
Top Marathi News Today: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार झाले आहे
Marathi Breaking news live updates : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल (दि.28) बारामतीमध्ये निधन झाले. विमान अपघातामध्ये अजित पवारांचे अपघाती निधन झाले. चार सभांसाठी मुंबईहून बारामतील निघालेल्या या विमानात अजित पवारांसह आणखी 4 जणांचा समावेश होता. विमानाचा अपघात इतका भीषण होता की विमानातील सर्वांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांचे पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे फक्त पवार कुटुंब नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. अजित पवारांवर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी अजित पवारांचे पार्थिव हे काटेवाडीमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले.
29 Jan 2026 06:54 PM (IST)
Who is Sunetra Pawar: बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सकाळी विमान अपघातात निधन झाले आणि देशभरता शोककळा पसरली. अजित पवारांचे अचानक जाणे अवघ्या महाराष्ट्रासाठी मोठा धक्का होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवीन उमेदवाराची चर्चा सुरू झाली आहे. चर्चेत असलेले पहिले नाव म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार. फडणवीस सरकारमध्ये सुनेत्रा पवार यांचा विचार केला जाऊ शकतो अशी अटकळ आहे.
29 Jan 2026 06:47 PM (IST)
Baramati Airport Accident: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर आता बारामती विमानतळाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या विमानतळावर देशातील मोठे नेते आणि व्हीव्हीआयपी विमाने उतरतात, ते विमानतळ तांत्रिकदृष्ट्या किती ‘असुरक्षित’ आहे, याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) स्वतः या विमानतळाला ‘अनियंत्रित’ (Uncontrolled Airport) मानत असल्याने खळबळ उडाली आहे.
29 Jan 2026 06:40 PM (IST)
लोकशाही व्यवस्थेत राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून समाज घडवण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे अनेकदा प्रश्न उपस्थित होतो की, राजकारणी होण्यासाठी शिक्षित असणं खरंच गरजेचं आहे का? आजवरचा राजकीय इतिहास पाहिला तर उत्तर थोडंसं मिश्र आहे. पूर्वीच्या काळात राजकारणात शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. समाजातील प्रश्न, लोकांच्या अडचणी आणि जमिनीवरचं वास्तव समजणारा माणूस नेता होऊ शकत होता. त्यामुळे शिक्षित असो वा अशिक्षित, दोघांनाही राजकारणात संधी मिळत होती. मात्र, काळ बदलला आहे. आज राजकारण ही केवळ सभा, भाषण आणि आंदोलनांपुरती मर्यादित गोष्ट राहिलेली नाही, तर धोरणे, कायदे, अर्थकारण, प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांच्याशी थेट जोडलेली आहे.
29 Jan 2026 06:35 PM (IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने केवळ राजकीयच नव्हे तर प्रशासकीय पातळीवरही एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विशेषतः अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ येत असताना, सरकारला त्यांची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवत आहे. परंपरेनुसार, उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील सर्व विभागांची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांच्या राज्य शोकानंतर या संदर्भात औपचारिक अधिसूचना जारी केली जाईल.
29 Jan 2026 06:25 PM (IST)
भारतीय ऑटो बाजार हा जगातील सर्वात मोठ्या ऑटो बाजारांपैकी एक आहे. या ऑटो बाजारात दिवसेंदिवस वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ होतेय. हीच मागणी लक्षात अनेक विदेशी ऑटो ब्रॅण्ड्स सुद्धा मार्केटमध्ये एकापेक्षा एक दमदार कार आणण्याच्या तयारीत आहे. अशातच, भारताचा Budget 2026 येत्या 1 फेब्रुवारी 2026 ला सादर होणार आहे.
29 Jan 2026 06:19 PM (IST)
इचलकरंजी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे (ichalkaranji) वस्त्रोद्योग क्षेत्राची व खासकरून यंत्रमाग उद्योगाला पाठबळ देणारा नेता हरपला, अशी भावना वस्त्रनगरीतून व्यक्त केली जात आहे. वस्त्रो्योगाकडे डोळस नजरेने पाहणारा व नेहमी पाठिशी राहणारा नेता हरपल्याची भावना संपूर्ण इचलकरंजीकरांची आहे. त्यांना इचलकरंजीतील तमाम यंत्रमागधारकांच्याकडून व दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
29 Jan 2026 06:11 PM (IST)
Baramati Airport Accident: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर आता बारामती विमानतळाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या विमानतळावर देशातील मोठे नेते आणि व्हीव्हीआयपी विमाने उतरतात, ते विमानतळ तांत्रिकदृष्ट्या किती ‘असुरक्षित’ आहे, याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) स्वतः या विमानतळाला ‘अनियंत्रित’ (Uncontrolled Airport) मानत असल्याने खळबळ उडाली आहे.
