(फोटो सौजन्य: Pinterest)
Cold Water : थंड पाणी पिल्याने पोटाला नुकसान पोहचते का? तज्ञांकडून जाणून घ्या खरं सत्य
उष्णतेचा हृदयावर काय परिणाम होतो?
डाॅक्टरांच्या मते, वाढत्या उष्णतेचे प्रमाण शरीरातील कार्डियोवेस्कुलर सिस्टमवर गंभीर परिणाम करत असते. यामुळेच उन्हाळ्याच्या दिवसांत हार्ट डिसीज होण्याची शक्यता भरपूर असते. खरंतर जेव्हा तापमान जास्त उष्ण होते तेव्हा शरीर स्वत:ला थंड ठेवण्यात निकामी पडतो. उष्णतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीर अधिक मेहनत घेतो ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, घाम येतो ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि यामुळेच हृदयविकार होण्याचा धोका अधिक वाढतो.
उष्णतेमुळे रक्त घट्ट बनते
जेव्हा उष्णता वाढते तेव्हा तापमानामुळे शरीरातील रक्त गोठायला लागते. यामुळे ब्लड फ्लोमध्ये व्यत्यत निर्माण होतो. स्लो ब्लड फ्लो होत असल्याने रक्ताला पंप करायला हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते ज्यामुळे हृदयावर ताण वाढतो. अशा परिस्थितीत हार्ट अटॅकचा धोका लक्षणीय वाढतो.
पोटॅशियम आणि सोडियमची कमतरता
वातावरणातील तापमान जेव्हा प्रचंड वाढते तेव्हा या उष्णतेमुळे आपल्याला खूप जास्त घाम यायला लागतो. या घामामुळे शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी होते ज्यामुळे हार्ट डिसीज होण्याचा धोका वाढत असतो.
उन्हाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्यावी?






