Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर

Marathi Breaking news- मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ११४ नगरसेवकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. भाजपकडे ८९ तर शिंदे गटाकडे २९ नगरसेवक आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 26, 2026 | 08:51 AM
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:  

मुंबई महापौर निवडणूक लांबणीवर; भाजप-शिंदे गटात अद्याप एकमत नाही  

  मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत अद्याप सत्तेचे समीकरण जुळलेले नाही. परिणामी, ३१ जानेवारी रोजी होणारी महापौरपदाची निवडणूक आता लांबणीवर पडण्याची चिन्हे असून, नवीन महापौराची निवड फेब्रुवारी महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे.

सत्तास्थापनेतील पेच आणि गटनोंदणीचा अडथळा

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ११४ नगरसेवकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. भाजपकडे ८९ तर शिंदे गटाकडे २९ नगरसेवक आहेत. दोन्ही पक्षांचे मिळून बहुमत होत असले तरी, अद्याप गटनोंदणी प्रक्रिया (Group Registration) पूर्ण झालेली नाही. या तांत्रिक बाबीमुळे आणि दोन्ही पक्षांत सुरू असलेल्या वाटाघाटींमुळे निवडणुकीची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.

 

 

 

 

The liveblog has ended.
  • 24 Jan 2026 06:29 PM (IST)

    24 Jan 2026 06:29 PM (IST)

    World War 3: जगाचा विनाश! अमेरिकेच्या युद्धनौका इराणकडे रवाना अन्...; युद्धाचा भडका उडणार?

    गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. त्यातच इराण विरुद्ध अमेरिका असा संघर्ष देखील आता तापला आहे. अमेरिका व इराणमध्ये संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या धमकीला इराणने देखील जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जगभरात चिंता वाढली आहे.

  • 24 Jan 2026 05:50 PM (IST)

    24 Jan 2026 05:50 PM (IST)

    मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

    मीरा-भाईंदर शहराचा महापौर मराठीच असावा, या मागणीसाठी मराठी एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांची पाठराखण करताना दिसत आहेत. मराठी महापौराच्या मुद्द्यावर मराठी एकीकरण समिती व मनसेकडून सातत्याने आवाज उठवला जात असताना, सत्ताधारी पक्षांकडून मात्र या मागणीला थेट विरोध न करता राजकीय डावपेच खेळले जात असल्याची चर्चा आहे.

  • 24 Jan 2026 05:40 PM (IST)

    24 Jan 2026 05:40 PM (IST)

    AI ऊस Vs पारंपरिक ऊस: खत आणि पाण्याची मोठी बचत

    बारामती कृषी प्रदर्शनामध्ये कृषी विज्ञान केंद्रातर्फे 'AI स्मार्ट ऊस शेती' हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) आणि बारामती कृषी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे.

    • AI ऊस शेती आणि पारंपरिक शेती (Non-AI) यातील फरक.
    • अविनाश पगारकर यांनी दिलेली सविस्तर माहिती.
    • Soil Moisture Sensor चा वापर आणि त्याचे फायदे.
    • सोलर ऊर्जेवर चालणारे विना-वीज उपकरण.
    • शेतीचा खर्च कमी करून उत्पादन कसे वाढवायचे, याबाबत सांगण्यातच आलं आहे. 

     

  • 24 Jan 2026 05:35 PM (IST)

    24 Jan 2026 05:35 PM (IST)

    धनशक्तीचा वापर झाला तरी विजय आमचाच - संतोष थेराडे

    चिपळूण नगरपालिका निवडणुकीत भाजप ने मताला ५ ते ७ हजार रुपये वाटल्याने भाजप युतीचा विजय झाला असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे कडवई जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संतोष थेराडे यांनी केला आहे. या निवडणुकीत कितीही धनशक्तीचा वापर केला तरीही विजय आपलाच आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

  • 24 Jan 2026 05:30 PM (IST)

    24 Jan 2026 05:30 PM (IST)

    पारनेर बदनाम करण्याचा कट! शिर्डीतील गुन्हेगारीकडे दुर्लक्ष का?, खासदार लंकेंचा पलटवार

    पारनेर तालुका आणि माझी बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक आरोपांची मालिका रचली जात आहे. माझ्यावर चिखलफेक करण्याऐवजी शिर्डीत नेमके काय सुरू आहे, याची आधी चौकशी व्हायला हवी," अशा शब्दांत खासदार नीलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांच्यावर घणाघाती प्रहार केला.
    ​काल अहिल्यानगर येथे माजी खासदार सुजय विखेंकडून विविध प्रश्नांवर लंके यांना घेरण्याचा प्रयत्न केला गेला. तर खा. निलेश लंकेंनी देखील ड्रग्ज प्रकरणापासून रस्ता कामापर्यंत सर्वच मुद्द्यांवर विखेंचा बुरखा फाडला. ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या कर्मचाऱ्याची एलसीबीमध्ये नियुक्ती कुणाच्या शिफारशीने झाली, असा थेट सवाल त्यांनी केला. तसेच, शिर्डीतील गुन्हेगारी आणि शेतकरी तरुणाच्या हत्येचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांना धारेवर धरले. नगर-मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेला विखेच जबाबदार असून, त्यांच्या काळात हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याची टीका लंके यांनी केली. आम्ही स्टंटबाजीपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवतो, असे सांगत त्यांनी विकासकामांचा हिशोबच मांडला.

