गोड चवीसोबत पौष्टिकतेचा खजिना! पारंपरिक पद्धतीने घरी बनवा चविष्ट गव्हाची खीर
सणावारांच्या दिवसांमध्ये घरात गोड पदार्थ अतिशय आवडीने बनवले जातात. शेवयाची खीर, तांदळाची खीर, गुलाबजाम, बासुंदी इत्यादी ठराविक पदार्थ कायमच बनवले जातात. पण नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही पारंपरिक पद्धतीमध्ये गव्हाची खीर बनवू शकता. सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी गव्हाची खीर नैवेद्यात सुद्धा बनवली जाते. जेवणाच्या ताटात अनेकांना कायमच गोड पदार्थ खाण्यास हवे असतात. साखर वापरून बनवलेले पदार्थ चवीला चांगले लागत असेल तरीसुद्धा शरीरासाठी अजिबात चांगले नाही. अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण शरीर आतून पोखरून काढते. त्यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास गुळाचा वापर करून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. गूळ शरीराला कोणतीही हानी निर्माण करत नाही. पारंपरिक पद्धतीने बनवले सर्वच पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात. चला तर जाणून घेऊया गव्हाची खीर बनवण्याची पारंपरिक रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe: मैद्याऐवजी गव्हाच्या पिठापासून तयार करा चटपटीत समोसे; नोट करा सोपी रेसिपी