29 Jan 2026 06:03 PM (IST)
मुंबई: किया इंडिया या आघाडीच्या प्रीमियम कारमेकर कंपनीने आज नवीन किया सेल्टोससह आपल्या किया सेल्टोससह इन्स्पायरिंग ड्राइव्ह (के.आय.डी) प्रोग्रामच्या रि-लाँचची घोषणा केली, ज्यासह रस्ता सुरक्षा, जबाबदार ड्रायव्हिंग वर्तणूक आणि सुधारित ग्राहक सहभागाप्रती ब्रँडची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. के.आय.डी. प्रोग्राम ग्राहकांसाठी कियाच्या कनेक्टेड उत्पादन पोर्टफोलिओमध्ये टप्प्याटप्प्याने उपलब्ध असेल आणि किया कनेक्ट अॅपच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो.
29 Jan 2026 05:36 PM (IST)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे (ichalkaranji) वस्त्रोद्योग क्षेत्राची व खासकरून यंत्रमाग उद्योगाला पाठबळ देणारा नेता हरपला, अशी भावना वस्त्रनगरीतून व्यक्त केली जात आहे. वस्त्रो्योगाकडे डोळस नजरेने पाहणारा व नेहमी पाठिशी राहणारा नेता हरपल्याची भावना संपूर्ण इचलकरंजीकरांची आहे. त्यांना इचलकरंजीतील तमाम यंत्रमागधारकांच्याकडून व दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
29 Jan 2026 05:16 PM (IST)
भारतीय ऑटो बाजारात SUV सेगमेंटमधील वाहनांना ग्राहकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार एसयूव्ही ऑफर करत असतात. अशीच एक लोकप्रिय आणि ग्राहकांची आवडती एसयूव्ही म्हणजे Hyundai Creta. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माता कंपनी या एसयूव्हीची नवी जेनरेशन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतात ही एसयूव्ही लाँच करताना सध्याच्या इंजिन पर्यायांसोबत हायब्रिड टेक्नॉलॉजीचाही समावेश करू शकते. सध्याच्या जेनरेशनमध्ये 1.5 लीटर पेट्रोल, टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत.
29 Jan 2026 04:50 PM (IST)
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होताच नेरळ येथे हिंसाचाराची गंभीर घटना घडली आहे. नेरळ गावातील ममदापूर नाक्यावर मध्यरात्री एका तरुणावर टोळक्याने चाकू हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेरळ जिल्हा परिषद गटाच्या प्रचारादरम्यान शाब्दिक वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रायगड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर नेरळ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
29 Jan 2026 04:45 PM (IST)
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. महाड तालुक्यातील ५७ करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघ सध्या विशेष चर्चेत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात यंदा चार प्रमुख राजकीय पक्षांमध्ये लढत होत आहे. या मतदारसंघातील मतदारांच्या समस्या काय आहेत? त्या सोडविण्यात प्रशासनाला राजकीय नेत्यांना यश आले का? मतदार कोणत्या मुद्द्यांवर मतदान करतील? याबाबत थेट मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत
29 Jan 2026 04:40 PM (IST)
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांना तुरुंगातून गुप्तपणे रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. त्यांची गुप्त वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. २३-२४ जानेवारीच्या रात्री आदियाला तुरुंगातून इस्लामाबाद येथील तुरुंगात खान यांना हलवण्यात आले असल्याचे पाकिस्तानी पत्रकार जाहिद गिश्कोरी यांनी म्हटले आहे. पत्रकार जाहिद गिश्कोरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांना रुग्णायात नेण्यात आले त्यावेळी सेलमधील लाईट बंद करण्यात आले होते. त्यांना मागील गुप्त मार्गाने बाहेर काढण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. जवळपास अडीच तास खान रुग्णालयात होते. यानंततर त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले.