  • 24 Jan 2026 05:25 PM (IST)

    24 Jan 2026 05:25 PM (IST)

    आशियात युद्धाचा भडका! चीनने तैवानला 6 युद्धनौकांनी घेरले; 18 विमानांची ‘रेड लाईन’मध्ये घुसखोरी, लष्कर हाय अलर्टवर

    जगाच्या पाठीवर आधीच रशिया-युक्रेन आणि मध्य-पूर्वेतील संघर्ष पेटलेला असताना, आता आशिया खंडातही युद्धाचे ढग गडद होऊ लागले आहेत. चीन आणि तैवानमधील तणाव आता शिगेला पोहोचला असून, ‘ड्रॅगन’ने तैवानभोवती लष्करी विमाने आणि युद्धनौकांचा वेढा अधिक घट्ट केला आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने (MND) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत चीनच्या २६ लष्करी विमानांनी आणि ६ नौदल जहाजांनी तैवानच्या उंबरठ्यावर येऊन धडक दिली आहे.

  • 24 Jan 2026 05:20 PM (IST)

    24 Jan 2026 05:20 PM (IST)

    भाजपचे बंडखोर रुपेश पावसकर अपक्ष निवडणूक लढविणार

    जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची घोषणा केल्यानंतर भाजपमधून बंडखोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. कुडाळ तालुक्यातील नेरुर जिल्हा परिषदसाठी भाजपचे जेष्ठ पदाधिकारी रूपेश पावसकर यांनी बंडखोरी करीत उमेदवारी सादर केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दिल्याचे रूपेश पावसकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच नेरुर गाव पॅनलमधून आपण निवडणूक लढविणार असल्याचे पावसकर यांनी सांगत विजय निश्चित असल्याचे सांगून २७ तारखेला अंतिम निर्णय होईल असे स्पष्ट केले. एकंदरीत सिंधुदुर्गात महायुतीमध्ये या निवडणुकीत बंडखोरी झाल्याची दिसून येत आहे.

  • 24 Jan 2026 05:15 PM (IST)

    24 Jan 2026 05:15 PM (IST)

    मेट्रोच्या कामामुळे सलासर ब्रिज भूमी कॉम्प्लेक्सजवळ सांडपाण्याचा डोह; आरोग्य धोक्यात

    MMRDA मार्फत मेट्रोच्या काम सुरू असलेल्या ठिकाणी उत्खनन कामामुळे मीरा-भाईंदरमधील वार्ड क्रमांक ८ येथील सलासर ब्रिज भूमी कॉम्प्लेक्स परिसरात सांडपाण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
    सदर उत्खननस्थळी योग्य निचऱ्याची व्यवस्था नसल्याने सांडपाण्याचे पाणी थेट रहिवासी इमारतीजवळ साचत आहे. यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा धोका वाढल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे तेथील रहिवाशी यांनी मेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना धरले धारेवर या गंभीर परिस्थितीकडे वार्ड क्रमांक ८ चे नगरसेवकांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी सलासर ब्रिज भूमी कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी केली आहे. संबंधित विभागाने त्वरित सांडपाण्याचा निचरा करून आरोग्य धोक्यापासून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

  • 24 Jan 2026 05:10 PM (IST)

    24 Jan 2026 05:10 PM (IST)

    पालिकेत समाविष्ठ भागातील नगरसेवकांना महापौर पदाची संधी द्या

    पनवेल ग्रामीण ( वा ) पालिकेचे महापौर पद यंदा सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यासाठी राखीव झाल्याने, कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असताना पालिकेत समाविष्ठ जुन्या नगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकान ऐवजी इतर वसाहती मधून निवडून आलेल्या नगरसेवकांना महापौर पदाची संधी देण्यात आली पाहिजे अशी चर्चा परिसरातील मतदारांमध्ये आहे.2017 साली पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकी नंतर महापौर पद अनुसूचित जाती साठी राखीव झाल्याने डॉ. कविता चौतमोल यांना महापौरपदाची संधी देत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्चशिक्षित नेतृत्वाचा संदेश पनवेलकरांना दिला होता.नवीन पनवेल या पूर्वीच्या नगरपालिका क्षेत्रातील प्रभागातून निवडून आलेल्या डॉ. चौतमल यांना सलग पाच वर्ष महापौर पद भूषवण्याची संधी मिळाली. याच कालावधीत सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता म्हणून जवाबदारी सांभाळण्याची संधी केवळ जुन्या नगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकाना देण्यात आल्याने पालिकेत समाविष्ठ इतर वसाहती मधून निवडून आलेल्या नगरसेवकांनवर अन्याय झाल्याची भावना नगरसेवकांमध्ये असल्याने खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा तसेच पालिकेत समाविष्ट इतर ग्रामीण भागातुन निवडून आलेल्या नगरसेवकांना पालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास त्या त्या प्रभागातील प्रलंबित प्रश्न (उदा. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते) अधिक प्रभावीपणे सुटण्यास मदत होऊ शकते. सिडको हस्तांतरण प्रक्रियेत असलेल्या वसाहतींसाठी हे अधिक गरजेचे आहे.

