Recipe : गहू, बेसन आणि काही मसाल्यांचा वापर करुन खमंग चपाती तयार केली जाते ज्याचा मिस्सी रोटी असं म्हटलं जातं. शेतात कामाला जाताना अनेक शेतकरी या पदार्थांचा आस्वाद घ्यायचे. चला याची रेसिपी जाणून घेऊया.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मिस्सी रोटीचा उगम उत्तर भारतातील ग्रामीण भागातील स्वयंपाकघरांमध्ये आढळून येतो.
ही रोटी फक्त चवीलाच स्वादिष्ट लागत नाही तर आरोग्यासाठीही ती फायद्याची ठरते.
चला या मिस्सी रोटीची रेसिपी नोट करुन घेऊयात.
भारतीय खाद्यसंस्कृतीत विविध प्रकारच्या रोट्यांना विशेष स्थान आहे. त्यापैकी मिस्सी रोटी ही उत्तर भारतातील विशेषतः पंजाब आणि राजस्थानमध्ये लोकप्रिय असलेली पारंपरिक रोटी आहे. मिस्सी रोटीमध्ये बेसन असल्याने प्रथिने आणि तंतुमय घटक अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे ही रोटी केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. दही, लोणी, लोणचे किंवा कोणत्याही मसालेदार भाजीसोबत तिचा आस्वाद अधिक खुलतो. सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत कोणत्याही वेळी हा पदार्थ बनवता येतो. घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही मिस्सी रोटी एकदा करून पाहिल्यास तिची चव नक्कीच आवडेल. चला रेसिपीजाणून घेऊया.