सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे धिरडे
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही स्पेशल आणि चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळच्या नाश्त्यात नेहमीच पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीरा अनेक फायदे होतात. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय शरीरात ऊर्जा कायमच टिकून राहते. आज आम्ही तुम्हाला पालक आणि मक्याच्या दाण्यांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये धिरडे बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी वेळात झटपट तयार होतो. याशिवाय पालक खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये पालक मक्याचे धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.(फोटो सौजन्य – istock)
कोकणातील पारंपरिक पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रस खापरोळी, पदार्थाची चव चाखून मिळेल सुख






