आजोबांचं घर गाठलं. या त्रासातून सुटका व्हावी यासाठी पीडित मुलीने शेवटी अंबाजोगाईला जात मानव लोक सेवाभावी संस्थेच्या अधिकारी अरुंधती पाटील यांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर हे सगळा प्रकार समोर आला. हा घडलेला सर्व प्रकारानंतर तब्बल चार वर्षांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

  • 20 Sep 2025 01:42 PM (IST)

    20 Sep 2025 01:42 PM (IST)

    आंदेकर टोळीचा खेळ खल्लास

    टोळी युद्धातून घडलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणानंतर आता पुणे पोलिसांकडून आंदेकर टोळीच्या स्थावर व जंगम मालमत्तांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. बंडू आंदेकरच्या घर झडतीनंतर आता या खून प्रकरणातील एकूण आरोपींच्या २७ बँक खात्यांची पडताळणी केली असून, त्यातील ५० लाख ६६ हजार ९९९ रुपयांची रक्कम गोठवली आहे.

  • 20 Sep 2025 01:41 PM (IST)

    20 Sep 2025 01:41 PM (IST)

    ‘देवाभाऊ’ एकच मन कितीदा जिंकाल! महाराष्ट्र गीत वाजलं नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी थेट…; पहा Viral Video

    Devendra Fadnavis Viral Video: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेकदा आपल्या कृतीमुळे चर्चेत येत असतात. सध्या देखील एका कार्यक्रमात केलेल्या त्यांनी कृतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आंतरराष्ट्रीय बांबू दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप पार पडला. एवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळआय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हे प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊयात.

  • 20 Sep 2025 01:35 PM (IST)

    20 Sep 2025 01:35 PM (IST)

    पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेत ‘या’ बड्या नेत्यांनी केला प्रवेश

    विरोधी पक्षातून अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते हे सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेनेने पुण्यात पक्षाची ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. अशातच आता भाजपमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक असताना, सलग आठ वर्षे भाजपमध्ये काम केलेले नितीन पायगुडे यांनी आता शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे, मनसे-उद्धव ठाकरे युतीबाबत चर्चा सुरू असतानाच, मनसेचे आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे रणजित ढगे पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. त्यांचा प्रवेश मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला आहे.

  • 20 Sep 2025 01:25 PM (IST)

    20 Sep 2025 01:25 PM (IST)

    रिलसाठी थेट रस्त्याच्या मधोमध गादी टाकून झोपला तरुण

    बंगळुरूमध्ये एक तरुण थेट रस्त्याच्या मधोमध गादी टाकून झोपला आहे. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral)  होत आहे. मात्र या तरुणामुळे मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झालेली आहे. टोलनाक्याच्या जवळ गाड्यांच्या लाबंच लाबं रागां लागले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर तरुण आरामात गादी टाकून त्यावर पाय पसरुन झोपला आहे. यामुळे वाहचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच सोशल मीडियावर तरुणावर टीका केला जात आहे.

  • 20 Sep 2025 01:15 PM (IST)

    20 Sep 2025 01:15 PM (IST)

    भारताच्या महिला संघ खेळणार आज गुलाबी जर्सीत, नक्की कारण काय?

    बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट पोस्ट केली. भारतीय महिला संघाच्या खेळाडू गुलाबी जर्सीमध्ये दिसत आहेत. दरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि इतर सदस्यांनी स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याची घोषणा केली. त्यांनी या गंभीर समस्येबद्दल सर्वांना संदेशही दिला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ते या गंभीर आजाराविरुद्ध एकत्र लढतील. चाहते कमेंट सेक्शनमध्ये बीसीसीआय आणि भारतीय महिला संघाचे कौतुक करत आहेत.

  • 20 Sep 2025 01:05 PM (IST)

    20 Sep 2025 01:05 PM (IST)

    गेंड्यांना पाहताच सिंह सिंहिणीला घेऊन असा पळाला

    व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, यात जंगलात सिंह आणि सिंहीण विहार करत असतानात त्यांना वाटेत समोरुन गेंड्यांचा एक कळप त्यांच्या दिशेने येताना दिसून येतो. गेंड्यांच्या कळपाला पाहताच सिंह आणि सिंहीण एकदम घाबरतात आणि वाटेतच थांबून त्यांच्यापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतात. सिंहीण सिंहाच्या मागे जाऊन लपते तर सिंह गर्जना करत त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण असं करुनही जेव्हा गेंड्याचा कळप दूर जात नाही तेव्हा सिंह आणि सिंहीण दोघे संधीचा फायदा घेऊन वेळीच तिथून पळ काढतात. तिन गेंड्यांच्या या कळपासमोर एकटा गेंडा असहाय्य ठरतो आणि आपल्या पत्नीला घेऊन तिकडून पळण्याचा मार्ग त्याला योग्य वाटतो.

