Chandrapur News: गॅस एजन्सीचा मनमानी कारभार उघड; ग्राहकांची सर्रास लूट, नागरिकांना कारवाईची प्रतिक्षा
Raigad News: कर्जत तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २० गावे व ३९ आदिवासी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
सदर एजंसीवर धाड टाकत मोठ्या प्रमाणात अनियमितता उघडकीस आणली. तहसील कार्यालयाच्या पथकाने ६ एप्रिल रोजी ही कारवाई केली असून तपासादरम्यान स्टॉक रजिस्टरमधील तफावत, सिलेंडर वितरणातील अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन आढळून आले. प्राप्त माहितीनुसार, संबंधित एजन्सीने परवानगी नसताना गॅस सिलेंडरचा साठा ठेवला होता तसेच ग्राहकांना योग्य पद्धतीने वितरण न करता ओव्हरचार्जिंग, विलंब आणि बेकायदेशीर व्यवहार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने छापा टाकून तपासणी केली. (फोटो सौजन्य – Pinterest)
तपासादरम्यान अनेक सिलेंडर जप्त करण्यात आले असून त्यांच्या वजनात व नोंदींमध्ये मोठी तफावत आढळली. ऑनलाईन बुकिंग असूनही ग्राहकांना वेळेवर सिलेंडर न देणे, अतिरिक्त रक्कम आकारणे आणि वितरणात अनियमितता करणे या गंभीर बाबी समोर आल्या. सर्व बाबींचा अहवाल तहसीलदारांनी तयार करून जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर केला असून संबंधित एजन्सीविरुद्ध आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ व एलपीजी नियंत्रण आदेश २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
ST Bus News : एसटीच्या डिझेल बचत योजनेला अर्थ खात्याचा अडथळा; गुजरातहून खरेदीस नकार
एसएमएस करून सिलिंडर बुकिंग केले. तब्बल २२ दिवसानंतर सिलिंडर मिळाले तेही १०२० रुपये वसूल करण्यात आले. याचे कुठलेही बिल दिले नाही. या विरोधात गडचांदूर एजंसीमध्ये तक्रार दिली असता येऊन तुम्ही पैसे वापस घेऊन जा असे सांगण्यात येत आहे. अशा अनेक ग्राहकांची दररोज सर्रास लूट होत आहे संबंधित गॅस कंपनीने याकडे लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे. – शंकर बाबुरावजी शर्मा, गैस ग्राहक, नांदा
१ एप्रिल रोजी गॅस बुकिंग केले ४ एप्रिलला एजसीने फोन करून डीएससी नंबर घेण्यात आला, सांगण्यात आले की ४/५ दिवसांनी सिलिंडर घरपोच मिळेल, अद्याप सिलिंडर मिळाले नाही. एजंसीमध्ये जाऊन विचारले तेथील मॅडम म्हटल्या गाडी आल्यावर फोन लावू. अजूनपर्यंत सिलिंडर नाही परिणामी लाकडावर स्वयंपाक करावा लागत आहे. शासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे.- रेशमा कोरलवार, गॅस ग्राहक नांदाफाटा