  • 24 Jan 2026 05:05 PM (IST)

    24 Jan 2026 05:05 PM (IST)

    मीरा-भाईंदरमध्ये ‘मराठी महापौर’ मुद्द्यावर राजकीय तापमान वाढले

    मीरा-भाईंदर शहराचा महापौर मराठीच असावा, या मागणीसाठी मराठी एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांची पाठराखण करताना दिसत आहेत.

  • 24 Jan 2026 05:00 PM (IST)

    24 Jan 2026 05:00 PM (IST)

    पनवेलचे नेतृत्व आता विस्तारणार: विकसित वसाहतींमधील प्रतिनिधींना संधी देण्याची मागणी

    पनवेल ग्रामीण ( वा ) पालिकेचे महापौर पद यंदा सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यासाठी राखीव झाल्याने, कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असताना पालिकेत समाविष्ठ जुन्या नगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकान ऐवजी इतर वसाहती मधून निवडून आलेल्या नगरसेवकांना महापौर पदाची संधी देण्यात आली पाहिजे अशी चर्चा परिसरातील मतदारांमध्ये आहे.2017 साली पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकी नंतर महापौर पद अनुसूचित जाती साठी राखीव झाल्याने डॉ. कविता चौतमोल यांना महापौरपदाची संधी देत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्चशिक्षित नेतृत्वाचा संदेश पनवेलकरांना दिला होता. वाचा सविस्तर

  • 24 Jan 2026 04:55 PM (IST)

    24 Jan 2026 04:55 PM (IST)

    भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माचे रोहित शर्माबद्दल मोठे विधान

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने स्फोटक फलंदाजी केली होती. त्याने ३५ चेंडूत ८४ धावा केल्या होत्या.दरम्यान, तो म्हणाला की, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या प्रोत्साहनामुळे तो माजी कर्णधार रोहित शर्माच्या टी-२० आंतरराष्ट्रीय पॉवरप्ले दरम्यान आक्रमक दृष्टिकोनाचे अनुकरण करत आहे. वाचा सविस्तर

  • 24 Jan 2026 04:50 PM (IST)

    24 Jan 2026 04:50 PM (IST)

    एअर इंडियाने थांबवली अमेरिकेतील उड्डाणे

    सध्या भारतात देखील काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये हिमवृष्टी सुरू झाली आहे. दरम्यान अमेरिकेत देखील याची सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत अमेरिकेत हिमवादळ येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर होण्याचा अंदाज आहे. एअर इंडियाने त्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने २५-२६ जानेवारीसाठी अमेरिकेच्या न्यू जर्सीतील नेवार्कला जाणारी-येणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 24 Jan 2026 04:45 PM (IST)

    24 Jan 2026 04:45 PM (IST)

    आरक्षण सोडतीत ‘गौडबंगाल’? ओबीसी मुक्ती मोर्चाचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

    राज्यातील महापौर महापालिकांच्या महापौरपदांची केलेली सोडत अन्यायपूर्वक व नियमबाह्य असल्याकडे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोचनि लक्ष वेधले. सोडतीत बांठीया समितीच्या लोकसंख्येचा अहवाल डावलला गेला. सोबतच राज्यातील मागासवर्ग आरक्षण कायद्याकडेही दुर्लक्ष केले. परिणामी २९ महापालिकांमध्ये ओबीसीला लोकसंख्येच्या आधारे १० व अनुसूचित जातीला ४ महापौर पदे मिळणे अपेक्षित होते.  नियमाला डावल्यानेच ओबीसी वर्गाला ८ व अनु. जातीला केवळ ३ महापौर पदे मिळाली. तर ४१ टक्के पद म्हणजेच १२ पदे ही राखीव मागासवर्गीय घटकाला मिळाली. वाचा सविस्तर

  • 24 Jan 2026 04:40 PM (IST)

    24 Jan 2026 04:40 PM (IST)

    अमेरिकेचा पूर्व प्रशांत महासागरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या जहाजांवर हल्ला

    एक मोठे वृत्त समोर आले आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर अमेरिकेने प्रशांत महासागरात मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेच्या कथित ड्रग्ज तस्करी जहाजांवर हल्ला केला आहे. अद्याप हा हल्ला कोणत्या देशाच्या जहाजावर करण्यात आला याची माहिती मिळालेली नाही. परंतु या हल्ल्यात दोन लोक ठार झाले आहेत. शुक्रवारी (२३ जानेवारी २०२६) ही कारवाई करण्यात आली आहे.

