सीफूड प्रेमींसाठी खास रेसिपी! झटपट घरी बनवा तोंडाला पाणी आणणारी चविष्ट क्रीमी गार्लिक प्रॉन्स, नोट करा पदार्थ
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मासे खायला खूप जास्त आवडतात. सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी इत्यादी चविष्ट मासे सगळेच खूप आवडीने खातात. कोकणात माशांपासून विविध पदार्थ बनवले जातात. माशांचा रस्सा, मासे फ्राय, मसाला कोळंबी इत्यादी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने मासे बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला तोंडाला पाणी आणणारी क्रिमी गार्लिक प्रॉन्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हॉटेलमध्ये किंवा कुठेही जेवायला गेल्यानंतर सगळ्यात आवडीने खालल्ला जाणारा पदार्थ म्हणजे गार्लिक प्रॉन्स. पण नेहमीच विकतचे बर्फातील मासे आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले चविष्ट आणि चमचमीत मासे खावे. यामुळे शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. लहान मुलं लसूण खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात, अशावेळी मुलांना तुम्ही क्रिमी गार्लिक प्रॉन्स बनवून खाण्यासाठी देऊ शकता. लसूणची चव आणि बटरमध्ये शिजवलेली कोळंबी चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया क्रिमी गार्लिक प्रॉन्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






