Skin Care Tips: चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? फक्त तेलकट त्वचा नव्हे, ‘या’ सवयीही ठरू शकतात कारणीभूत
सततच्या नोटिफिकेशन्समुळे मेंदूवर ताण वाढतो आणि लक्ष विचलित होते. एक महिन्याचा डिजिटल डिटॉक्स घेतल्यानंतर अनेकांनी आपली एकाग्रता वाढते. तसेच, कामावर अधिक लक्ष केंद्रित होते आणि मानसिक शांतता मिळते. स्क्रीन टाइम कमी केल्याने मेंदूला विश्रांती मिळते.
अनेक लोक झोपण्यापूर्वी बराच वेळ फोन वापरतात, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांना आणि मेंदूला विश्रांती मिळत नाही. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरण्याची सवय झोपेवर वाईट परिणाम करते. स्मार्टफोनमधून निघणारा ब्लू लाईट शरीरातील झोप नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम करतो. मात्र फोनपासून दूर राहिल्यानंतर अधिक गाढ झोप लागते. तसेच सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटते.
डिजिटल डिटॉक्समुळे सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स, सोशल मीडियावरील तुलना आणि स्क्रीनसमोरचा वाढलेला वेळ कमी होतो. त्यामुळे मेंदूवरील ताण हलका होण्यास मदत मिळते. मोबाईलपासून काही काळ दूर राहिल्यानंतर मन अधिक शांत राहते, चिंता कमी होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
तज्ज्ञांच्या मते, पूर्णपणे फोन बंद करणे प्रत्येकासाठी शक्य नसले तरी स्क्रीन टाइम कमी करणे, सोशल मीडियावर अनावश्यक स्क्रोलिंग टाळणे आणि दिवसातील काही वेळ मोबाईलपासून दूर राहणेही फायदेशीर ठरू शकते.डिजिटल डिटॉक्समुळे मन शांत राहते, दररोजच्या जीवनात प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि जीवनातील खऱ्या क्षणांचा आनंद घेता येतो. डिजिटल जग आणि वास्तव जीवन यामध्ये संतुलन राखणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज बनली आहे.
Nail Colour Meaning: नखांचा रंग बदलतोय? शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत; वेळेत ओळखा ‘ही’ लक्षणं