  • 20 Sep 2025 12:55 PM (IST)

    20 Sep 2025 12:55 PM (IST)

    ट्रम्पची ‘ही’ एक विचारपूर्वक खेळी; व्हेनेझुएलाजवळ अमेरिकन सैन्याने उडवले तिसरे जहाज

    शुक्रवारी ट्रम्प यांनी एका व्हिडिओ संदेशातून जाहीर केले की अमेरिकन नौदलाने तिसरे ड्रग्ज तस्करी जहाज उद्ध्वस्त केले आहे. हे जहाज एका दहशतवादी संघटनेशी संबंधित होते आणि अमेरिकेत घातक ड्रग्ज पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न होता. हल्ल्यात तीन तस्कर ठार झाले असून, सर्व अमेरिकन सैनिक सुरक्षित परतले आहेत. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की अमेरिकेत बेकायदेशीर ड्रग्ज आणण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही.

  • 20 Sep 2025 12:50 PM (IST)

    20 Sep 2025 12:50 PM (IST)

    : भारताच्या महिला संघ खेळणार आज गुलाबी जर्सीत, नक्की कारण काय?

    बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट पोस्ट केली. भारतीय महिला संघाच्या खेळाडू गुलाबी जर्सीमध्ये दिसत आहेत. दरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि इतर सदस्यांनी स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याची घोषणा केली. त्यांनी या गंभीर समस्येबद्दल सर्वांना संदेशही दिला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ते या गंभीर आजाराविरुद्ध एकत्र लढतील. चाहते कमेंट सेक्शनमध्ये बीसीसीआय आणि भारतीय महिला संघाचे कौतुक करत आहेत.

  • 20 Sep 2025 12:47 PM (IST)

    20 Sep 2025 12:47 PM (IST)

    iPhone Air च्या कॅमेऱ्यामध्ये गडबड

    iPhone Air हे कंपनीचे आतापर्यंतचे सर्वात पातळ मॉडेल आहे. काल ज्यांनी नवीन आयफोन 17 सिरीज मॉडेल्स खरेदी केले, त्यांनी आता या मॉडेल्सचे फर्स्ट इंप्रेशन शेयर करण्यास सुरुवात केली आहे. इतर मॉडेल्सशी तुलना करता युजर्सनी iPhone Air बाबत काही तक्रारी केल्या आहेत. काही युजर्सनी सांगितलं आहे की, नवीन आयफोन सिरीजमध्ये कॅमेऱ्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सर्वात जास्त iPhone Air मध्ये आढळली. कंपनीने देखील युजर्सच्या या तक्रारीची पुष्टी केली आहे.

  • 20 Sep 2025 12:45 PM (IST)

    20 Sep 2025 12:45 PM (IST)

    सिंधुदुर्गात सर्वत्र धुक्याची चादर

    राज्यात परतीच्या पाऊस सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज धुके पडल्याचे दिसून आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह महामार्गावर धुके पाहायला मिळाले. त्यामुळे पावसाचा हंगाम संपून थंडीचा हंगाम सुरू झाल्याचे म्हणता येईल. मागील चार-पाच दिवस तुरळक पावसाच्या सुरू होत्या.

  • 20 Sep 2025 12:45 PM (IST)

    20 Sep 2025 12:45 PM (IST)

    शेतीचे पंचनामे नाहीत, शेतकरी मदतीसाठी वाट पाहतायेत - अजित नवले

    राज्यभर पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी सरकारकडून अजूनही पंचनामे झालेले नाहीत आणि मदत जाहीर झालेली नाही. ही गंभीर बाब असून तातडीने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी किसान महासभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

  • 20 Sep 2025 12:40 PM (IST)

    20 Sep 2025 12:40 PM (IST)

    आता तर हद्दच झाली राव! रिलासाठी थेट रस्त्याच्या मधोमध गादी टाकून झोपला तरुण

    अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धी , लाईक्स, व्ह्यूज मिळावण्याचे लोकांना वेड लागले आहे. यासाठी लोक धोकादायक स्टंट (Stunt Video) करायला लागले आहे. अलीकडे तर रस्त्यावर रील बनवण्याची एक फॅशन बनत चालली आहे. यामध्ये लोक कधी रस्त्यावर डान्स करत आहेत, तर कधी रस्त्यावर बाईक स्टंट करत आहे. यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या आसपासचा लोकांचा जीव धोक्यात येत आहे. पण लोकांना याची जराही पर्वा राहिलेली नाही.