29 Jan 2026 04:35 PM (IST)
सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. यानुसार लँडिंगच्या शेवटच्या काही सेकंदात विमानात काहीतरी चूक झाली असावी. विमानाच्या धावपट्टीची दृश्यमानता ओळखण्याचा प्रयत्न करत असतान विमान चुकीच्या ठिकाणी उतरत असल्याचे पायलटला शेवटच्या क्षणी लक्षात आले असावे. त्याचवेळी काही सेकंदांसाठी वैमानिकाचे विमानाच्या वेग आणि उंचीवर त्याचे लक्ष गेले नसावे.
29 Jan 2026 04:30 PM (IST)
कालचे राष्ट्रपतींचे भाषण हे 140 करोड नागरिकांच्या आत्मविश्वास आणि प्रयत्नांची एक शक्तिशाली अभिव्यक्ती होती. ते म्हणाले की, राष्ट्रपतींच्या भाषणात 140 करोड नागरिकांच्या, विशेषतः तरुणांच्या आकांक्षा अचूकपणे मांडल्या गेल्या आहेत. राष्ट्रपतींनी अधिवेशनाच्या सुरुवातीला आणि २०२६ च्या सुरुवातीला संसद सदस्यांसमोर ठेवलेल्या अपेक्षा सर्व खासदारांनी गांभीर्याने घ्याव्यात. माननीय राष्ट्रपतींनी सर्व संसद सदस्यांसाठी सभागृहात अनेक मार्गदर्शक मुद्दे मांडले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
29 Jan 2026 04:20 PM (IST)
देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरले आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारकडून या निकालांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या गटात जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.यंदा महाराष्ट्राने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला होता. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, गणेशोत्सवाचा सामाजिक वारसा आणि त्यातून मिळणारा आर्थिक रोजगार व आत्मनिर्भरतेचा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला होता. चित्ररथावरील भव्य गणेशमूर्ती, पारंपरिक ढोल-ताशा पथक आणि लेझीम खेळणाऱ्या कलाकारांच्या उत्साहाने कर्तव्यपथ दुमदुमून गेला होता. याच प्रभावी सादरीकरणामुळे परीक्षकांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गटातून महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवडले आहे. केवळ राज्यांच्या श्रेणीतच नव्हे, तर इतर विभागांतही चुरस पाहायला मिळाली.
29 Jan 2026 04:15 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आपल्यता देशात तिहेरी तलाकवर कायदेशीर बंदी आहे तरी देखील तिहेरी तालाकचे प्रकार समोर येत असतात.सबा असद खान (वय 24, रा. टाउनहॉल, भडकलगेट, छत्रपती संभाजीनगर) असे पीडित महिलेचे नाव आहे. तिने बेगमपुरा पोलिस ठाण्यात पती व सासरच्यांविरुद्ध तक्रार दिली आहे. तर घडलं असं की, पीडितेचा विवाह ११ जून २०२३ रोजी असद अय्युब खान (वय 28, रा. सैलाबनगर, नांदेड) यांच्याशी झाला होता. विवाहनंतर सुरुवातीला दोन ते तीन महिने सासरच्यांकडून चांगली वागणूक मिळाली होती. मात्र त्यांनतर पती असद आणि सासरे अय्युब यांनी हुंड्याचे उरलेले पाच लाख रुपये माहेरून आणण्याची मागणी सुरू केली.मात्र वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने पैसे आणणे शक्य नाही असे तिने सांगितले. तेव्हा पती, सासरे, सासू रेश्मा, दीर अरबाज व सोहेल, नणंद सुमैय्या आणि नंदोई मोहसीन यांनी तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत “जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी देण्यात आली. नंतर ऑगस्टच्या २०२४ मध्ये पीडित गर्भवती झाली. हे माहिती होता सासरच्यांनी तिला मारहाण केली. ती प्रसूतीसाठी माहेरी आली. तिथे तिला मुलगी झाली.
29 Jan 2026 04:12 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली. “सगळ्यांचीच मागणी आहे की वहिनींना मंत्रिपदी आणावे,असं झिरवाळ यांनी सांगितलं.