    📢 BREAKING NEWS - US forces executed a lethal strike Friday on another drug boat in the Eastern Pacific that was being operated by a designated terrorist organization according to US Southern Command (USSOUTHCOM). pic.twitter.com/OHktr5Y9zr

    — The Constitutional Conservative (@TheCCShowcast) January 23, 2026

  • 24 Jan 2026 04:35 PM (IST)

    24 Jan 2026 04:35 PM (IST)

    कोयनेच्या जंगलात घुमतेय ‘बाजी’ची डरकाळी! चांदोली परिसरात सेनापती-सुभेदाराचा दबदबा

    सह्याद्रीच्या दाट जंगलात पुन्हा एकदा जंगलराजाचा दरारा जाणवू लागला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन बलदंड नर वाघ STR T1 (सेनापती), STR T2 (सुभेदार) आणि STR T3 (बाजी) यांचा वावर सातत्याने सुरू असून, त्यांनी आपापली हद्द निश्चित केल्याने जंगलात वाघांची उपस्थिती ठळकपणे दिसून येत आहे. चांदोली परिसरात सेनापती आणि सुभेदार हे दोन नर वाघ प्रामुख्याने फिरत असताना, कोयना अभयारण्यात STR T3 ‘बाजी’ याने आपले स्वतंत्र हद्द क्षेत्र निर्माण केले आहे. भैरवगड ते पाली-मालदेव परिसरापर्यंत बाजीचा दबदबा असून, तो याच भागात नियमितपणे शिकार करीत असल्याची नोंद आहे. कोयना परिसरात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये अलीकडेच STR T3 बाजीचे स्पष्ट फोटो व व्हिडिओ कैद झाले आहेत. वाचा सविस्तर

  • 24 Jan 2026 04:30 PM (IST)

    24 Jan 2026 04:30 PM (IST)

    ट्रम्प भारतावरील २५% कर उठवण्याच्या तयारीत? अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरीने दिले संकेत 

    भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी भारतावरील २५% कराबाबत मोठे संकेत दिले आहेत. त्यांनी भारतावरील २५% कर कमी होणार असल्याचे म्हटले आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यामुळे हा कर हटण्याची शक्यता असल्याचे स्कॉट बेझंट यांनी म्हटले आहे.

  • 24 Jan 2026 04:25 PM (IST)

    24 Jan 2026 04:25 PM (IST)

    चीनची पुन्हा तैवानला धमकी; १८ लढाऊ विमानांची घुसखोरी

    चीन आणि तैवानमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनने पुन्हा एकदा त्यांच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली आहे. २६ चिनी लढाऊ विमाने आणि ६ नौदलाची जहाजे चीनने तैवानने तैनात केली असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. चीनच्या या कृत्याला युद्धाची चिथावणी असल्याचे तैवानने म्हटले आहे.

  • 24 Jan 2026 04:20 PM (IST)

    24 Jan 2026 04:20 PM (IST)

    ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांचा गाझा बोर्ड ऑफ पीसला विरोध

    ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ट्रम्पवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या गाझा बोर्ड ऑफ पीसला तीव्र विरोध केला आहे. लुला दा सिल्वा यांच्या मते, ट्रम्प संयुक्त राष्ट्रासारखी आणखी एक नवीन संघटना निर्माण करुन त्यावर पूर्ण नियंत्रणाचा हेतू ठेवत आहेत. लुला यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी यावर चर्चा केली. यावेळी चीन ब्राझीलच्या पाठिशी असल्याचे शी जिनपिंग यांनी म्हटले. तसेच संयुक्त राष्ट्रात याबाबत भूमिका मांडण्याचा आग्रह देखील ब्राझीच्या अध्यक्षांनी जिनपिंग यांना केला आहे. यापूर्वी फ्रान्स, ब्रिटन, चीनने देखील ट्रम्प यांच्या गाझा बोर्ड ऑफ पीस पासून स्वत:ला दूर ठेवले आहे.

  • 24 Jan 2026 04:19 PM (IST)

    24 Jan 2026 04:19 PM (IST)

    वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार

    वडगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले संख्याबळ दाखवत सर्व प्रमुख समित्यांवर नियंत्रण मिळवले आहे. नगरपंचायत सभागृहात मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत स्थायी समिती व पाच विषय समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्षा अबोली ढोरे, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, बांधकाम समितीच्या सभापतीपदी गणेश म्हाळसकर, आरोग्य समितीच्या सभापतीपदी माया चव्हाण तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सुनीता ढोरे, तर उपसभापतीपदी पूनम भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

  • 24 Jan 2026 04:15 PM (IST)

    24 Jan 2026 04:15 PM (IST)

    इंडोनेशियात भूस्खलनात ७ जणांचा मृत्यू, ८२ बेपत्ता

    इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात शनिवारी भूस्खलामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या भूस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८२ लोक अजूनही बेपत्ता आहेत. इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने याची पुष्टी केली आहे. गेल्या महिन्यात इंडोनेशियाच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले होते. यामध्ये उत्तर सुमात्रा, पश्चिम सुमात्रा आणि आंचे प्रांतात १००० हून नागरिकांचा मृत्यू झाल होता.

