Maharashtra Breaking News
16 Dec 2025 02:54 PM (IST)
हॉलिवूड मधून धक्कादायक बातमी समोर आली होती. अमेरिकन चित्रपट निर्माते रॉब रेनर आणि त्यांची पत्नी मिशेल सिंगर रेनर हे त्यांच्या लॉस एंजेलिसच्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांचा मुलगा निक रेनर हा त्यांच्या कथित हत्येतील संशयितांपैकी एक मानला जात होता. आता त्याला अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
16 Dec 2025 02:44 PM (IST)
महाड नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेच्या काळात घडलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी राडाप्रकरणी महाड पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप शिरगावचे सरपंच व शिवसेना उबाठा पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विकास गोगावले व अन्य आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.
16 Dec 2025 02:34 PM (IST)
उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मोलकरणीची हत्या तिच्या मालकानेच केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिची हत्या करून सुटकेसमध्ये भरून शेतात फेकून दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांना एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला होता. तिची हत्या अनेक दिवसांपूर्वी करण्यात आल्याची समोर आले आहे. कारण बॅगमध्ये मृतदेहाचा सांगाडा सापडला. त्यामुळे पोलिसांना या पीडितेची ओळख पटवणं खूप कठीण झालं होत. मात्र पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे.
16 Dec 2025 02:24 PM (IST)
रणवीर सिंग सध्या त्याच्या "धुरंधर" चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी चर्चेत होता, पण एका वादामुळे त्याने दाक्षिणात्य स्टार ऋषभ शेट्टीच्या "कांतारा चॅप्टर १" चित्रपटातील एका दृश्यात देवी चामुंडाची नक्कल करून लोकांच्या भावना दुखावल्या. परंतु, नंतर त्याने माफी देखील मागितली. आता, ऋषभने यावर स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता या वादावर नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.
16 Dec 2025 02:20 PM (IST)
झी मराठीवरील चला हवा येऊ द्या नवीन पर्व यंदा 26 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या कार्यक्रमाचं नव्या संकल्पनेसह आणि काही जुन्या-नव्या कलाकारांच्या सहभागामुळे या पर्वाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र अवघ्या ५ महिन्यांच्या आतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
16 Dec 2025 02:10 PM (IST)
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार एक नवीन रोजगार योजना आणणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे मनरेगा रद्द केला जाईल आणि त्याऐवजी एक नवीन योजना आणली जाईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करण्यासाठी आणि एक नवीन कायदा करण्यासाठी सरकार लोकसभेत एक विधेयक सादर करणार आहे. ही नवीन योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर मानली जात आहे, जरी विरोधक या योजनेतून महात्मा गांधींचे नाव काढून टाकण्याच्या प्रयत्नावर टीका करत आहेत.
16 Dec 2025 02:05 PM (IST)
फिल्मफेअरसोबत रेणुका शहाणे यांचा प्रवास जवळपास तीन दशकांनंतर अतिशय सुंदररीत्या पूर्ण वर्तुळात आला आहे. १९९५ मध्ये मराठी चित्रपट अबोलीसाठी अभिनेत्रीला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता, आणि त्या काळात मराठी सिनेमा अजून आपली ओळख निर्माण करत होता आणि त्या सुरुवातीच्या सन्मानाने त्यांच्या कलात्मक प्रवासाची आशादायक सुरुवात झाली. आज, २९ वर्षांनंतर, शहाणे यांना 'धावपट्टी'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि 'दुपहिया' या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री असे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. चित्रपट आणि कथाकथन क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण प्रभावाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
16 Dec 2025 01:55 PM (IST)
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याबाबत चर्चा तीव्र झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची अपेक्षा आहे. मागील, म्हणजेच २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये देशभरातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले होते. तेव्हापासून, शेतकरी पुढील हप्त्याची तारीख जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
16 Dec 2025 01:45 PM (IST)
ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने पाहत, अखेर त्याची प्रतीक्षा संपली अजून महाराष्ट्राचा लाडका भाऊ आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कलर्स मराठीद्वारे बिग बॉस मराठी सिझन ६ चा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं असून, अवघ्या १२ तासांत २.४ Million हून अधिक व्ह्यूज मिळवत हा प्रोमो सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे. “स्वागताला मनाची आणि घराची दारं उघडी ठेवा…” या ओळींपासूनच भावनांचा सूर पकडणारा हा प्रोमो महाराष्ट्राच्या मनात घर करून बसला आहे.
