रायगड : शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात लोणेरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान होणार आहे. याची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यासाठी वाहतुकीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नये, म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक ५ शुक्रवारी जानेवारी रोजी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी दिले आहेत.
रायगड जिल्ह्यातील लोणारे येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील जवळपास ७५ हजार नागरिक देखील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
हीच बाब लक्षात घेता रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, वाहतूक पर्यायी दिशेने वळवण्यात आली आहे. पाली वाकण मार्गाने कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या अवजड वाहनांना ही बंदी घालण्यात आली आहे. गोवा मार्गे येणारी अवजड वाहने सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते १० या कालावधीत मोरबे मार्गे वळविण्यात येणार आहेत.