  • 20 Sep 2025 12:40 PM (IST)

    20 Sep 2025 12:40 PM (IST)

    पालकमंत्र्यांची दोडामार्ग पोलीस ठाणे व ग्रामीण रुग्णालयाला भेट

    पालकमंत्री नितेश राणे यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दोडामार्ग तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यावेळी त्यांनी अचानक रात्रीच्या वेळी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला ‘सरप्राईज’ व्हिजीट दिली. या दरम्यान वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात अनुपस्थित असल्याने नितेश राणे यांनी अनुपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. मसुरकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून रुग्णालयातील कामात बेजबाबदारपणा सहन करणार नाही. रुग्णांना चांगली सेवा द्या असे सांगत त्यांना चांगलेच खडसावले. त्यानंतर दोडामार्ग पोलीस ठाण्यालाही नितेश राणे यांनी अचानक भेट दिली. यावेळी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्याशी त्यांनी तालुक्यातील अवैद्य धंद्यांबाबत चर्चा केली. तालुक्यात अवैद्य धंद्यांना थारा देऊ नका गाठ माझ्याशी आहे असं सांगत कारभार सुधारा असे सुनावले.

  • 20 Sep 2025 12:37 PM (IST)

    20 Sep 2025 12:37 PM (IST)

    H1B व्हिसावर अमेरिकेने लागू केले १ लाख डॉलर शुल्क

    H-1B Visa Program : H-1B व्हिसा धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेत (America) नोकरी करु इच्छिणाऱ्या H-1B व्हिसा धारकांना आता यासाठी १ लाख डॉलर मोजावे लागणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या व्हिसाशी संबंधित सर्व नियमही कडक केले आहेत. तसेच शुल्कातही मोठी वाढ केली आहे. मात्र याचा थेट परिणाम भारतीय आयटी व्यावसायिकांवर होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेत H-1B व्हिसा वापरणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त भारतीयांचा समावेश आहे.

  • 20 Sep 2025 12:35 PM (IST)

    20 Sep 2025 12:35 PM (IST)

    मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी, मुस्लिम महिला आक्रमक

     

    मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी तसेच मुस्लिम समाजातील महिलांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिपण्णी एक व्यक्तीने काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर या कॉमेंट विरोधात मुस्लिम समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत कॉमेंट करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. राज्यासह देशभरातून या घटनेचा निषेध होऊ लागला आहे. दरम्यान अहिल्यानगर शहरात देखील या घटनेच्या निषेधार्थ काल सायंकाळच्या सुमारास शहरातील सकल मुस्लिम महिलांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.

  • 20 Sep 2025 12:29 PM (IST)

    20 Sep 2025 12:29 PM (IST)

    श्रमजीवीचा मत्स्यउद्योगआदिवासी समाजासाठी नवसंजीवनी

     

    शासनाकडून अनेक योजना राबवूनही आदिवासी समाजापर्यंत त्याचा थेट लाभ पोहोचत नाही, अशी सर्वसाधारण तक्रार नेहमीच ऐकायला मिळते परंतु रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात श्रमजीवी सहकारी सामाजिक संस्थेने उभारलेल्या मत्स्यउद्योग प्रकल्पामुळे आदिवासी समाजासाठी केवळ रोजगार नाही, तर आर्थिक व सामाजिक बदलांची खरी नवसंजीवनी निर्माण झाली आहे.

  • 20 Sep 2025 12:27 PM (IST)

    20 Sep 2025 12:27 PM (IST)

    घरातल्या सदस्यांच्या निशाण्यावर गौरव खन्ना!

    रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉस १९ चा एक नवीन प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला आहे. “वीकेंड का वार” मध्ये सलमान खान पुन्हा एकदा घरातील सदस्यांना फटकारत आहे. गेल्या आठवड्यात चांगले प्रदर्शन करणाऱ्या घरातील सदस्यांचे कौतुक केले जाईल, तर आळशी किंवा खराब स्पर्धकांना फटकारले जाईल. यामध्ये वृतांच्या माहितीनुसार असे म्हटले जात आहे की, गौरव खन्नाला सलमान खान फटकारताना दिसणार आहे. त्याने या आठवड्यामध्ये टास्कमध्ये देखील फार काही चांगले केले नाही त्याचबरोबर त्याचे स्वत: चे देखील मुद्दे पाहायला मिळाले नाहीत.