16 Dec 2025 01:35 PM (IST)
पाकिस्तानवर कर्जाचे डोंगर निर्माण झाले आहे. शाहबाज सरकारच्या २० महिन्यांत तब्बल ७६,९७९ अब्ज रुपये कर्ज घेतले आहे. या धक्कादायक आकडेवारीमुळे देशाची नाजूक आर्थिक परिस्थिती स्पष्टपणे उघड झाली. सरकारी आकडेवारीनुसार, मार्च २०२४ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान पाकिस्तानचे एकूण कर्ज १२,१६९ अब्ज रुपयांनी वाढले. म्हणजेच, पाकिस्तान दररोज सरासरी २० अब्ज रुपयांचे कर्ज घेत आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने दिलेल्या आकडेवारीनुसार, या काळात सरकारचे देशांतर्गत कर्ज ११,३०० अब्ज रुपयांनी वाढले तर, बाह्य कर्ज ८६९ अब्ज रुपयांनी वाढले आहे. ऑक्टोबर २०२५ पर्यंत पाकिस्तानचे एकूण कर्ज ७६,९७९ अब्ज रुपये झाले आहे, जे फेब्रुवारी २०२४ मध्ये ६४,८१० अब्ज रुपये होते.
16 Dec 2025 01:28 PM (IST)
भारत विरुद्ध मलेशिया यांच्यामध्ये सध्या आशिया कप अंडर 19 चा तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. भारताच्या संघाने झालेल्या दोन्ही सामन्यामध्ये विजय मिळवून सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. वैभव सुर्यवंशी याने भारतीय संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये शतक झळकावले होते. त्याने दुबईविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये 171 धावांची खेळी खेळली होती. तर आज सुरु असलेल्या सामन्यामध्ये देखील त्याने अर्धशतक झळकावले पण तो त्याची खेळी मोठी खेळण्यात अपयशी ठरला.
16 Dec 2025 01:20 PM (IST)
सॅमसंग स्मार्टफोन खलरेदी करण्याचा विचार करताय का? तुमच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे. ज्यामध्ये तुम्ही ऑफर्स आणि डिस्काऊंटसह नवीन सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. यावेळी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मने कोणत्याही सेलची घोषणा केली नाही. हा सेल सॅमसंगने सुरु केला आहे. सॅमसंगने ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काही दिवस आधीच एका सेलची घोषणा केली आहे. हा सेल फ्लिपकार्टवर सुरु झाला आहे. कंपनीने फ्लिपकार्टवर Samsung Galaxy Days 2025 चे आयोजन केले आहे. हा सेल आजपासून म्हणजेच 16 डिसेंबरपासून सुरु झाला आहे.
16 Dec 2025 01:10 PM (IST)
मस्साजोग गावाचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश हादरुन गेला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये फक्त कृष्णा आंधळे अजूनही सापडलेला नाही. या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड (Walmik Karad) याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी धाव घेतली आहे. या अर्जावर आज उर्वरीत युक्तीवाद आज (दि.16) होणार आहे.
16 Dec 2025 01:05 PM (IST)
मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्या आहेत. अशातच आता आज आदित्य ठाकरे मुंबई शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. आज सायंकाळी सहा वाजता वरळी येथील एनएससीआय डोम इथे आदित्य ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आजच मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे.
16 Dec 2025 12:55 PM (IST)
पिंपरी चिंचवडमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार या मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर अजित पवारांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. पिंपरीमधील भाजपचे नगरसेवक अश्विनी जाधव, शिवसेनेच्या शहरप्रमुख रूपाली आल्हाट, शिवसेना उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. तर भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे.
16 Dec 2025 12:45 PM (IST)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.
16 Dec 2025 12:32 PM (IST)
ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी पोहचले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीबाबत ते चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
16 Dec 2025 12:31 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मल्लिक यांच्यासोबत इशान सिद्दीकी, व सना मलिक आज संवाद साधणार आहे. आगामी महापालिक निवडणु बाबत दोघे चर्चा करणार आहेत.
16 Dec 2025 12:00 PM (IST)
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणूक जाहीर करण्यात आल्या आहेत. यानंतर भाजपकडे इच्छुकांच्या रांगा वाढल्या आहेत. अनेकांनी तिकीटासाठी भाजपकडे जाण्यास सुरुवात केली आहे. देशात, राज्यात सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत.
16 Dec 2025 11:50 AM (IST)
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मिरजेतील माजी महापौरासह 12 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची वाट धरली आहे.मिरजेतील काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट, जनसुराज्य व भाजपच्या माजी नगरसेवकांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे.