29 Jan 2026 04:10 PM (IST)
सहसा नॉर्वे, आइसलँड किंवा अलास्कासारख्या ध्रुवीय प्रदेशात दिसणारे रंगीबेरंगी ‘ऑरोरा’ (Red aurora) जेव्हा भारतासारख्या देशात दिसतात, तेव्हा ते केवळ कुतूहलाचा विषय ठरत नाहीत, तर चिंतेची बाब बनतात. १९ आणि २० जानेवारीच्या रात्री लडाखमधील ‘हानले डार्क स्काय रिझर्व्ह’ (Hanle Dark Sky Reserve) चे निळे आकाश अचानक रक्तासारखे लाल झाले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असले तरी, शास्त्रज्ञांच्या मते हे दृश्य भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे.
29 Jan 2026 04:05 PM (IST)
पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बैंक युनियन्स (यूएफबीयू) यांच्या वतीने मंगळवार, २७ रोजी बँकांकडून एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. या अनुषंगाने पंजाब नॅशनल बँक, अदालत रोड येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. या संपांमुळे सर्व बँकांचे व्यवहार ठप्प झाले असून शहरात सुमारे ५०० ते ६०० कोटी रुपयांचे क्लिअरिंग व्यवहार ठप्प झाले.यूएफबीयूचे कन्व्हेनर व बँक ऑफ महाराष्ट्रचे कॉ. राजेंद्र देवळे यांनी सूत्रसंचालन केले. एनसीबीचे ललित निकुंभ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बँक कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे बँक कर्मचारी व अधिकारी शारीरिक व मानसिक तणावाखाली आहेत. सुमारे ८२ टक्के कर्मचारी-अधिकाऱ्यांना वर्क-लाईफ बॅलन्स नसल्यामुळे आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
29 Jan 2026 03:55 PM (IST)
“घरोघरी मातीच्या चुली” मालिकेतील नवा ट्विस्ट समोर आला आहे.गेले कित्येक दिवस मास्क मॅन बनून माया रणदिवे कुटुंबाच्या जीवावर उठली आहे.ऐश्वर्याच्या मदतीने रणदिवे कुटुंबाला नेस्तनाबूत करण्यासाठी माया दिवसेंदिवस खालच्या पातळीला उतरत आहे. जानकी जेव्हा जेव्हा मास्क मॅन माया असल्याचा संशय आला तेव्हा तेव्हा मायाने स्वत:चा बचाव केला. हा मास्कमॅन नक्की आहे तरी कोण हे कळण्यासाठी अवंतिका, जानकी आणि सुमित्रा यांनी प्लॅन रचला होता.
29 Jan 2026 03:50 PM (IST)
चाकण/अतिश मेटे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. छोट्या कार्यकर्त्यालाही प्रोत्साहन देणारे, कडक स्वभावामागे अपार प्रेम जपणारे आणि शब्दांइतकेच कृतीत ठाम असलेले नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
29 Jan 2026 03:45 PM (IST)
WPL 2026 Point Table : महिला प्रिमियर लीग 2026 आता शेवटच्या टप्प्यात आहे, आता फक्त स्पर्धेचे शेवटचे तीन साखळी सामने शिल्लक आहेत. त्यानंतर एक एलिमिनेटर सामना आणि फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. महिला प्रिमियर लीग 2026 च्या गुणतालिकेवर नजर टाकली तर आरसीबीचा संघ हा अव्वल स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर असलेला संघ हा फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. सध्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानामध्ये सध्या चुरशीची लढत आहे.
29 Jan 2026 03:37 PM (IST)
घरच्या घरी बनवलेला मसाला शेंगदाणा हा चटकदार, कुरकुरीत आणि सगळ्यांचा आवडता असा स्नॅक आहे. चहा-कॉफीबरोबर, प्रवासात खायला किंवा उपवासानंतर हलका नाश्ता म्हणून मसाला शेंगदाणा खूपच परफेक्ट लागतो. बाजारात मिळणाऱ्या शेंगदाण्यांपेक्षा घरचा बनवलेला मसाला शेंगदाणा जास्त स्वच्छ, ताज्या तेलात आणि आपल्या आवडीनुसार मसाले घालून बनवता येतो, हीच त्याची खासियत आहे.
29 Jan 2026 02:50 PM (IST)
राजस्थान: राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांचा २८ जानेवारीच्या रात्री जोधपूरमधील एका रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा खळबळजनक दावा खासदार हनुमान बेनीवाल यांनी केला आहे. ते नागौरचे खासदार आहे. साध्वीच्या मृत्यूनंतर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर झालेल्या एका पोस्टने आणि जुन्या वादाने या प्रकरणातील गूढ अधिक वाढवले आहे.
