पुणे : शिवसेनेतील 39 आमदारांनी (Shivsena 39 MLA) बंड केल्यानंतर आता शिंदे गटात सामील होण्याचा धडाका सुरुच आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जबाबदारी स्विकारली आहे. त्यांनतर त्यांनी कामांचा धडाका सुरु केला आहे. आज शिंदे गटाची ऑनलाईन बैठक (Online meeting) पार पडली या बैठकीला शिवसेनेतील 14 खासदारांनी (14 MP Attend) हजेरी लावल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर शिंदे गटाची कार्यकारणी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. (National Executive announced) त्यानंतर आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार आहे. शिवसेनेचे नाराज १४ खासदार उद्या दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.
[read_also content=”राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खुलेआम क्रॉस व्होटिंग? चर्चांना उधाण https://www.navarashtra.com/india/open-cross-voting-in-presidential-elections-inviting-discussions-305604.html”]
गेल्या काही दिवसांपासून आढळराव पाटील (Adhalao Patil) यांच्या राजकीय नाट्यावर आज अखेर पडदा पडला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. पण आज पुण्यातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला आढळराव पाटील यांनी हजेरी लावत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्यामुळं शिवसेनेतून राजीमाना देऊन शिंदे गटात सामील होण्याचा धडाका सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी पाटलांना शिवसेनेतून काढल्याची बातमी आली होती, पण नंतर नजरचुकीने बातमी छापली सांगत ‘सामना’ने दिलगिरी व्यक्त केली. पण अखेर आढळराव पाटीलांनी आज सेनेला जय महाराष्ट्र केला आहे.