Tulja Bhavani Temple विकास आराखड्याच्या ५५५.८० कोटीं रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता
या बैठकीला आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांची ऑनलाईन तर सभागृहात अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक माया माने, नगर परिषद तुळजापूरचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी, अधिक्षक अभियंता महावितरण संजय आडे, छत्रपती संभाजीनगरचे राज्य पुरातत्व विभागाचे वैभव वानखेडे, तुळजापूर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता प्रज्वलित मंगरुळे, तुळजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. वाय. आवाळे उपस्थित होते.
येथील मंदिर विकास आराखड्यास १ हजार ८६५ कोटींच्या निधीस शासनाकडून मान्यता मिळाली आहे. शासनाने मंजूर केलेल्या या विकास आराखड्यात एकूण ५५५.८० कोटींच्या चार प्रमुख कामांचा समावेश असून त्यांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत घाटशीळ पार्किंग येथे भाविक सुविधा केंद्र व बहुउद्देशीय वाहनतळ उभारणीसाठी ७७.०२ कोटी, हडको पार्किंग परिसरात सुविधा केंद्र, व्यावसायिक संकुल, बहुउद्देशीय सभागृह व वाहनतळासाठी ३७६.३३ कोटी, आराधवाडी पार्किंग येथे सुविधा केंद्रासाठी ४५.४३ कोटी तसेच जुने बसस्थानक परिसरात भाविक सुविधा केंद्रासाठी ५७.२३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय या विकास आराखड्यातील ४५७.८० कोटीच्या कामांची अंदाजपत्रके तयार करून त्यांना तांत्रिक मान्यता देण्यात आली असून निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. २०२५-२६ साठी ५४.२८ कोटीची तरतूद आणि २०२६-२७ साठी ५०० कोटीच्या अंदाजित तरतुदीचे नियोजन करण्यात आले आहे. भूमी संपादनासाठी यापूर्वीच २८.८८ कोटीचा निधी मंजूर झाला असून, धाराशिवच्या उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत संपादन प्रक्रिया सुरू आहे. सल्लागार शुल्कापोटी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही शासनाकडे करण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांनी तुळजाभवानी मंदिर परिसराचा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्याही विकास व्हावा या हेतूने हा प्रकल्प मार्गी लावला आहे. भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि सुव्यवस्थित सुविधा मिळाव्यात यासाठी हा आराखडा आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
विकास आराखड्यातील मंजूर कामे अनुभवी कंत्राटदारांकडून वेळेत करुन घ्यावीत, या कामास गती द्यावी, कंत्राटदारांकडून योग्य अंदाजपत्रक मिळाले नसल्यास निधी मंजूरीस अडचण निर्माण होते, त्यामुळे योग्य अंदाजपत्रक मागवून घ्यावे, विकास आराखड्यातील सर्व कामे जानेवारी २०२८ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री त्यांनी यावेळी दिल्या आहेत. प्रिबीडमधील सूचनांचा स्विकार करण्याचे पूर्ण अधिकार मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पूजार यांना असतील असे पालकमंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले. तुळजाभवानी मंदिराच्या अवतीभवतीच्या महसूली जमीनी मंदिर संस्थानला वर्ग करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. मंदिर परिसरामध्ये पोलीस चौकी बांधण्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात येईल असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह यांनी तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याशी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित पाहणी करुन वेगवेगळे अहवाल तयार करून स्वतंत्र प्रस्ताव मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. या प्रकल्पामुळे भाविकांच्या सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा होणार असून तुळजापूर शहराच्या पर्यटन,रोजगार व आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.