  • 24 Jan 2026 04:10 PM (IST)

    24 Jan 2026 04:10 PM (IST)

    इराणी राजदूतांनी अणुशस्त्रांना म्हटले हराम

    इराणचे भारतातील राजदूत अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी अणुशस्त्रे हरमा असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी इराण अशी प्रकारची शश्त्रे विकसित करणार नाही असेही म्हटले आहे. इलाही यांनी इराणवरील अमेरिकेच्या आरोपांना फेटाळले आहे. तसेच त्यांनी सांगितले की, इराणला त्यांच्या अणुकार्यक्रम आणि मानवी हक्कांच्या मुद्यांवरुन अमेरिकेच्या निर्बंधांना तोंड द्यावे लागल आहे. ज्या देशांकडे अणुशस्त्रे आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही असे त्यांनी म्हटले आहे.

  • 24 Jan 2026 04:05 PM (IST)

    24 Jan 2026 04:05 PM (IST)

    भारतीय-अमेरिकन व्यक्तीने किरकोळ वादातूवन केली पत्नी अन् नातेवाईकांची हत्या

    अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात एका एका नागरिकांने आपल्या भारतीय वंशाच्या पत्नीसह चार नातेवाईकांची हत्या केली आहे. शुक्रवारी (२३ जानेवारी २०२६) ही घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. सुदैवाची बाब म्हणजे यामध्ये तीन लहान मुलांचा थोडक्यात बचाव झाला आहे. त्यांनी वेळे 911 वर कॉल केल्याने त्यांचा जीव बचावला आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेवर भारतीय दूतावासाने दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पीडीतांच्या कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत करण्याचे म्हटले आहे.

  • 24 Jan 2026 03:52 PM (IST)

    24 Jan 2026 03:52 PM (IST)

    पत्नीच्या सल्ल्याने पालटला दिवस! 23 डावांनंतर फॉर्ममध्ये परतलेल्या कर्णधाराने केला खुलासा

     भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव केला. दुसरा सामना शुक्रवारी  रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे लक्ष्य इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या  जोरावर १५.२ ओव्हरमध्येच गाठले. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात सुरकुमार यादवने नाबाद अर्धशतक झळकवले. याबाबत त्याने मोठा खुलासा केला आहे.

  • 24 Jan 2026 03:46 PM (IST)

    24 Jan 2026 03:46 PM (IST)

    ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

    अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयातील गोदामातून ड्रग्ज काढून त्याची परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणावरून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संशयित पोलीस कर्मचाऱ्याची स्थानिक गुन्हे शाखेत झालेली नियुक्ती आणि त्याचे पारनेर कनेक्शन यावरून त्यांनी संशय व्यक्त केला आहे. विखे पाटील यांनी मागणी केली की संबंधित कर्मचारी गुजर याला एलसीबीमध्ये कोणाच्या शिफारशीने बदली झाली आणि गायब केलेले ड्रग्ज पारनेरमध्ये कोणाच्या घरी ठेवले होते याची नावे पोलिसांनी जाहीर करावीत.

  • 24 Jan 2026 03:35 PM (IST)

    24 Jan 2026 03:35 PM (IST)

    पालिकेत समाविष्ठ भागातील नगरसेवकांना महापौर पदाची संधी द्या; स्थानिक मतदारांची मागणी

    पालिकेचे महापौर पद यंदा सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यासाठी राखीव झाल्याने, कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. पालिकेत समाविष्ठ जुन्या नगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकान ऐवजी इतर वसाहतीमधून निवडून आलेल्या नगरसेवकांना महापौर पदाची संधी देण्यात आली पाहिजे अशी चर्चा परिसरातील मतदारांमध्ये आहे.

  • 24 Jan 2026 03:29 PM (IST)

    24 Jan 2026 03:29 PM (IST)

    Raigad News: पनवेल शहरातील प्लास्टिक पिशव्या हद्दपार, दुकानदारांना नोटिसा बजावल्या

    पनवेल महापालिकेने प्लास्टिक पिशवी विक्रीवर प्रशासनाने ठोस पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला असून नियमानुसार कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांवर कडक निर्बंध घालण्याकरीता दुकानदारांना याआधी नोटीसा बजाविण्यात आल्या असून जनजागृतीच्या माध्यमातून सुद्धा पालिका प्रशासनाने नागरिकांना प्लास्टिक पिशवी वापरू नये असे आव्हान करण्यात आले होते. त्याच बरोबर पालिकेने धडक कारवाई सुरु ठेवल्याने पालिका क्षेत्रातून प्लास्टिक पिशव्या हद्दपार होण्याच्या मार्गावर असून शहराची प्लास्टिक मुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

  • 24 Jan 2026 03:20 PM (IST)

    24 Jan 2026 03:20 PM (IST)

    इराणमध्ये युद्धाचा बिगुल वाजला? 6 मोठ्या विमान कंपन्यांनी अचानक फ्लाइट्स केल्या रद्द

    Iran US Tension : तेहरान : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा बिगुल लागला आहे. इराण आणि अमेरिकेतील तणाव पुन्हा वाढला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाचा एक मोठा ताफा मध्यपूर्वेत तैनात करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. यामुळे परिस्थिती अधिक बिकट झासली आहे. अमेरिकेच्या या पावलामुळे इराणने प्रत्युत्तरदाखल युद्धाचे संकेत दिले आहे. यामुळे मध्यपूर्वेतील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

  • 24 Jan 2026 03:10 PM (IST)

    24 Jan 2026 03:10 PM (IST)

    IND VS NZ 2nd T20l Match : टी२० मध्ये भारताने पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला

    India broke Pakistan’s world record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. काल, शुक्रवारी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात  भारताने २०९ धावांचे लक्ष्य गाठत न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव करून मालिकेत २-० अशी आघाडी घातली. भारताने या विजयासह एक खास इतिहास देखील रचला आहे.