16 Dec 2025 11:40 AM (IST)
निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता ठाकरे बंधूंची युती कधी होणार याबाबत खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, “अधिकृत युतीची घोषणा झालेली नाही, हा प्रश्न तुम्ही महायुतीला का विचारत नाही? महायुती नावचं जे त्रांगड आहे, एकत्र येणार एकत्र लढणार त्यांना प्रश्न विचारता का?. ठाकरे बंधुंना हा प्रश्न का विचारता? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढत आहेत. महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शाहंच्या पायावर डोकं ठेवावं लागतं. आमच्याशी युती करा युती करा, बाबा लगीन, बाबा लगीन” असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं.
16 Dec 2025 11:34 AM (IST)
अलीकडे एक घटना समोर आली आहे ज्यात प्रियकराला कोर्टात लग्नाच्या प्रोसेस दरम्यान हे समजलं की तो ज्या मुलीसोबत लग्नाचं स्वप्न बघत आहे तिचं आधीच दुसऱ्या कोणाशी लग्न झालेलं आहे.
16 Dec 2025 11:30 AM (IST)
पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुती एकत्र नसल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. यावर अजित पवार म्हणाले की, आमची रणनीती ही निवडणूका लढवण्याचीच असणार आहे. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. पण तुम्हाला काय सांगितलं जातं हे मला माहिती नाही. पण त्यांनी सांगितलं तर विचार करुन सांगितलं असेल अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
16 Dec 2025 11:20 AM (IST)
रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. सत्ताधाऱ्यांनी विकासकामांची उद्घाटन केल्यानंतर निवडणूका जाहीर करण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, खरंतर निवडणूक आयोग कुणासाठी थांबत नसतो ती एक स्वायत्त संस्था आहे. मात्र काल दिवसभराचा घटनाक्रम पाहता निवडणूक आयोग कशाची तरी वाट पाहत असल्याचे जाणवले. काल सत्ताधारी नेत्यांनी अनेक उद्घाटने केली मतदारांना प्रभावित करण्यासाठी अनेक नवीन घोषणा केल्या आणि हे सर्व झाल्या नंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुका जाहीर केल्या, असे म्हणायचे का? हा सर्व घटनाक्रम पहिल्यानंतर नेमकं कोण कोणासाठी काम करतंय आणि कोण कोणाचं ऐकतंय हे स्पष्टं होतं. लोकशाहीची अशी गळचेपी होताना मात्र आम्ही अनेक कारवाया होऊन देखील लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत, मात्र अशा एकाधिकारशाहीमुळे खऱ्या अर्थाने लोकशाही टिकेल का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
16 Dec 2025 11:20 AM (IST)
मंगळवारी सकाळी यमुना एक्सप्रेसवेच्या आग्रा–नोएडा लेनवर दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला. बलदेव पोलिस स्टेशन हद्दीतील खादेहरा गावाजवळ माइलस्टोन १२५ येथे वेगाने जाणारी अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात सात बसेस आणि दोन कारना आग लागली.
अपघातानंतर अनेक प्रवासी वाहनांमध्ये अडकले, तर काहींनी बसमधून उड्या मारून जीव वाचवला. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून २० हून अधिक जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी असल्याने समोरून व मागून येणारी वाहने दिसली नाहीत आणि हा भीषण अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
16 Dec 2025 11:11 AM (IST)
तुमचा दिवस कसाही जावो या अभिनेत्याचा एक अभिनय तुम्हाला खळखळून हसायला भाग पडतोच तो अभिनेता म्हणजे लक्ष्या. लक्ष्मीकांत बेर्डे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अफलातून कॉमेडी आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले. ‘मी आलो… मी पाहिलं… मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं’ या गाण्याच्या ओळीप्रमाणेच त्यांचा जीवनप्रवास खऱ्या अर्थाने राहिला. कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेर पुरस्कारासाठी चार नामांकने मिळाली. त्यांनी सुमारे 185 हिंदी आणि मराठी चित्रटांमध्ये काम केले. मात्र आजच्या दिवशी 2004 साली अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वांना हसायला लावणार हा अवलिया जगाचा निरोप घेऊन निघून गेला. आजही घराघरामध्ये लक्ष्याचे चित्रपट तितक्याच आवडीने पाहिले जातात.
