चेहऱ्यावरील सूज १० दिवसांमध्ये होईल गायब! त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, मिळेल परफेक्ट जॉ लाईन
जीवनशैलीतील बदलांचा परिणाम ज्याप्रमाणे आरोग्यावर दिसून येतो तसाच परिणाम त्वचा आणि केसांवर सुद्धा दिसून येतो. बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर चेहरा खूप जास्त सुजल्यासारखा वाटतो आणि त्वचा फुगल्यासारखी वाटते. दैनंदिन आहारात अतिप्रमाणात मिठाचे सेवन, मानसिक तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे त्वचेच्या समस्या वाढत जातात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सगळ्यात आधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. सतत फेसवॉश किंवा फेस सीरम बदलून त्वचेवर लावले जाते. पण यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार होण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जाते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कोणतेही स्किन केअर रुटीन फॉलो करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)
Skin Care Tips: झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘ही’ एक गोष्ट, त्वचा दिसेल तरुण अन् तजेलदार
चेहऱ्यावर सूज केवळ जीवनशैलीत बदल झाल्यामुळे नाहीतर किडनीसंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर सुद्धा येते. त्यामुळे वारंवार सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर सूज येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला जीवनशैलीत कोणते बदल करून त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात आणि झोपेच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
दैनंदिन आहारात आपल्यातील अनेकांना खूप जास्त मीठ खाण्याची सवय असते. पण अतिप्रमाणात मिठाचे सेवन केल्यामुळे चेहऱ्यावर सूज येणे, गाल, डोळ्यांखालील भाग सुजलेला वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळ्वण्यासाठी आहारात कमीत कमी मिठाचे सेवन करावे. तसेच केळी, पालक आणि ॲव्होकॅडो यांसारख्या पोटॅशिअमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाईल आणि चेहऱ्यावर वारंवार सूज येणार नाही.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. आवश्यक प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर अनावश्यक मीठ बाहेर काढून टाकते आणि चेहऱ्यावरील फुगीरपणा सूज कमी होण्यास मदत होते. याशिवाय सकाळी उठल्यानंतर हर्बल चहा प्यावा.
Papaya Health Facts: कच्ची पपई खाणे फायदेशीर की हानिकारक? आरोग्यावर काय परिणाम होतो?
सकाळी उठल्यानंतर त्वचा गरम पाण्याने धुवण्याऐवजी थंड पाण्याने धुवावी. तसेच चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबके मारणे किंवा बर्फाचा वापर करावा. यामुळे त्वचा ताज़ीटवटवीत वाटते. चेहऱ्यावर दिवसभरातून एकदा किंवा दोनदा बर्फ फिरवल्यास थंड तापमानामुळे त्वचेच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि चेहऱ्यावर आलेली सूज कमी होण्यास मदत होते. याशिवाय शरीराला झोप सुद्धा आवश्यक आहे. नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेतल्यास चेहऱ्यावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.