  • 24 Jan 2026 02:57 PM (IST)

    24 Jan 2026 02:57 PM (IST)

    डेटिंग ॲपवरून ओळख, तरुणाला भेटायला बोलावले अन्

    राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. डेटिंग ॲपवरून ओळख केल्यानंतर भेटण्यास बोलवत तरूणाला शस्त्राच्या धाकाने लुटल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या चौघांकडून लुटमारीचे आणखी दोन प्रकार उघडकीस आले असून, सर्व आरोपी कात्रज भागातील आहेत.

  • 24 Jan 2026 02:52 PM (IST)

    24 Jan 2026 02:52 PM (IST)

    अमेरिकन राजदूतांचे 'गुपित' रेकॉर्डिंग आणि खळबळ

    शेजारील देश बांगलादेशात (Bangladesh) १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ‘जमात-ए-इस्लामी’ (Jamaat-e-Islami) या कट्टरपंथी संघटनेवर भारताने बंदी घातली आहे आणि जिचा इतिहास रक्तरंजित राहिला आहे, त्याच संघटनेशी अमेरिकेने आपले संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका खळबळजनक अहवालानुसार, अमेरिकन (America) राजनैतिक अधिकारी आता उघडपणे ‘जमात’ला आपला मित्र बनवण्याची भाषा करत आहेत, ज्यामुळे भारताच्या राजनैतिक वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.

    #BREAKING : 🇧🇩 🇺🇸 Washington Post leak involves a significant shift in U.S. foreign policy toward Bangladesh, specifically concerning its engagement with the Jamaat-e-Islami party. 👇

    The leak is based on audio recordings from a closed-door meeting held on December 1, 2025,… pic.twitter.com/kU2T6Myl5L

    — ConflictX (@ConflictXtweets) January 23, 2026

    credit - social media and Twitter

  • 24 Jan 2026 02:29 PM (IST)

    24 Jan 2026 02:29 PM (IST)

    धावत्या बाईकवर स्टंटबाजी करताना तरुणाचा तोल गेला अन्

    अलकीडे सोशल मीडियाच्या काळात लोकांना प्रसिद्धची वेड लागले आहे. यासाठी लोक आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहे. विशेष करुण तरुण मंडळींचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सध्या असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरुणांना धावत्या बाईकवर स्टंटबाजी चांगली भोवली आहे. बाईकवरुन एक तरुण असा जमिनीवर आदळला आहे की पुन्हा कधी स्टंट करण्याचा विचार करणार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 24 Jan 2026 02:12 PM (IST)

    24 Jan 2026 02:12 PM (IST)

    Ayush Mhatre ने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी!

    IND vs NZ U19 सामन्यात नाणेफेक पार पडले आणि भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघाने एक बदल करण्यात आला आहे. जखमी झालेला आरोन जॉर्ज याचे भारतीय संघामध्ये पुनरागमन झाले आहे. त्याने मागील काही मालिकांमध्ये कमालीची कामगिरी केली आहे.

  • 24 Jan 2026 02:00 PM (IST)

    24 Jan 2026 02:00 PM (IST)

    फिरायला नेतो म्हणत नात्यातील तरुणीचे अपहरण; आळंदीत मंदिरात बळजबरीने लग्न

    जालन्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. नात्यातील मुलीला फिरायला जायचं म्हणून कारमध्ये बसलं आणि तीला थेट पुण्यातील आळंदी येथे नेलं. नंतर मुलीची इच्छा नसतांना ‘लग्न कर नाहीतर तुला जिवंत मारून टाकू,’ अशी धमकी देत तरुणीचे बळजबरीने लग्न लावून घेतल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात घडला आहे.

  • 24 Jan 2026 01:55 PM (IST)

    24 Jan 2026 01:55 PM (IST)

    सूर्यकुमार यादवबाबत केलेला दावा शिवम दुबेचा सिद्ध! म्हणाला – तेव्हा मी म्हटले होते की जगाला…

    भारतीय अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने कर्णधार सूर्यकुमार यादवचे कौतुक केले आहे, असे म्हटले आहे की, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात स्टार फलंदाजाच्या स्फोटक खेळीने तो खेळाच्या सर्वात लहान स्वरूपात जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे सिद्ध केले. पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी त्याच्या टीकाकारांना शांत करण्यासाठी सूर्यकुमारने २३ डावांनंतर पहिल्यांदाच ५० पेक्षा जास्त धावा केल्या.