16 Dec 2025 11:09 AM (IST)
Weather Update Live
16 Dec 2025 10:59 AM (IST)
कोल्हापूर, कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. मागील काही दिवसांपासून इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमध्ये संपर्क दौरे, सामाजिक उपक्रम, विकासकामांचे फलक, बॅनर आदी माध्यमातून जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र अचानक निवडणूक जाहीर झाल्याने आणि आचारसंहिता लागू झाल्याने या सर्व हालचालींना ब्रेक लागला असून, इच्छुकांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, दोन्ही महानगरपालिकेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी थेट लढत होणार असली तरी स्थानिक आघाड्याही तयारीला लागल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात.
16 Dec 2025 10:55 AM (IST)
कर्करोग (Cancer) या जीवघेण्या आजारावर संशोधन करणाऱ्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने जागतिक स्तरावर भारताची मान अभिमानाने उंच केली आहे. मिसूरी विद्यापीठातील (University of Missouri) नामांकित प्राध्यापक आणि संशोधक रघुरामन कन्नन (Raghuraman Kannan) यांची अमेरिकेतील प्रतिष्ठित नॅशनल अकादमी ऑफ इन्व्हेंटर्स (NAI) च्या फेलो म्हणून निवड करण्यात आली आहे.
16 Dec 2025 10:49 AM (IST)
स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी जिंकल्या आणि आता ते कर्णधार बदलणार आहेत. आता ऑस्ट्रेलियाच्या संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या मालिकेसाठी पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार असेल. तो बऱ्याच काळापासून संघाचे नेतृत्व करत होता, परंतु दुखापतीमुळे त्याला अनेक महिने मुकावे लागले. आता, तो पुनरागमन करत आहे.
16 Dec 2025 10:40 AM (IST)
विकी कौशल आणि आलिया भट्ट हे दोघेही बॉलीवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत. दोघेही त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केले आहे आणि संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात पुन्हा एकत्र काम करताना चाहत्यांना दिसणार आहेत. विकी आणि आलिया यांनी अलीकडेच एका पुरस्कार सोहळ्याला एकत्र हजेरी लावली होती आणि त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
16 Dec 2025 10:31 AM (IST)
तेल अवीव : गाझा (Gaza) गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायली धमक्यांचे वार सहन करत आहे. आता या धमाक्यांनतर निसर्गाने देखील गाझावर कहर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून गाझामध्ये मुसळधार पाऊस पडत असून परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याचा सर्वाधिक फटका विस्थापित लोकांना बसला असून त्यांचे टेंट, अन्न, कपडे सर्वकाही पाण्यात गेले आहेत. तसेच अस्वच्छतेमुळे रोगराईचा संसर्गही वाढला आहे.
16 Dec 2025 10:30 AM (IST)
ब्राझीलमध्ये आलेल्या शक्तिशाली वादळामुळे रिओ ग्रांडे दो सुल येथील ग्वायबा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जोरदार वाऱ्यांमुळे हवाना मेगास्टोअरच्या बाहेर उभारलेली अमेरिकन स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची २४ मीटर उंच प्रतिकृती कोसळली. हा धक्कादायक प्रसंग अनेकांनी व्हिडिओत कैद केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ही भव्य प्रतिकृती रिकाम्या पार्किंगमध्ये हळूहळू झुकत जाऊन अखेर जमिनीवर कोसळताना स्पष्टपणे दिसत आहे.
16 Dec 2025 10:24 AM (IST)
फ्रँचायझी आता कोणत्या खेळाडूची प्लानिंग करुन आले आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सोशल मिडियावर पृथ्वी शाॅ, सरफराज खान या प्रसिद्ध खेळाडूंची सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे. फ्रँचायझी या तीन खेळाडूंवर पैज लावू शकतात. त्यापैकी दोघांनी त्यांच्या आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवातीला अपवादात्मकपणे चांगली कामगिरी केली आणि ते फ्रँचायझींचे आवडते खेळाडू बनले. तथापि, कालांतराने त्यांच्या खराब फॉर्ममुळे संघांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.
16 Dec 2025 10:16 AM (IST)
म्हाडाच्या योजनेंतर्गत अनेकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. त्यात अनेकजण म्हाडाच्या सोडतीकडे डोळे लावून होते. मात्र, आता ही घरांची सोडत लांबणीवर पडली आहे. पुणे मंडळाच्या ४१८६ घरांसाठीच्या सोडतीचा समावेश आहे. या घरांसाठी १६ किंवा १७ डिसेंबरला सोडत काढली जाईल, असे पुणे मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता तांत्रिक अडचणींमुळे ही सोडत रद्द करण्यात आल्याने दोन लाख १५ हजार अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा वाढली आहे.
