आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतीय संघात तीन नवोदित खेळाडू
विराट कोहली आयपीएलच्या अंतिम सामन्यात जखमी झाला होता, त्यामुळे तो या मालिकेत खेळणार नाही. मालिका सुरू होण्यापूर्वीच हार्दिक पांड्यालाही संघातून वगळण्यात आले. त्यामुळे सर्वांचे लक्ष नितीश कुमार रेड्डीवर असू शकते. हर्ष दुबे, गुरनूर ब्रार आणि प्रिन्स यादव या तीन नवोदित खेळाडूंचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
सामन्याविषयीची सर्व माहिती
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना शनिवार, १३ जून रोजी खेळला जाईल.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना कुठे खेळला जाईल?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना किती वाजता सुरू होईल?
हा एकदिवसीय सामना दिवस-रात्र असेल. तो भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
चाहते भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टारवर पाहता येईल
IND vs AFG: मैदानात रोहित शर्मा पाऊल ठेवताच तुटणार 37 वर्ष जुना रेकॉर्ड, सचिन-विराट तर कोसो दूर
दोन्ही संघातील खेळाडू
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रसीद कृष्णा, प्रिन्स यादव.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, सेदिकुल्लाह अटल, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमत शाह, इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांगेयालिया खरोती, एएम गझनफर, बिलाल सामी, दरविश अहमद शरीफ, फरिद अहमद शरीफ, फरिद अहमद रसोली.