  • 24 Jan 2026 01:50 PM (IST)

    24 Jan 2026 01:50 PM (IST)

    दरवर्षी एकाच गोष्टीची पाहिली जाते वाट, यावर्षी होणार का जनतेची इच्छा पूर्ण

    १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. जुन्या कर व्यवस्थेअंतर्गत आयटीआर दाखल करणाऱ्या उत्पन्न करदात्यांना आशा आहे की सीतारमण जवळजवळ एक दशकापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करतील. बचत आणि खर्चावरील कर कपात वाढवण्याची ही मागणी आहे. महागाई, वैद्यकीय खर्च आणि घरांच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली असूनही, या वजावटी जवळजवळ एक दशकापासून अपरिवर्तित आहेत. भारतातील जुनी कर व्यवस्था नेहमीच कर बचतीचे साधन राहिली नाही तर बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक सामाजिक-आर्थिक साधन देखील राहिली आहे.

  • 24 Jan 2026 01:45 PM (IST)

    24 Jan 2026 01:45 PM (IST)

    हार्दिक पांड्या आणि मुरली कार्तिकमध्ये मैदानावर बाचाबाची? नक्की झालं काय

    भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा सात विकेट्सने पराभव केला. शुक्रवारी रायपूरमधील शहीद वीर नारायण स्टेडियमवर भारताने १५.२ षटकांत २०९ धावांचे लक्ष्य सहज गाठले. भारताच्या विजयासोबतच, स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सामन्यापूर्वी हार्दिक माजी भारतीय फिरकी गोलंदाज आणि सादरकर्ता मुरली कार्तिकवर रागावताना दिसला. त्याने एका क्षणी कार्तिकला बोटही दाखवले. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • 24 Jan 2026 01:40 PM (IST)

    24 Jan 2026 01:40 PM (IST)

    पिंपरी-चिंचवड महापालिकेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 29 नगरसेवक

    खून, खुनाचा प्रयत्न, दंगल, मारहाण, शासकीय कामात अडथळा, जमीन घोटाळा तसेच शस्त्र परवाना नियमांचे उल्लंघन अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असणारे २९ नगरसेवक पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात दिसणार आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी अशा उमेदवारांनाही मतदारांनी निवडून दिले आहे. ज्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त आणि गुन्हेगारी स्वरूपाची आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक १४, राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ तर शिवसेनेच्या २ नगरसेवकांचा समावेश आहे.

     

  • 24 Jan 2026 01:30 PM (IST)

    24 Jan 2026 01:30 PM (IST)

    “मुंब्रा हिरवे करण्याचा उद्देश राजकीयच…”, किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर Sahar Sheikh यांचा माफीनामा

    ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंब्र्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. एमआयएमच्या (AIMIM) नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत मुंब्रा प्रभाग ३० मधून विजयी झालेल्या सहर शेख यांनी एका विजयी मिरवणुकीत आक्रमक भूमिका मांडली होती. त्या म्हणाल्या होत्या की, “येत्या काळात संपूर्ण मुंब्रा विधानसभा मतदारसंघ आम्ही जिंकू आणि संपूर्ण मुंब्रा ‘हिरवा’ होईल”. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ निर्माण झाला होता.

  • 24 Jan 2026 01:20 PM (IST)

    24 Jan 2026 01:20 PM (IST)

    चंद्रपूर काँग्रेसमध्ये फूट… हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टचं सांगितलं

    चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. पण कालपासून चंद्रपूर काँग्रेसमध्ये फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात मतभेद सुरू असल्याचे बोलले जात होते. त्यातच प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या १३ नगरसेवकांसोबत नागपूरच्या विभागीय कार्यालयात एक गट स्थापन केला, त्यामुळे विजय वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील चव्हाट्यावर आले होते. पण या सगळ्या वादावर आता पडदा पडला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे.

  • 24 Jan 2026 01:12 PM (IST)

    24 Jan 2026 01:12 PM (IST)

    चोरट्यांचा धुमाकूळ; सोन्याची बोरमाळ लंपास; दार तोडून थेट…

    शहरालगतच्या पेढे वडकर कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळी ७.०० वाजण्याच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर उमाजी मंडले (वय ३६, व्यवसाय नोकरी) हे पेढे, वडकर कॉलनी येथील रूम नं. बी-१० येथे भाड्याने वास्तव्यास आहेत. अज्ञात चोरट्‌यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने कट करून उचकडत दरवाजा उघडला. त्यानंतर फ्लॅटमध्ये प्रवेश करून कपाटात ठेवलेलों २७,७५०/- किमतीची सोन्याची बोरमाळ लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.