29 Jan 2026 02:45 PM (IST)
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानकाच्या पूर्व भागात प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरील तात्पुरत्या तिकीट काऊंटरजवळ तिकीट तपासणी अधिकाऱ्याच्या मानेवर चाकू ठेवून धमकी दिल्याची घटना घडली.
29 Jan 2026 02:35 PM (IST)
चौल ग्रामपंचायत हद्दीतील टेकाळकर आळी येथील घर क्रमांक 517 मध्ये एकटी राहत असलेल्या मंदा प्रमोद म्हात्रे (वय 70) या वृद्ध महिलेचा जबरी चोरीदरम्यान खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करताना झालेल्या झटापटीत त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
29 Jan 2026 02:35 PM (IST)
Malaysia minister work stress LGBT statement : कामाचा ताण वाढला की माणसाला थकवा येतो, डोकं दुखतं किंवा चिडचिड होते, हे आपण ऐकले आहे. मात्र, “कामाच्या ताणामुळे लोक समलिंगी (LGBT) बनतात,” असा दावा जर एखाद्या जबाबदार मंत्र्याने केला तर? वाचायला थोडे विचित्र वाटत असले तरी, मलेशियाच्या (Malaysia) एका मंत्र्याने संसदेत असाच काहीसा दावा करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. या अजब तर्कशास्त्रामुळे सोशल मीडियावर सध्या या मंत्र्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.
29 Jan 2026 02:30 PM (IST)
मावळ विधानसभेच्या प्रथम महिला आमदार रुपलेखा खंडेराव (दादासाहेब) ढोरे यांचे वयाच्या ७६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. ढोरे यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ व उल्लेखनीय राहिली आहे. रुपलेखा ढोरे या पुणे शहराचे प्रथम महापौर बाबुराव सणस यांची कन्या होत्या.
29 Jan 2026 02:25 PM (IST)
घर असो किंवा ऑफिस लॅपटॉप, फोन, टेब्लेट, पॉवर बँक आणि एअरबड्ससारख्या उपकरणांना चार्ज करण्यासाठी वेगवेगळे ॲडाप्टर आणि केबल्सचा वापर केला जातो. केबल्सच्या गुंतागुंतीमुळे फार गोंधळ उडतो, पण आता हा गोंधळ दूर होणार आहे. कारण पॅट्रोनिक्सने अलीकडेच भारतीय बाजारात आपले नवीनतम चार्जिंग सोल्युशन सादर केले आहे. याला आधुनिक वर्कस्पेससाठी डिझाईन करण्यात आले आहे. चला याच्या स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
29 Jan 2026 02:20 PM (IST)
तुम्ही जर फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सुवर्णसंधी समोर आली आहे. आता सॅमसंगचा गॅलेक्सी झेड फोल्ड ६ (Samsung Galaxy Z Fold 6) सध्या ५५,००० रुपयांची सूट देण्यात आली आहे. एवढेच नाही तर याला बँक ऑफर देखील देण्यात आली आहे. भारतात या फोनची किंमत सुमारे १.६५ लाख रुपयांपासून सुरू होते. मात्र सूट देण्यात आल्याने कमी किमतीत हा फोन खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. चला जाणून घेऊया या फोनचे संपूर्ण माहिती.
29 Jan 2026 02:15 PM (IST)
Bangladeshi shooters will travel to India : सुरक्षेच्या कारणास्तव २०२६ च्या टी-२० विश्वचषकात सहभागी होण्यासाठी बांगलादेश सरकारने आपल्या राष्ट्रीय क्रिकेट संघाला भारतात पाठवण्यास नकार दिल्यानंतर काही दिवसांनीच, पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई रायफल आणि पिस्तूल चॅम्पियनशिपसाठी बांगलादेश सरकारने आपल्या नेमबाजांना भारतात जाण्याची परवानगी दिली आहे.
29 Jan 2026 02:10 PM (IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ज्येष्ठ काँग्रेस नेते व महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्या निधनाने माझे मोठे वैयक्तिक नुकसान झाले आहे, असे चेन्नीथला म्हणाले.