  • 20 Sep 2025 12:17 PM (IST)

    20 Sep 2025 12:17 PM (IST)

    RSS ने आता गांधी विचार स्विकारावा; काँग्रेसचे आवाहन

    मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या रा. स्व संघाने आता तरी नथुराम व विखारी विचार सोडून समता, बंधुता व सामाजिक न्यायाचे संविधान व गांधी विचार स्विकारावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

  • 20 Sep 2025 12:07 PM (IST)

    20 Sep 2025 12:07 PM (IST)

    RPF Foundation Day 2025 : भारतीय रेल्वेचा अदृश्य आधारस्तंभ

    RPF Foundation Day 2025 : भारतामध्ये रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. गावी जाणारा शेतकरी असो, नोकरीसाठी धावपळ करणारा कामगार असो की देशभरात भ्रमंती करणारा प्रवासी असो भारतीय रेल्वे ही त्यांची जीवनरेखा आहे. या विशाल जाळ्यात केवळ ट्रेन धावतात असे नाही, तर त्यात प्रत्येक प्रवाशाचा विश्वास, सुरक्षितता आणि आशा सामावलेली असते. आणि याच विश्वासाच्या रक्षणासाठी २० सप्टेंबर हा दिवस खास आहे. कारण हा दिवस रेल्वे संरक्षण दल म्हणजेच RPF (Railway Protection Force) चा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.

  • 20 Sep 2025 11:57 AM (IST)

    20 Sep 2025 11:57 AM (IST)

    शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ‘तुमच्या वयाएवढी राजकीय कारकीर्द झालेल्या आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार पडळकर यांनी जाहीर माफी मागावी. नाही तर घरातून बाहेर पडू देणार नाही’ असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. वेळ पडली तर जिथे असाल तिथे येऊन बांगड्या भरू. असा सज्जड दम महिला पदाधिकाऱ्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी असा वाचाळवीर आमदारांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी झाली.

  • 20 Sep 2025 11:47 AM (IST)

    20 Sep 2025 11:47 AM (IST)

    भारताने ‘स्वच्छता उत्सव’ साजरा करत घेतला प्लास्टिकमुक्तीचा संकल्प

    World Cleanup Day 2025 : “स्वच्छ भारत” हा शब्द आज केवळ सरकारी घोषणांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो एक चळवळ बनला आहे. २०२५ चा ‘जागतिक स्वच्छता दिवस‘ आणि त्यानिमित्ताने भारतात पार पडलेली “स्वच्छता ही सेवा २०२५” मोहीम हेच त्याचे ज्वलंत उदाहरण ठरले. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात संपूर्ण देशाने एकत्र येऊन स्वच्छतेचा महोत्सव साजरा केला.

  • 20 Sep 2025 11:37 AM (IST)

    20 Sep 2025 11:37 AM (IST)

    IND vs PAK सामन्यातून अक्षर पटेल बाहेर होणार?

    India vs Pakistan Asia Cup 2025 super 4 :  भारत विरुद्ध ओमान यांच्यामध्ये काल सामना पार पडला या सामन्यात भारताच्या संघाने 21 धावांनी ओमानला पराभुत करुन स्पर्धेमध्ये अपराजीत आहेत. टीम इंडियाने या सामन्यात कमालीची कामगिरी केली आहे. भारताचा पुढील सामना हा पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी फारच महत्वाचा असणार आहे. त्याआधी भारताच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. भारतीय संघाचा सामना १९ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मध्ये ओमानशी झाला.

Web Title: Top marathi news today live breaking news marathi news live updates political news trending news nationa and international news updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 08:44 AM

Topics:  

  • Breaking News
  • Marathi News Live Updates
  • political news
  • Top Marathi News Today Live
  • Trending News

संबंधित बातम्या

भाजपवर टीका करुन शहाजी बापू पाटील फसले? चौकशीचा ससेमिरा अन् विरोधकांचे टीकास्त्र
1

भाजपवर टीका करुन शहाजी बापू पाटील फसले? चौकशीचा ससेमिरा अन् विरोधकांचे टीकास्त्र

बुलडाण्यात पकडले गेले २ बनावट मतदार, बऱ्याच ठिकाणी EVM खराब, कशी आहे मतदानाची स्थिती
2

बुलडाण्यात पकडले गेले २ बनावट मतदार, बऱ्याच ठिकाणी EVM खराब, कशी आहे मतदानाची स्थिती

Maharashtra Nagarparishad Voting Live:  3 डिसेंबरची मतमोजणी रद्द, या दिवशी लागणार निकाल
3

Maharashtra Nagarparishad Voting Live: 3 डिसेंबरची मतमोजणी रद्द, या दिवशी लागणार निकाल

Maharashtra Local Body Elections : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण
4

Maharashtra Local Body Elections : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.