  • 24 Jan 2026 01:00 PM (IST)

    24 Jan 2026 01:00 PM (IST)

    अ‍ॅप डाउनलोडमध्ये भारत आघाडीवर, मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मचीही झपाट्याने वाढ

    जनरेटिव्ह एआय आणि मायक्रोड्रामा अ‍ॅप्सच्या झपाट्याने वाढीमुळे भारत अ‍ॅप डाउनलोडमध्ये जगात आघाडीवर राहिला आहे. २०२५ मध्ये भारतात सुमारे २५.५ अब्ज अ‍ॅप्स डाउनलोड होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

  • 24 Jan 2026 12:50 PM (IST)

    24 Jan 2026 12:50 PM (IST)

    सुर्या दादाने आणखी एकदा जिंकलं मनं…सामना जिंकल्यानंतर रघुचे धरले पाय

    कर्णधाराने त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच खूश केले नाही तर त्याने पुढे जे केले त्याने सर्वांचे मन जिंकले. सामन्यानंतर, भारतीय कर्णधाराने टीम इंडियाच्या थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट रघुचे पाय स्पर्श केले.

  • 24 Jan 2026 12:30 PM (IST)

    24 Jan 2026 12:30 PM (IST)

    अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

    साताऱ्यातील फलटण तालुक्यात अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या 27 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आधी दगडाने ठेचून खून, नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून नदी व शेततळ्यात फेकले. तिघे आरोपी अटकेत.

  • 24 Jan 2026 12:25 PM (IST)

    24 Jan 2026 12:25 PM (IST)

    Bihar Crime: थरकाप उडवणारी घटना! नगरसेवकाच्या मुलाने अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून जाळले जिवंत

    बिहारच्या पाटण्यात वॉर्ड नगरसेवकाच्या मुलाने दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले. सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. आरोपीने न्यायालयात आत्मसमर्पण केले.

  • 24 Jan 2026 12:20 PM (IST)

    24 Jan 2026 12:20 PM (IST)

    वाढलेले वजन कमी करताना आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन

    वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. सतत प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे किंवा ज्यूसचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचते आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

  • 24 Jan 2026 12:10 PM (IST)

    24 Jan 2026 12:10 PM (IST)

    गुपचूप सुरु होता बालविवाह; पोलिसांना माहिती मिळताच टाकली धाड, अन् नंतर…

    सातारा तालुका पोलिसांनी यवतेश्वर येथे होणारा बालविवाह रोखला. शुक्रवारी (दि.२३) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मालोजी चव्हाण यांना यवतेश्वर (ता. सातारा) येथे बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

  • 24 Jan 2026 12:05 PM (IST)

    24 Jan 2026 12:05 PM (IST)

    युद्धविराम की तिसरे महायुद्ध? अबू धाबीत रशिया-युक्रेन शांतता चर्चेसाठी आमने-सामने,

    Russia Ukraine Peace Talks : रशिया आणि युक्रेन शांतता चर्चेसाठी पुन्हा एकदा अबू धाबीमध्ये आमने-सामने आले आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने ही चर्चा पार पडत असून संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे.

  • 24 Jan 2026 12:00 PM (IST)

    24 Jan 2026 12:00 PM (IST)

    गुपचूप सुरु होता बालविवाह; पोलिसांना माहिती मिळताच टाकली धाड, अन् नंतर…

    सातारा तालुका पोलिसांनी यवतेश्वर येथे होणारा बालविवाह रोखला. शुक्रवारी (दि.२३) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मालोजी चव्हाण यांना यवतेश्वर (ता. सातारा) येथे बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पाठवून तात्काळ कारवाई करण्यात आली.

  • 24 Jan 2026 11:50 AM (IST)

    24 Jan 2026 11:50 AM (IST)

    एक क्लिकमध्ये मीम तयार! Google Photos चं नवं फीचर युजर्ससाठी गेमचेंजर

    टेक कंपनी गूगलने गुगल फोटोसाठी एक मजेदार फीचर रोल आऊट केलं आहे. या फीचरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून यूजर्स त्यांचे फोटो मीममध्ये बदलू शकणार आहेत. या फीचरचे नाव मी मीम (Me Meme) असं आहे. हे फीचर यूजर्सना त्यांच्या ईमेजसोबत मजेदार किंवा त्यासंबंधित टेक्स्ट जोडण्याची सुविधा देणार आहे. या फीचरची घोषणा सर्वात आधी ऑक्टोबर 2025 मध्ये करण्यात आली होती.

Web Title: Maharashtra breaking news live updates marathi maharashtra political news national international war sports crime news maharashtra zilla parishad election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने ‘हा’ नाराज नेता सोडणार काँग्रेसचा ‘हात’? शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
1

राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने ‘हा’ नाराज नेता सोडणार काँग्रेसचा ‘हात’? शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

BREAKING: मुंबई विधान भवनाला इमेलद्वारे धमकी; पोलीस यंत्रणा अलर्टवर
2

BREAKING: मुंबई विधान भवनाला इमेलद्वारे धमकी; पोलीस यंत्रणा अलर्टवर

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
3

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

PCMC News: स्वीकृत सदस्यांसाठी भाजपमध्ये ‘तारीख पे तारीख’; आमदार समर्थकांच्या स्पर्धेत निष्ठावंतांची कोंडी?
4

PCMC News: स्वीकृत सदस्यांसाठी भाजपमध्ये ‘तारीख पे तारीख’; आमदार समर्थकांच्या स्पर्धेत निष्ठावंतांची कोंडी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.