29 Jan 2026 01:59 PM (IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंतिम संस्कार २९ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. त्यांचे दोन्ही पुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांनी अंतिम संस्कार केले. त्यांचे पार्थिव सजवलेल्या रथातून त्यांच्या "अंतिम यात्रेसाठी" नेण्यात आले. रथ फुलांनी सजवण्यात आला होता, त्यावर पवारांचा फोटो होता आणि "स्व. अजितदादा पवार अमर रहे" असे लिहिलेले फलक होते. महाराष्ट्रातील सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्री राहिलेल्यांची या महान नेत्याची अंत्ययात्रा सकाळी ९ वाजता विद्या प्रतिष्ठान कॅम्पस (गदिमा) येथून सुरू झाली आणि शहरातून गेली जेणेकरून लोक त्यांना श्रद्धांजली वाहतील. सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार झाले. अभिनेता रितेश देशमुखसह प्रमुख व्यक्तींनीही मोठी गर्दी केली होती.
29 Jan 2026 01:55 PM (IST)
स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेले माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा उच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे. १३ मे २०२५ रोजी विभागीय सहनिबंधकांनी बच्चू कडू यांना बँकेच्या अध्यक्ष आणि संचालकपदावरून अपात्र ठरवले होते. यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला होता. त्यानंतर सहकार कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत पुन्हा नोटीस दिली.
29 Jan 2026 01:45 PM (IST)
सुरक्षेच्या कारणास्तव २०२६ च्या टी-२० विश्वचषकात सहभागी होण्यासाठी बांगलादेश सरकारने आपल्या राष्ट्रीय क्रिकेट संघाला भारतात पाठवण्यास नकार दिल्यानंतर काही दिवसांनीच, पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई रायफल आणि पिस्तूल चॅम्पियनशिपसाठी बांगलादेश सरकारने आपल्या नेमबाजांना भारतात जाण्याची परवानगी दिली आहे.टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेतील विविध ठिकाणी आयोजित केली जाईल. शूटिंग स्पर्धा २ ते १४ फेब्रुवारी दरम्यान दिल्लीतील डॉ. करणी सिंग शूटिंग रेंजमध्ये आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये १७ देशांतील ३०० हून अधिक नेमबाज सहभागी होतील. बांगलादेश दोन रायफल शूटर पाठवेल, जे एकूण तीन स्पर्धांमध्ये भाग घेतील.
29 Jan 2026 01:37 PM (IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. छोट्या कार्यकर्त्यालाही प्रोत्साहन देणारे, कडक स्वभावामागे अपार प्रेम जपणारे आणि शब्दांइतकेच कृतीत ठाम असलेले नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
29 Jan 2026 01:25 PM (IST)
भारतीय अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने वेगवान गोलंदाजीविरुद्ध उत्तम आरामदायी खेळी केली आणि विशाखापट्टणम येथे झालेल्या एका शांत रात्री न्यूझीलंडविरुद्ध २३ चेंडूत ६५ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने याचे श्रेय त्याच्या सुधारित मानसिकतेला दिले ज्यामुळे तो “अधिक समजूतदार” क्रिकेटपटू बनला आहे. लेग-स्पिनर ईश सोधीच्या एका षटकात २९ धावा काढल्याने दुबे अधिक चर्चेत येतील यात शंका नाही, परंतु वेगवान गोलंदाज जेकब डफी आणि मॅट हेन्रीविरुद्ध त्याने मारलेले तीन षटकारही तितकेच महत्त्वाचे होते.
29 Jan 2026 01:15 PM (IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. गुरुवारी पवार यांच्यावर पूर्ण राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातानंतर आता एक एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या विमानाच वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांचा उड्डाणाचा रेकॉर्ड अत्यंत वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे. 15000 तासांचा दांडगा अनुभव असूनही सुमित कपूर यांचा भूतकाळ सुरक्षा नियमांच्या उल्लघंनाने डागाळलेला आहे.