16 Dec 2025 10:08 AM (IST)
नेपाळमध्ये (Nepal )राजकीय घडामोडींना वेग आला असून येत्या ५ मार्च रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (General Elections) निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. या निवडणुका केवळ नेपाळसाठीच नव्हे, तर दक्षिण आशियाई राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या निवडणुकांमध्ये पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता (Transparency and Accountability) जपण्यासाठी नेपाळ निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
16 Dec 2025 10:04 AM (IST)
Pimpri-Chinchwad Municipal Voting List
महानगरपालिका मतदार यादी कक्ष : निवडणूक मतदार यादी कक्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे, पहिला मजला, मुंबई–पुणे रस्ता, पिंपरी
अ क्षेत्रीय कार्यालय : भेळ चौक, निगडी प्राधिकरण, निगडी
ब क्षेत्रीय कार्यालय : पिंपरी चिंचवड लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव
क क्षेत्रीय कार्यालय : नेहरूनगर, पॉलिग्रास ग्राउंडजवळ, एमआयडीसी, भोसरी
ड क्षेत्रीय कार्यालय : औंध–रावेत रोड, रहाटणी
इ क्षेत्रीय कार्यालय : ग्रोथलॅब इमारत, पांजरपोळ समोर, पुणे–नाशिक रोड, भोसरी
फ क्षेत्रीय कार्यालय : नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत, लोकमान्य टिळक चौक, निगडी
ग क्षेत्रीय कार्यालय : तिसरा मजला, ग क्षेत्रीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मागे, थेरगाव
ह क्षेत्रीय कार्यालय : मुलींचे आय.टी.आय. प्रशिक्षण केंद्र, कासारवाडी
16 Dec 2025 09:45 AM (IST)
राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली असून, त्यात मुंबई महानगरपालिकेचाही समावेश आहे. मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. अवघा एक महिना शिल्लक राहिल्याने सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू अधिकृत युती जाहीर करण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी आघाडी करत ठाकरे गट महापालिका निवडणुका लढवेल, असे संकेत आहेत. काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ठाकरे बंधू स्वतंत्रपणे युती जाहीर करण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे.
16 Dec 2025 09:41 AM (IST)
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात पवनचक्की कंपनी व शेतकऱ्यांतील वादातून २५ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. देवसिंगा (तुळ) येथे मोबदला न मिळाल्याने शेतातून गेलेल्या पवनचक्कीच्या वीजतारा कापण्यासाठी गेलेल्या दत्ता हब्बास वाघमारे (वय २५) याला पोलवर चढवण्यात आले. वीज प्रवाह सुरू असल्याची माहिती असूनही त्याला काम करण्यास लावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उपचारादरम्यान दत्ताचा मृत्यू झाला. या प्रकरणी विद्याधर तानाजी जाधव व जितेंद्र गुलाब मस्के यांना जबाबदार धरत मृत तरुणाच्या बहिणीने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
16 Dec 2025 09:39 AM (IST)
महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर काही तासांतच शहरात पवार काका–पुतणे एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अजित पवार गटाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार गटाच्या कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांची बैठक पार पडली.
16 Dec 2025 09:28 AM (IST)
Mexico Plane Crash News Marathi : मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये (Mexico) एक भयावह दुर्घटना घडली आहे. एक विमान इमरजन्सी लँडिंगदरम्यान कोसळले असून यामध्ये ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या विमान अपघाताचा (Plane Crash) भयावह व्हिडिओ देखील समोर आला आहे. सध्या मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Caught in camera : In a tragic development, a Cessna Citation III private jet near Toluca Airport, in San Pedro Totoltepec, State of Mexico.
The private jet, with registration XA-PRO, carrying 10 people, two pilots and eight passengers, crashed into an industrial warehouse,… pic.twitter.com/ElKVR6Bguc
— FL360aero (@fl360aero) December 15, 2025
Vijay Diwas 16 December 1971 : आज १६ डिसेंबर! हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. याच दिवशी, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात (India-Pakistan War) आपल्या भारतीय सशस्त्र दलांनी (Indian Armed Forces) एक अविश्वसनीय आणि निर्णायक विजय (Decisive Victory) मिळवला होता. या विजयाचे स्मरण करण्यासाठी आणि आपल्या शूर सैनिकांच्या (Brave Soldiers) बलिदानाला वंदन करण्यासाठी संपूर्ण देशात ‘विजय दिवस’ (Vijay Diwas) साजरा केला जातो.