29 Jan 2026 01:08 PM (IST)
घर असो किंवा ऑफिस लॅपटॉप, फोन, टेब्लेट, पॉवर बँक आणि एअरबड्ससारख्या उपकरणांना चार्ज करण्यासाठी वेगवेगळे ॲडाप्टर आणि केबल्सचा वापर केला जातो. केबल्सच्या गुंतागुंतीमुळे फार गोंधळ उडतो, पण आता हा गोंधळ दूर होणार आहे. कारण पॅट्रोनिक्सने अलीकडेच भारतीय बाजारात आपले नवीनतम चार्जिंग सोल्युशन सादर केले आहे. याला आधुनिक वर्कस्पेससाठी डिझाईन करण्यात आले आहे. चला याच्या स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
29 Jan 2026 01:00 PM (IST)
दिल्ली अंडर-१९ क्रिकेट संघ पुद्दुचेरीमध्ये आहे, जिथे दिल्लीच्या दोन खेळाडूंवर १५ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या घटनेने शिस्तपालन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, संबंधित खेळाडूला ताबडतोब टीम हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले, ज्यामुळे हे स्पष्ट झाले की आरोप हलक्यात घेतले गेले नाहीत. अधिकृत चौकशी अद्याप सुरू असताना, या घटनेमुळे क्रिकेट प्रशासनातील जबाबदारीबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
29 Jan 2026 12:50 PM (IST)
सोने हे संपत्ती, सन्मान, आत्मविश्वास आणि क्षमता यांच्याशी संबंधित आहे. स्वप्नात ते पाहणे याचा अर्थ असा होतो की, तुमच्या आत एक विशेष शक्ती आहे जी तुम्ही आता ओळखू लागला आहात. तसेच तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि सक्षम वाटत आहात.
29 Jan 2026 12:40 PM (IST)
कन्नड अभिनेता मयूर पटेल मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असताना त्याने चार वाहनांचे अपघात केले आहे. भरधाव वेगाने गाडी चालवत असताना त्याने सिग्नलवर उभ्या असलेल्या चार वाहनांना धडक दिली. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झालं नाही.
29 Jan 2026 12:30 PM (IST)
गूगल क्रोममध्ये Gemini AI एजंट आता अपॉइंटमेंट बुकिंग, फॉर्म भरणे, बिल तपासणे, ट्रिप प्लॅनिंग आणि ईमेल लिहिण्यासह अनेक कामे यूजरच्या वतीने करू शकतो. ‘ऑटो ब्राउझ’ अमेरिकेत उपलब्ध.
29 Jan 2026 12:25 PM (IST)
अखेर घड्याळाचा काटा थांबलाच! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. गुरुवारी पवार यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखोंचा समुदाय बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात जमून अजित दादांना अलविदा केलं. सर्वांच्या डोळ्यात पाणी बघायला मिळतंय. यावेळी लाडक्या दादांना निरोप देण्याकरिता लाखोंचा जनसमुदाय दाखल झाला आहे. तसेच अजित पवार यांना तोफांची सलामी देण्यात आली.
29 Jan 2026 12:20 PM (IST)
पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला दिशा देणारे, प्रत्येक घटकाचा बारकाईने अभ्यास करून निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून अजित पवार यांची ओळख होती.सहकार क्षेत्रातील नाते, भूषण वर्ष असो वा इतर कोणताही काळ-सहकारातील प्रत्येक विषयाची त्यांना सखोल जाण होती. साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, यंत्रमाग संस्था, कापड उद्योग अशा विविध क्षेत्रांशी त्यांनी जवळीक साधली होती. केवळ वरवरचा आढावा न घेता, प्रत्येक संस्थेतील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची त्यांची कार्यपद्धती होती.
29 Jan 2026 12:15 PM (IST)
अमेझॉनने दोन नवीन स्मार्ट डिस्प्ले लाँच केले आहेत: इको शो १० आणि ४). दोन्ही डिव्हाइसेस अलेक्सासह येतात आणि स्क्रीन, ऑडिओ आणि सेन्सर तंत्रज्ञान एकत्र करतात. कंपनीच्या मते, हे स्मार्ट डिस्प्ले स्मार्ट होम कंट्रोल, मनोरंजन आणि दैनंदिन कार्य व्यवस्थापन सुलभकरण्यावर लक्ष केंद्रित करतात.
29 Jan 2026 12:12 PM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आस्कमित निधनामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले आहे. अजित पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अंतिमविधी करण्यात आला. जय पवार आणि पार्थ पवार यांनी अजित पवारांना मुखाग्नी दिला आहे.
29 Jan 2026 12:10 PM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला जात आहे. अजित पवार यांचे काल विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांना त्यांचे दोन्ही पुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला आहे.
29 Jan 2026 12:10 PM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठेच्या मैदानामध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीमध्ये दाखल झाले आहेत.